Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 8:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 गहू, जव, द्राक्षवेली, अंजीर व डाळिंबे ह्यांचा तो देश आहे; तो जैतुनवृक्षांचा आणि मधाचा देश आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 ही जमीन गहू, जव, द्राक्षमळे, अंजीर, डाळिंब यांनी समृद्ध आहे. येथे जैतून तेल, मध यांची रेलचेल आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 गहू व जव, द्राक्षमळे, अंजिरे व डाळिंबे, जैतुनाचे तेल व मध यांचा तो देश आहे;

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 8:8
23 Iomraidhean Croise  

तो आपले तरुण गाढव द्राक्षलतेला, आपल्या गाढवीचे शिंगरू उत्तम द्राक्षलतेला बांधून ठेवील; तो आपले वस्त्र द्राक्षारसात, आपला पोशाख द्राक्षांच्या रक्तात धुईल.


गहू आणण्याच्या मिषाने घरात शिरून त्यांनी त्याच्या पोटावर वार केला; मग रेखाब व त्याचा भाऊ बाना हे निसटून गेले.


शलमोनाने हीरामाच्या घरच्या सेवकांना निर्वाहासाठी वीस हजार कोर गहू आणि वीस मापे निर्भेळ तेल पुरवले; हा एवढा पुरवठा प्रतिवर्षी शलमोन हीरामास करीत असे.


पुढे मी येऊन तुमच्या देशासारखा देश, धान्याचा व द्राक्षारसाचा देश, अन्नाचा व द्राक्षाच्या मळ्यांचा देश, जैतून तेलाचा व मधाचा देश ह्यात तुम्हांला नेईन; म्हणजे तुम्ही जिवंत राहाल, मरणार नाही; परमेश्वर आमचा बचाव करील असे बोलून हिज्कीया तुमचे मन वळवू पाहील तेव्हा त्याचे ऐकू नका.


तो तुझ्या सीमांच्या आत शांतता पसरतो; उत्कृष्ट गव्हाने तुला तृप्त करतो;


मी त्याला गव्हाचे सत्त्व खाऊ घालीन आणि पहाडातल्या मधाने मी तुला तृप्त करीन.”


त्या दिवशी असे होईल की जेथे जेथे हजार रुपये किमतीचे हजार द्राक्षींचे वेल असत तेथे तेथे काटेकुटे होतील.


मी तुम्हांला सुपीक भूमीवर तिचा उपज खाण्यासाठी व तिची संपत्ती भोगण्यासाठी आणले, पण तुम्ही येऊन माझा देश विटाळला, माझे वतन तुम्ही अमंगळ केले आहे.


ते तुझे पीक, तुझ्या मुलाबाळांचे अन्न खाऊन टाकतील; ते तुझी शेरडेमेंढरे, तुझी गुरेढोरे, खाऊन टाकतील; तुझ्या द्राक्षलता व अंजिरांची झाडे फस्त करतील; ज्या तटबंदीच्या नगरांवर तुझी भिस्त आहे त्यांना ते तलवारीने उद्ध्वस्त करतील.”


यहूदा व इस्राएल देशातले लोक तुझ्याबरोबर व्यापार करत; ते तुझ्या मालाबद्दल तुला मिन्नीथाचा गहू, मेवामिठाई, मध, तेल व ऊद देत.


पृथ्वी, धान्य, द्राक्षारस व तेल ह्यांचे ऐकेल व ती इज्रेलाचे2 ऐकतील.


तिला धान्य, द्राक्षारस व तेल पुरवणारा व जे सोने, रुपे त्यांनी बआलमूर्तीसाठी वेचले त्याची रेलचेल करून देणारा तो मीच, हे तिला माहीत नाही.


ते सगळे आपापल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील, कोणी त्यांना घाबरवणार नाही; कारण सेनाधीश परमेश्वराच्या तोंडची ही वाणी आहे.


अंजिराचे झाड न फुलले, द्राक्षीच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेंढवाड्यातील कळप नाहीतसे झाले, व गोठ्यात गुरेढोरे न उरली,


तेथून ते अष्कोल नाल्यापर्यंत आले; तेथे त्यांनी द्राक्षांच्या एका घोसासहित एक फांदी तोडून घेतली व ती दोघा माणसांनी काठीवर घालून नेली; त्याचप्रमाणे त्यांनी काही डाळिंबे व अंजीरेही घेतली.


मग जेवणार्‍यांना पुरे झाल्यावर त्यांनी जवाच्या पाच भाकरीचे उरलेले तुकडे गोळा करून बारा टोपल्या भरल्या.


“येथे एक लहान मुलगा आहे, त्याच्याजवळ जवाच्या पाच भाकरी व दोन मासळ्या आहेत; परंतु त्या इतक्यांना कशा पुरणार?”


त्याने त्याला पृथ्वीवरील उंच उंच स्थानांवरून मिरवत नेले, त्याने शेतात उपज खाल्ला; त्याने त्याला खडकातील मध, आणि गारेच्या खडकातील तेल चाटवले;


गाईचे दही, मेंढ्यांचे दूध, कोकरांची चरबी, बाशानाचे एडके व बकरे, उत्तम गव्हाचे सत्त्व, हे त्याला दिले; द्राक्षांची लालभडक मदिरा तू प्यालास.


म्हणून, हे इस्राएला, श्रवण कर, आणि त्या काळजीपूर्वक पाळ म्हणजे तुझे कल्याण होईल; आणि तुझ्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याने दुधामधाचे प्रवाह वाहत असलेला जो देश तुला देण्याचे वचन दिले आहे त्यात तू बहुगुणित होशील.


कारण तुझा देव परमेश्वर तुला एका उत्तम देशात घेऊन जात आहे; खोर्‍यात व डोंगरात उगम पावून पाण्याने भरलेले नाले, झरे व ओढे त्यात वाहत आहेत;


त्या देशात टंचाई न पडता तू अन्न खाशील, तुला कोणत्याही गोष्टीची वाण पडणार नाही; तेथले धोंडे लोहयुक्त आहेत व तेथल्या डोंगरातून तुला तांबे खणून काढता येईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan