Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 8:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 कारण तुझा देव परमेश्वर तुला एका उत्तम देशात घेऊन जात आहे; खोर्‍यात व डोंगरात उगम पावून पाण्याने भरलेले नाले, झरे व ओढे त्यात वाहत आहेत;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 तुमचा देव परमेश्वर तुम्हास उत्तम देशात घेऊन जात आहे. ती भूमी सुजला, सुफला आहे. तेथे डोंगरात उगम पावून जमिनीवर वाहणारे नद्या-नाले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 कारण याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला उत्तम अशा देशात नेणार आहेत—त्यात नद्या, झरे व ओहोळ हे डोंगरात उगम पावून खोर्‍यांमधून वाहत आहेत;

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 8:7
17 Iomraidhean Croise  

तो आपले तरुण गाढव द्राक्षलतेला, आपल्या गाढवीचे शिंगरू उत्तम द्राक्षलतेला बांधून ठेवील; तो आपले वस्त्र द्राक्षारसात, आपला पोशाख द्राक्षांच्या रक्तात धुईल.


पुढे मी येऊन तुमच्या देशासारखा देश, धान्याचा व द्राक्षारसाचा देश, अन्नाचा व द्राक्षाच्या मळ्यांचा देश, जैतून तेलाचा व मधाचा देश ह्यात तुम्हांला नेईन; म्हणजे तुम्ही जिवंत राहाल, मरणार नाही; परमेश्वर आमचा बचाव करील असे बोलून हिज्कीया तुमचे मन वळवू पाहील तेव्हा त्याचे ऐकू नका.


तो खोर्‍यांतून झरे काढतो; ते डोंगरांमधून वाहतात;


त्यांनी रम्य देश तुच्छ मानला; त्यांनी त्याच्या वचनांवर विश्वास ठेवला नाही.


त्यांना मिसरी लोकांच्या हातातून सोडवावे, आणि त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात, दुधामधाचे प्रवाह जेथे वाहत आहेत अशा देशात, म्हणजे कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी ह्यांच्या देशात त्यांना घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे.


पुढे मी येऊन तुमच्या देशासारखा देश, धान्याचा व द्राक्षांचा देश, अन्नाचा व द्राक्षींच्या मळ्यांचा देश ह्यात तुम्हांला नेईन.


मी आपल्या वल्लभाप्रीत्यर्थ गाणे गाईन; आपल्या प्रियकराचे त्याच्या द्राक्षीच्या मळ्याविषयीचे गीत गाईन. माझ्या वल्लभाचा द्राक्षमळा डोंगराच्या एका अतिशय सुपीक शृंगावर होता;


मी तुम्हांला सुपीक भूमीवर तिचा उपज खाण्यासाठी व तिची संपत्ती भोगण्यासाठी आणले, पण तुम्ही येऊन माझा देश विटाळला, माझे वतन तुम्ही अमंगळ केले आहे.


त्याने देशातले काही बी घेऊन ते पिकाऊ जमिनीत पेरले; वाळुंज लावतात तसे ते विपुल पाण्याजवळ लावले.


त्या दिवशी मी हात उचलून त्यांच्याबरोबर शपथ केली की, मी तुम्हांला मिसर देशातून काढून दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत अशा तुमच्यासाठी पाहिलेल्या देशात आणीन; तो देश सर्व देशांचा मुकुटमणी होय.


म्हणून तुझा देव परमेश्वर ह्याच्या मार्गांनी चालून व त्याचे भय बाळगून त्याच्या आज्ञा पाळ.


गहू, जव, द्राक्षवेली, अंजीर व डाळिंबे ह्यांचा तो देश आहे; तो जैतुनवृक्षांचा आणि मधाचा देश आहे.


तेथे गेल्यावर निश्‍चिंत राहणारे लोक तुम्हांला आढळतील. तो देश विस्तीर्ण असून देवाने खरोखर तो तुमच्या हाती दिला आहे. ती जागाच अशी आहे की, तेथे जमिनीच्या कोणत्याही उत्पन्नाची कमतरता नाही.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan