Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 8:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 तू खाऊनपिऊन तृप्त होशील आणि चांगली घरे बांधून त्यांत राहशील,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 त्यामुळे तुम्हास अन्नधान्याची कमतरता पडणार नाही. तुम्ही चांगली घरे बांधून त्यामध्ये रहाल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 कारण जेव्हा तुम्ही खाल आणि तृप्त व्हाल, जेव्हा सुंदर घरे बांधाल आणि त्यात वस्ती कराल,

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 8:12
13 Iomraidhean Croise  

माझी अतितृप्ती झाल्यास मी कदाचित तुझा अव्हेर करीन, आणि “परमेश्वर कोण आहे?” असे म्हणेन; मी दरिद्री राहिल्यास कदाचित चोरी करीन, आणि माझ्या देवाच्या नामाची निंदा करीन.


मी मोठमोठी कामे हाती घेतली, आपल्यासाठी घरेदारे बांधली, द्राक्षांचे मळे लावले;


ते म्हणतात, ‘घरे बांधण्याची वेळ अद्यापि जवळ आली नाही; हे नगर जणू काय कढई व आम्ही त्यातले मांस.’


तुम्ही गरिबाला तुडवता व भेट म्हणून त्याच्यापासून धान्य उपटता, त्यामुळे जी चिर्‍यांची घरे तुम्ही बांधली आहेत त्यांत तुम्ही राहणार नाही; तुम्ही जे द्राक्षाचे रमणीय मळे लावले आहेत त्यांचा द्राक्षारस पिणार नाही.


“इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वत: आपल्या तक्तपोशीच्या घरात राहावे असा समय आहे काय?


तसेच ज्याप्रमाणे लोटाच्या दिवसांत झाले, त्याप्रमाणे होईल; म्हणजे ते लोक खातपीत होते, विकत घेत होते, विकत होते, लागवड करत होते, घरे बांधत होते;


कारण सर्व गोष्टींची समृद्धी असताना तू आनंदाने व उल्हासित मनाने आपला देव परमेश्वर ह्याची सेवा केली नाही,


कारण ज्या देशात दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत असा देश देण्याची शपथ मी त्यांच्या पूर्वजांशी वाहिली होती, त्यात मी त्यांना नेऊन पोहचवल्यावर ते पोटभर खाऊन माजतील, आणि मग अन्य देवांकडे वळून त्यांची सेवा करतील आणि मला तुच्छ लेखून माझा करार मोडतील.


पण यशुरून (इस्राएल) पुष्ट होऊन लाथा झाडू लागला; तू धष्टपुष्ट झालास, तू लठ्ठ झालास, तू तुकतुकीत झालास; तेव्हा त्याने आपल्या निर्माणकर्त्या देवाचा त्याग केला, आणि आपल्या तारणदुर्गाला तुच्छ लेखले.


तुझा देव परमेश्वर ह्याने तुझ्या पूर्वजांना म्हणजे अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना जो देश तुला देण्याचे वचन दिले आहे त्यात तो तुला घेऊन जाईल; जी मोठी व सुंदर नगरे तू स्वतः वसवलेली नाहीत,


तुझी गुरेढोरे व शेरडेमेंढरे ह्यांची वृद्धी होईल, तुझे सोनेरुपे व तुझी सर्व मालमत्ता वाढेल,


Lean sinn:

Sanasan


Sanasan