Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 7:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 कारण तू आपला देव परमेश्वर ह्याची पवित्र प्रजा आहेस, तू त्याची खास प्रजा व्हावेस म्हणून सार्‍या पृथ्वीवरील राष्ट्रांतून तुझा देव परमेश्वर ह्याने तुला निवडून घेतले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 कारण तुम्ही तुमचा देव परमेश्वराची पवित्र प्रजा आहात. जगाच्या पाठीवरील सर्व लोकांमधून त्याने आपली खास प्रजा म्हणून तुमचीच निवड केली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 कारण तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचे पवित्रजन आहात. संपूर्ण पृथ्वीवरील सर्व लोकातून याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला अशासाठी निवडले आहे की, तुम्ही त्यांचा खूप मोलाचा ठेवा असावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 7:6
33 Iomraidhean Croise  

तसेच तू निवडलेल्या लोकांमध्ये तुझा सेवक राहत आहे; त्या लोकांचा एवढा समुदाय आहे की ते असंख्य व अगणित आहेत.


त्यांनी आपणांस व आपल्या पुत्रांस त्यांच्या कन्या केल्या आहेत; पवित्र बीज देशोदेशीच्या लोकांत मिसळून गेले आहे; सरदार व शास्ते ह्यांचा हात ह्या पातकात प्रमुख आहे.”


तेव्हा यहूदा त्याचे पवित्रस्थान झाला, इस्राएल त्याचे राज्य झाला.


कारण परमेशाने आपणासाठी याकोबाला निवडले आहे, आपले स्वतःचे धन होण्यासाठी इस्राएलास निवडून घेतले आहे.


“ज्यांनी यज्ञ करून माझ्याशी करार केला आहे, त्या माझ्या भक्तांना माझ्याजवळ एकत्र करा.”


मी तुम्हांला आपली प्रजा करून घेईन आणि मी तुमचा देव होईन; म्हणजे तुम्हांला मिसरी लोकांच्या ओझ्याखालून काढणारा मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्हांला कळेल.


माझ्या सेवका, इस्राएला, माझ्या निवडलेल्या याकोबा, माझा मित्र अब्राहाम ह्याच्या संताना,


मी तुला हाती धरून पृथ्वीच्या दिगंतापासून आणले, तिच्या सीमांपासून बोलावून तुला म्हटले, “तू माझा सेवक आहेस, मी तुला निवडले आहे, तुझा त्याग केला नाही”;


त्यात लोकांचा दहावा हिस्सा राहिला तर त्याचाही नाश व्हायचा; तरी एला व अल्लोन ही झाडे तोडल्यावर ज्याप्रमाणे त्यांचा बुंधा राहतो त्याप्रमाणे त्यांचा बुडखा पवित्र बीज असा राहील.”2


पवित्र लोक, परमेश्वराने उद्धरलेले लोक, असे त्यांना म्हणतील व तू निगा केलेली व न टाकलेली नगरी आहेस असे म्हणतील.


इस्राएल परमेश्वराला पवित्र, त्याच्या उपजाचे प्रथमफळ असा होता; त्याला गिळून टाकणारे सर्व दोषी ठरले. त्यांच्यावर अरिष्ट आले, असे परमेश्वर म्हणतो.”


त्यांना सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, ज्या दिवशी मी इस्राएलास निवडून घेतले, याकोब वंशाकडे मी हात उचलून शपथ वाहिली, मिसर देशात त्यांना मी प्रकट झालो, हात उचलून त्यांना शपथपूर्वक म्हणालो की, मी परमेश्वर तुमचा देव आहे.


त्यांचा देश तुमचे वतन होईल, ज्यात दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत असा देश तुमच्या ताब्यात देईन, असे मी तुम्हांला सांगितले आहे. तुम्हांला इतर राष्ट्रांपासून वेगळे करणारा मी परमेश्वर तुमचा देव आहे.


तुम्ही माझ्याप्रीत्यर्थ पवित्र व्हावे; कारण मी परमेश्वर पवित्र आहे; तुम्ही माझेच असावे म्हणून मी तुम्हांला इतर राष्ट्रांपासून वेगळे केले आहे.


“भूतलावरील सर्व कुळांत केवळ तुमच्याबरोबरच मी परिचय केला; म्हणून तुमच्या सर्व दुष्कृत्यांबद्दल मी तुमची झडती घेईन.


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “मी नेमीन त्या दिवशी ते माझा खास निधी होतील; जसा कोणी आपली सेवाचाकरी करणार्‍या पुत्रावर दया करतो तसा मी त्यांच्यावर दया करीन.


ह्या इस्राएल लोकांच्या देवाने आमच्या पूर्वजांना निवडून घेतले, ते लोक मिसर देशात उपरे असताना त्यांचा उत्कर्ष केला आणि पराक्रमी भुजाने त्यांना तेथून काढले.


ते इस्राएली आहेत; दत्तकपणा, ईश्वरी तेज, करारमदार, नियमशास्त्रदान, उपासना व अभिवचने ही त्यांची आहेत;


कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची पवित्र प्रजा आहात आणि परमेश्वराने भूतलावरील सर्व राष्ट्रांतून आपली खास प्रजा म्हणून तुम्हांला निवडून घेतले आहे.


आपोआप मेलेले काहीही तुम्ही खाऊ नये; तुमच्या वेशीच्या आत असलेल्या उपर्‍याला ते खायला द्यावे किंवा परक्याला विकून टाकावे; कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची पवित्र प्रजा आहात. करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये.


आणि परमेश्वरानेही आज मान्य केले आहे की, ‘तुला सांगितल्याप्रमाणे तू माझी खास प्रजा झाला आहेस; तू माझ्या सर्व आज्ञा पाळ,


म्हणजे मी निर्माण केलेल्या सर्व राष्ट्रांपेक्षा प्रशंसा, नावलौकिक आणि सन्मान ह्या बाबतीत तुला श्रेष्ठ करीन आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे तू परमेश्वर आपला देव ह्याची पवित्र प्रजा होशील.”


तू आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञा पाळून त्याच्या मार्गांनी चालशील तर तो आपल्या शपथेला जागून तुला आपली पवित्र प्रजा करून स्थिर ठेवील.


तो आपल्या लोकांवर2 प्रीती करतो; त्याचे सर्व पवित्र जन तुझ्या हाती आहेत; ते तुझ्या पायाशी बसले आहेत; त्यांनी तुझी वचने ग्रहण केली आहेत.


तुम्ही आज आहात त्याप्रमाणे परमेश्वराची खास1 प्रजा व्हावे म्हणून त्याने तुम्हांला लोखंडी भट्टीतून, म्हणजे मिसर देशातून बाहेर काढले आहे.


त्याने तुझ्या पूर्वजांवर प्रीती केली म्हणून त्यांच्यामागून त्यांच्या संतानाला त्याने निवडून घेतले आणि स्वतः आपल्या महासामर्थ्याने त्याने तुला मिसर देशातून बाहेर आणले.


त्याने स्वतःला आपल्याकरता दिले, ह्यासाठी की, ‘त्याने खंडणी भरून’ ‘आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्त करावे,’ आणि चांगल्या कामांत तत्पर असे आपले ‘स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करून ठेवावे.’


पण तुम्ही तर ‘निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र,’ देवाचे ‘स्वत:चे लोक’ असे आहात; ह्यासाठी की, ज्याने तुम्हांला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले ‘त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत.’


त्याने प्राचीन जगाचीही गय केली नाही, तर अभक्तांच्या जगावर जलप्रलय आणला, आणि नीतिमत्त्वाचा उपदेशक नोहा ह्याचे सात जणांसह रक्षण केले;


भक्तिमान लोकांना परीक्षेतून कसे सोडवावे व अनीतिमान लोकांना शिक्षा भोगत न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते.


परमेश्वर आपल्या थोर नामास्तव आपल्या लोकांचा त्याग करणार नाही, कारण परमेश्वराने कृपावंत होऊन तुम्हांला आपले प्रजाजन केले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan