Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 7:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 त्यांच्याशी सोयरीक करू नकोस; आपल्या मुली त्यांच्या मुलांना देऊ नकोस व त्यांच्या मुली आपल्या मुलांना करू नकोस;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 त्यांच्याशी सोयरीक जुळवू नका. आपल्या मुली त्यांना देऊ नका. त्याच्या मुली आपल्या मुलांना करून घेऊ नका.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तुम्ही त्यांच्याशी आंतरविवाह करू नका, तुमच्या कन्या त्यांच्या पुत्रांसाठी देऊ नका किंवा त्यांच्या कन्या तुमच्या पुत्रांसाठी घेऊ नका,

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 7:3
14 Iomraidhean Croise  

मी तुला परमेश्वराची, आकाश व पृथ्वी ह्यांच्या देवाची शपथ घेण्यास सांगतो की ज्या कनानी लोकांत मी राहत आहे त्यांच्या मुलींपैकी कोणतीही नवरी माझ्या मुलासाठी तू पाहणार नाहीस.


ह्या राष्ट्रांविषयी परमेश्वराने इस्राएल लोकांना सांगितले होते की, “तुम्ही त्यांच्याशी व्यवहार करू नये व त्यांनी तुमच्याशी व्यवहार करू नये, कारण ते खात्रीने तुमची मने आपल्या देवांकडे वळवतील.”


नबाटाचा पुत्र यराबाम ह्याच्या पापकर्मांचे अनुकरण करणे ही क्षुल्लक गोष्ट आहे असे त्याला वाटले. त्याने सीदोन्यांचा राजा एथबाल ह्याची कन्या ईजबेल हिच्याशी लग्न केले, आणि तो बआलमूर्तीची सेवा व पूजा करू लागला.


तर आता आमच्या स्वामीच्या उपदेशानुसार आणि आमच्या देवाच्या मसलतीचा ज्यांना धाक आहे त्यांच्या उपदेशानुसार आम्ही असल्या सर्व स्त्रिया व त्यांच्या पोटी झालेली संतती काढून लावतो, असा करार आपल्या देवाशी करू या; हे सर्व आपण नियमशास्त्राप्रमाणे करू या.


तर तुम्ही आपल्या कन्या त्यांच्या पुत्रांना देऊ नयेत; व त्यांच्या कन्या आपल्या पुत्रांना करू नयेत, त्यांचे क्षेमकुशल कधीही चिंतू नये, म्हणजे तुम्ही मजबूत होऊन त्या देशाचे उत्तम फळ चाखाल आणि आपल्यामागे आपल्या वंशजांना तो निरंतरचे वतन ठेवून जाल.’


आम्ही आमच्या मुली ह्या देशातल्या लोकांना देणार नाही व त्यांच्या मुली आमच्या मुलांना करणार नाही;


त्याचे आईबाप त्याला म्हणाले, “तू त्या बेसुनत पलिष्ट्यांतली बायको का करू पाहत आहेस? तुझ्या भाऊबंदांत किंवा आपल्या सार्‍या लोकांत कोणी मुली नाहीत काय?” शमशोन आपल्या बापाला म्हणाला, “तीच मला मिळवून द्या; कारण माझे तिच्यावर मन बसले आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan