Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 7:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 आणि तुझा देव परमेश्वर त्यांना तुझ्या हवाली करील व तू त्यांचा पराभव करशील, तेव्हा त्यांचा समूळ नाश कर; त्यांच्याशी करारमदार करू नकोस व त्यांच्यावर दया करू नकोस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तुमचा देव परमेश्वर त्यांना तुमच्या अधिपत्याखाली आणेल आणि तुम्ही त्यांचा पराभव कराल तेव्हा तुम्ही त्यांचा समूळ विध्वंस करा. त्यांच्याशी कुठलाही करार करु नका. त्यांना दया दाखवू नका.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 आणि जेव्हा याहवेह तुमचे परमेश्वर त्यांना तुमच्या हाती देतील आणि तुम्ही त्यांचा पराभव कराल, तेव्हा तुम्ही त्यांचा समूळ नायनाट करा. त्यांच्याशी कुठलाही करार करू नका किंवा त्यांना दया दाखवू नका.

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 7:2
45 Iomraidhean Croise  

ज्या परात्पर देवाने तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन केले तो धन्य!” तेव्हा अब्रामाने त्याला अवघ्याचा दहावा भाग दिला.


राजाने गिबोनी लोकांना बोलावून त्यांच्याशी बोलणे केले. (हे गिबोनी लोक इस्राएल लोकांपैकी नसून अवशिष्ट अमोर्‍यांपैकी होते; इस्राएल लोकांनी त्यांच्याशी शपथ वाहून करार केला होता; पण इस्राएल लोक व यहूदी लोक ह्यांच्या अभिमानास्तव शौलाने गिबोनी लोकांचा संहार करण्याचा प्रयत्न केला होता.)


बेन-हदाद त्याला म्हणाला, “जी नगरे माझ्या बापाने आपल्या बापापासून घेतली ती मी परत देतो; माझ्या बापाने शोमरोनात पेठा वसवल्या तशाच आपणही दिमिष्कात आपल्या नावाच्या पेठा वसवा;” अहाब म्हणाला, “ह्या शर्तींवर तुला सोडून देतो,” त्याने बेन-हदादाशी करारमदार करून त्याला सोडून दिले.


तर आता आमच्या स्वामीच्या उपदेशानुसार आणि आमच्या देवाच्या मसलतीचा ज्यांना धाक आहे त्यांच्या उपदेशानुसार आम्ही असल्या सर्व स्त्रिया व त्यांच्या पोटी झालेली संतती काढून लावतो, असा करार आपल्या देवाशी करू या; हे सर्व आपण नियमशास्त्राप्रमाणे करू या.


परमेश्वराच्या आज्ञेचे त्यांनी उल्लंघन केले, म्हणजे त्यांनी इतर राष्ट्रांचा विध्वंस केला नाही,


परमेश्वराशिवाय दुसर्‍या दैवतांना बली अर्पण करणार्‍याचा अगदी संहार करावा.


तेव्हा इस्राएलाने परमेश्वराला असा नवस केला की, “जर तू खरोखर ह्या लोकांना माझ्या हाती देशील तर मी त्यांच्या नगरांचा समूळ नाश करीन.”


तर आता मुलाबाळांतील प्रत्येक मुलगा मारून टाका आणि पुरुषांशी संग केलेली अशी प्रत्येक स्त्री मारून टाका.


तेव्हा त्या देशातील सर्व रहिवाशांना तुमच्यासमोरून घालवून द्या; आकृती कोरलेल्या त्यांच्या दगडांचा नाश करा आणि त्यांची उच्च स्थाने पाडून टाका;


तर तू त्याच्या म्हणण्यास होकार देऊ नयेस आणि त्याचे ऐकू नयेस; त्याच्यावर दयादृष्टी करू नयेस, त्याची गय करू नयेस अथवा त्याला लपवून ठेवू नयेस;


त्याला अवश्य ठार मारावेस; त्याला जिवे मारण्यासाठी त्याच्यावर तुझा हात प्रथम पडावा आणि मग इतर सर्व लोकांचे हात पडावेत.


त्याच्यावर दयादृष्टी करू नकोस, पण निरपराध माणसाच्या हत्येचा दोष इस्राएलातून काढून टाक, म्हणजे तुझे कल्याण होईल.


मग आपला देव परमेश्वर ह्याने त्याला आपल्या हवाली केले, आणि आपण त्याचा, त्याच्या मुलांचा व त्याच्या सर्व सेनेचा पराभव केला.


त्या वेळी आपण त्याची सर्व नगरे घेतली आणि प्रत्येक नगराचा, त्यांतील पुरुष, स्त्रिया व मुलेबाळे ह्यांच्यासह समूळ नाश केला; आपण त्यांतला कोणीही शिल्लक ठेवला नाही;


कारण तुझा देव परमेश्वर तुझा बचाव करण्यासाठी आणि तुझे शत्रू तुझ्या हाती देण्यासाठी छावणीत फिरत असतो, म्हणून तू आपली छावणी पवित्र ठेवावीस, नाहीतर तुझ्यामध्ये एखादा अनुचित प्रकार पाहून तो तुझ्यापासून निघून जाईल.


तर त्या स्त्रीचा हात कापून टाकावा; तिच्यावर दयादृष्टी करू नये.


आपला देव परमेश्वर ह्याने बाशानाचा राजा ओग व त्याचे सर्व लोक आमच्या हाती दिले आणि आम्ही त्यांना असा मार दिला की त्याचे कोणीच उरले नाही.


परमेश्वर त्यांना तुमच्या हवाली करील तेव्हा त्यांचे मी तुम्हांला दिलेल्या संपूर्ण आज्ञेप्रमाणे करा.


अनादी देव तुझा आश्रय आहे, सनातन बाहूंचा तुला आधार आहे; त्याने शत्रूला तुझ्यापुढून हाकून दिले व म्हटले, त्याचा नाश कर.


जी राष्ट्रे तुझा देव परमेश्वर तुझ्या हाती देईल त्या सर्वांचा संहार कर; त्यांची कीव करू नकोस; त्यांच्या देवांची सेवा करू नकोस, तसे करणे तुला पाशवत होईल.


तर आता हे पक्के लक्षात ठेव की, भस्म करणार्‍या अग्नीसारखा तुझ्यापुढे जो पलीकडे जात आहे तो तुझा देव परमेश्वर आहे; तो त्यांचा संहार करील व त्यांना तुझ्यापुढे चीत करील, आणि परमेश्वराने तुला सांगितल्याप्रमाणे तू त्यांना घालवून देऊन त्यांचा त्वरित नाश करशील.


त्या दिवशी यहोशवाने मक्केदा घेऊन तलवारीने त्याचा व त्याच्या राजाचा संहार केला; त्यांच्याबरोबरच तेथल्या सगळ्या प्राण्यांचाही त्याने समूळ नाश केला; त्याने कोणालाही जिवंत ठेवले नाही; त्याने यरीहोच्या राजाचे जे केले तेच मक्केदाच्या राजाचेही केले.


परमेश्वराने ते नगर व त्याचा राजा ह्यांना इस्राएलाच्या हाती दिले आणि यहोशवाने त्याचा व त्या नगरातल्या सर्व प्राण्यांचा तलवारीने संहार केला; त्यातल्या कोणालाही जिवंत ठेवले नाही; यरीहोच्या राजाचे त्याने जे केले तेच येथल्याही राजाचे केले.


परमेश्वराने लाखीश इस्राएलाच्या हाती दिले व त्यांनी ते दुसर्‍या दिवशी घेतले, लिब्नाचा केला तसाच लाखीशाचा व तेथल्या सगळ्या प्राण्यांचा त्याने तलवारीने संहार केला.


ह्या प्रकारे यहोशवाने त्या सर्व देशाचा म्हणजे डोंगराळ प्रदेश, नेगेब, तळवट व उतरण ह्यांतील सर्व प्रांत आणि त्यांचे राजे ह्यांचा धुव्वा उडवला; कोणालाही जिवंत राहू दिले नाही; इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने आज्ञा केल्याप्रमाणे सर्व प्राण्यांचा त्याने समूळ नाश केला.


हे सर्व राजे व त्यांचे देश यहोशवाने एकाच वेळेस घेतले, कारण इस्राएलाचा देव परमेश्वर इस्राएलातर्फे लढला.


परमेश्वराने त्यांना इस्राएलाच्या हाती दिले; त्यांनी त्यांना मार देऊन सीदोन महानगरापर्यंत व मिस्रफोथ-माईमापर्यत आणि पूर्वेस मिस्पे खोर्‍यापर्यंत पाठलाग करून त्यांचा एवढा संहार केला की, त्यांच्यातला एकही जिवंत राहिला नाही.


तेव्हा त्या पुरुषांनी तिला म्हटले, “तुम्ही ही आमची कामगिरी बाहेर फोडली नाही तर तुमच्यासाठी आम्ही आमचे प्राण देऊ; आणि परमेश्वर आम्हांला हा देश देईल तेव्हा आम्ही तुझ्याशी दयाळूपणाने व खरेपणाने वागू.”


परमेश्वराने त्यांच्या पूर्वजांना वचन दिले होते त्याप्रमाणे त्याने त्यांना सर्वत्र स्वास्थ्य दिले. त्यांच्या कोणाही शत्रूला त्यांच्यापुढे टिकाव धरवला नाही; परमेश्वराने त्यांचे सर्व शत्रू त्यांच्या हाती दिले.


ज्या मोकळ्या रानात इस्राएलांनी आयकरांचा पाठलाग केला होता तेथे त्यांनी त्या सर्वांची कत्तल केली आणि त्यांचा तलवारीने साफ फडशा उडवला; त्यानंतर सर्व इस्राएल आय नगरात परत आले व त्यावरही त्यांनी तलवार चालवली.


त्यांनी यहोशवाला उत्तर दिले, “हा सर्व देश तुम्हांला द्यावा आणि तुमच्यासमोर देशातील सर्व रहिवाशांचा संहार करावा असे तुझा देव परमेश्वर ह्याने आपला सेवक मोशे ह्याला आज्ञापिले होते, हे तुझ्या दासांना पक्के कळले होते; तुमच्यामुळे आम्हांला आमच्या जिवाची भीती वाटली म्हणून आम्ही हे काम केले.


इस्राएल पुरुषांनी त्या हिव्वी लोकांना म्हटले, “आम्ही तुमच्याबरोबर करारमदार कसा करावा? न जाणो तुम्ही आमच्यामध्येच राहणारे असाल.”


त्या हेरांनी नगरातून एक मनुष्य बाहेर निघताना पाहिला; त्याला त्यांनी म्हटले, “नगरात शिरण्याची वाट आम्हांला दाखव म्हणजे आम्ही तुला अभय देऊ.”


मग यहूदाने स्वारी केली तेव्हा परमेश्वराने कनानी व परिज्जी ह्यांना त्यांच्या हाती दिले व त्यांनी बेजेक येथे त्यांच्या दहा हजार लोकांना ठार केले.


तुम्ही ह्या देशाच्या रहिवाशांशी काही करारमदार करू नका; तुम्ही त्यांच्या वेद्या मोडून टाका, असे मी तुम्हांला म्हणालो होतो; पण तुम्ही माझी वाणी ऐकली नाही. तुम्ही हे काय केले?


Lean sinn:

Sanasan


Sanasan