Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 7:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 जी राष्ट्रे तुझा देव परमेश्वर तुझ्या हाती देईल त्या सर्वांचा संहार कर; त्यांची कीव करू नकोस; त्यांच्या देवांची सेवा करू नकोस, तसे करणे तुला पाशवत होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या हाती सोपवलेल्या सर्वांचा तुम्ही पराभव करून विध्वंस करा. त्यांच्याबाबतीत वाईट वाटून घेऊ नका. त्यांच्या दैवतांची सेवा करु नका. कारण ती दैवते म्हणजे तुम्हास अडकवणारा सापळा आहे. त्याने तुमच्या आयुष्याचा नाश होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 याहवेह तुमचे परमेश्वर जे सर्व देश तुमच्या हाती देतील, त्यांचा तुम्ही पूर्णपणे संहार करावा. त्यांना दयामाया दाखवू नका व त्यांच्या दैवतांची सेवा करू नका. कराल, तर ते तुमच्यासाठी सापळा असे होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 7:16
21 Iomraidhean Croise  

परमेश्वराच्या आज्ञेचे त्यांनी उल्लंघन केले, म्हणजे त्यांनी इतर राष्ट्रांचा विध्वंस केला नाही,


त्यांनी त्यांच्या मूर्तींची पूजा केली; त्या त्यांना पाशरूप झाल्या.


ते तुझ्या देशात राहता कामा नयेत; राहिले तर ते तुला माझ्याविरुद्ध पाप करायला लावतील; कारण तू त्यांच्या देवांची सेवा करशील व ते तुला खात्रीने पाशासारखे होतील.”


परमेश्वर म्हणतो, मग यहूदाचा राजा सिद्कीया, त्याचे चाकर व त्याच्या प्रजेतले जे कोणी मरी, तलवार व दुष्काळ ह्यांतून वाचून ह्या नगरात राहतील त्यांना मी बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याच्या हाती, त्यांच्या शत्रूंच्या हाती, व जे त्यांचा जीव घेण्यास टपत आहेत त्यांच्या हाती देईन; तो त्यांना तलवारीने मारून टाकील; तो त्यांना सोडणार नाही, त्यांच्यावर दयामाया करणार नाही.’


पण तुम्ही त्या देशातल्या रहिवाशांना तुमच्यासमोरून घालवून न दिल्यास ज्यांना तुम्ही तेथे राहू द्याल ते तुमच्या डोळ्यांना कुसळासारखे आणि तुमच्या कुशीला काट्यांसारखे होतील, आणि तुम्ही वस्ती कराल त्या देशात तुम्हांला त्रास देतील.


फसू नका, “कुसंगतीने नीती बिघडते.”


तर तू त्याच्या म्हणण्यास होकार देऊ नयेस आणि त्याचे ऐकू नयेस; त्याच्यावर दयादृष्टी करू नयेस, त्याची गय करू नयेस अथवा त्याला लपवून ठेवू नयेस;


त्याला अवश्य ठार मारावेस; त्याला जिवे मारण्यासाठी त्याच्यावर तुझा हात प्रथम पडावा आणि मग इतर सर्व लोकांचे हात पडावेत.


त्याच्यावर दयादृष्टी करू नकोस, पण निरपराध माणसाच्या हत्येचा दोष इस्राएलातून काढून टाक, म्हणजे तुझे कल्याण होईल.


तू दयादृष्टी करू नयेस; जिवाबद्दल जीव, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताबद्दल हात आणि पायाबद्दल पाय असा दंड करावा.


तर त्या स्त्रीचा हात कापून टाकावा; तिच्यावर दयादृष्टी करू नये.


आणि तुझा देव परमेश्वर त्यांना तुझ्या हवाली करील व तू त्यांचा पराभव करशील, तेव्हा त्यांचा समूळ नाश कर; त्यांच्याशी करारमदार करू नकोस व त्यांच्यावर दया करू नकोस.


त्यांच्या देवांच्या कोरीव मूर्ती तुम्ही अग्नीत जाळून टाका; त्यांच्यावरील सोन्यारुप्याचा लोभ धरू नकोस व ते स्वतःकरता ठेवून घेऊ नकोस, घेशील तर त्यामुळे पाशात पडशील; कारण तुझा देव परमेश्वर ह्याला त्याचा वीट आहे.


कारण परमेश्वराचा असा हेतू होता की, आपण मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांचा समूळ नाश करावा, आणि त्यांना काहीच दयामाया न दाखवता त्यांचा संहार करावा. त्यांनी इस्राएलाशी युद्ध करायला बाहेर पडावे म्हणून त्याने त्यांची मने कठीण केली.


आपल्या पूर्वजांचा देव जो परमेश्वर, ज्याने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले त्याचा त्यांनी त्याग केला व ते अन्य देवांच्या म्हणजे सभोवतालच्या राष्ट्रांतील देवांच्या नादी लागून त्यांच्या चरणी लागले आणि तेणेकरून त्यांनी परमेश्वराला चीड आणली.


म्हणून मीही म्हणालो, मी त्या लोकांना तुमच्यासमोरून घालवून देणार नाही; ते तुमच्या कुशीला काट्यांसारखे होतील आणि त्यांचे देव तुम्हांला पाश होतील.”


ते त्यांच्या मुलींशी विवाह करू लागले, आपल्या मुली त्यांच्या मुलांना देऊ लागले आणि त्यांच्या देवांची सेवा करू लागले. कुशन-रिशाथईमच्या हातांतून अथनिएल इस्राएल लोकांना सोडवतो


गिदोनाने त्यांचे एक एफोद करून आपले नगर अफ्रा येथे ते ठेवले. सर्व इस्राएल लोक तेथे जाऊन व्यभिचारी मतीने त्या एफोदाच्या नादी लागले; ते गिदोन व त्याचे घराणे ह्यांना पाश असे झाले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan