Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 7:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 जो देश वतन करून घेण्यासाठी तू जात आहेस तेथे तुझा देव परमेश्वर तुला नेईल आणि तुमच्यापेक्षा मोठी आणि समर्थ अशी पुष्कळ राष्ट्रे म्हणजे हित्ती, गिर्गाशी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी ही सात राष्ट्रे तुमच्यासमोरून घालवून देईल;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 जो देश वतन करून घ्यायला तुम्ही निघाला आहात तेथे तुमचा देव परमेश्वर तुम्हास नेईल. आणि हित्ती, गिर्गाशी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी, यबूसी अशा तुमच्यापेक्षा मोठ्या आणि बलाढ्य अशा सात राष्ट्रांना तुमच्यासमोरून घालवून देईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 जेव्हा याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला त्या देशात घेऊन जातील, ज्याचा ताबा मिळविण्यासाठी तुम्ही जात आहात आणि तुमच्यापुढून—हिथी, गिर्गाशी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी या तुमच्यापेक्षा मोठ्या आणि बलाढ्य सात राष्ट्रांना हाकलून देतील—

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 7:1
35 Iomraidhean Croise  

नबाटाचा पुत्र यराबाम ह्याच्या पापकर्मांचे अनुकरण करणे ही क्षुल्लक गोष्ट आहे असे त्याला वाटले. त्याने सीदोन्यांचा राजा एथबाल ह्याची कन्या ईजबेल हिच्याशी लग्न केले, आणि तो बआलमूर्तीची सेवा व पूजा करू लागला.


यबूसी, अमोरी, गिर्गाशी,


हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी ह्यांच्यातले जे अवशिष्ट लोक इस्राएल लोकांपैकी नव्हते,


ह्या सर्व गोष्टी झाल्यावर सरदार माझ्याकडे येऊन म्हणू लागले, “इस्राएल लोक, याजक व लेवी हे देशोदेशींच्या लोकांपासून निराळे राहत नाहीत; ते कनानी, हित्ती, परिज्जी, यबूसी, अम्मोनी, मवाबी, मिसरी व अमोरी ह्यांच्याप्रमाणेच अमंगळ कृत्ये करतात.


त्या दिवसांत अश्दोदी, अम्मोनी व मवाबी स्त्रियांशी लग्ने केलेले यहूदी लोक मला आढळले;


त्याने त्यांच्यापुढून राष्ट्रे हाकून लावली, त्यांच्या राहण्याच्या जागा सूत्राने मापून त्यांना वतन म्हणून वाटून दिल्या, आणि त्यांच्या तंबूंत इस्राएलाचे वंश वसवले.


आपल्याविरुद्ध बंड करणार्‍यांना तू आपल्या महाप्रतापाने उलथून टाकतोस; तू आपला संताप भडकवतोस, तो त्यांना भुसाप्रमाणे भस्म करतो.


मी तुझ्यापुढे गांधीलमाशा पाठवीन; त्या हिव्वी, कनानी आणि हित्ती ह्यांना तुझ्यापुढून पळायला लावतील.


तू त्यांच्याशी किंवा त्यांच्या देवांशी काही करार करू नकोस.


ते तुझ्या देशात राहता कामा नयेत; राहिले तर ते तुला माझ्याविरुद्ध पाप करायला लावतील; कारण तू त्यांच्या देवांची सेवा करशील व ते तुला खात्रीने पाशासारखे होतील.”


मी तुझ्यापुढे एक दूत पाठवीन आणि कनानी, अमोरी, हित्ती, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी ह्यांना तेथून घालवून देईन.


आणि जो देश अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना देण्याची शपथ हात उभारून मी वाहिली होती त्यात मी तुम्हांला नेईन आणि तो तुम्हांला वतन करून देईन; मी परमेश्वर आहे.”’


“जो कनान देश मी तुम्हांला वतन म्हणून देत आहे त्यात तुम्ही जाऊन पोहचाल तेव्हा तुमच्या वतनाच्या देशातील एखाद्या घराला मी महारोगाचा चट्टा पाडला,


नेगेब प्रांतात अमालेकी राहतात; डोंगराळ प्रदेशात हित्ती, यबूसी आणि अमोरी हे राहतात; आणि समुद्रकिनार्‍यावर व यार्देनेच्या तीरावर कनानी लोकांची वस्ती आहे.”


ज्या तुमच्या मुलाबाळांविषयी तुम्ही म्हणालात की, ह्यांची लूट होईल, त्यांना मी त्या देशास नेईन आणि जो देश तुम्ही तुच्छ मानला आहे तो देश ते भोगतील;


नंतर त्याने कनान देशातील सात राष्ट्रांचा विध्वंस करून तेथील भूमी त्यांना सुमारे साडेचारशे वर्षेपर्यंत वतन अशी दिली.


जो देश ताब्यात घ्यायला तू जात आहेस तेथे तुझा देव परमेश्वर तुला नेऊन पोहचवील तेव्हा तू गरिज्जीम डोंगरावरून आशीर्वाद आणि एबाल डोंगरावरून शाप उच्चारावास.


तू आपल्या शत्रूंशी युद्ध करायला जाशील तेव्हा घोडे, रथ व तुझ्यापेक्षा मोठे सैन्य तुझ्या दृष्टीस पडल्यास त्यांना भिऊ नकोस, कारण तुझा देव परमेश्वर ज्याने तुला मिसर देशातून आणले तो तुझ्याबरोबर आहे.


पण तुझा देव परमेश्वर ह्या राष्ट्रांची जी नगरे तुला वतन म्हणून देत आहे त्यांतला कोणताही प्राणी जिवंत ठेवू नकोस.


कारण ज्या देशात दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत असा देश देण्याची शपथ मी त्यांच्या पूर्वजांशी वाहिली होती, त्यात मी त्यांना नेऊन पोहचवल्यावर ते पोटभर खाऊन माजतील, आणि मग अन्य देवांकडे वळून त्यांची सेवा करतील आणि मला तुच्छ लेखून माझा करार मोडतील.


तुझा देव परमेश्वर हा तुझ्यापुढे पलीकडे जाईल; तो त्या राष्ट्रांचा तुझ्यासमोर संहार करील व तू त्यांचा ताबा घेशील; परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे यहोशवा तुझ्यापुढे चालेल.


तुझ्यापेक्षा महान व सामर्थ्यवान राष्ट्रांना तुझ्यापुढून घालवून देऊन तुला त्यांच्या देशात न्यावे आणि त्यांची भूमी तुला वतन करून द्यावी, म्हणून त्याने तसे केले आहे; आज हे तुम्ही पाहतच आहात.


तुमचा देव परमेश्वर ह्याने जी आज्ञा आणि जे विधी व नियम तुम्हांला शिकवण्याची मला आज्ञा केली आहे ते हे : तुम्ही जो देश वतन करून घेण्यासाठी पैलतीरी जात आहात तेथे तुम्ही ते पाळावेत.


तुझा देव परमेश्वर ह्याने तुझ्या पूर्वजांना म्हणजे अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना जो देश तुला देण्याचे वचन दिले आहे त्यात तो तुला घेऊन जाईल; जी मोठी व सुंदर नगरे तू स्वतः वसवलेली नाहीत,


आणि परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे तुझे सर्व शत्रू तुझ्यापुढून घालवून देण्यात येतील.


आणि आपल्या पूर्वजांना शपथपूर्वक वचनाने देऊ केलेल्या देशात आम्हांला न्यावे म्हणून त्याने तेथून आम्हांला बाहेर काढले.


हे इस्राएला, श्रवण कर; तुझ्यापेक्षा महान व सामर्थ्यवान राष्ट्रे ताब्यात घेण्यास तू आज यार्देन उतरून जाणार आहेस; त्यांची नगरे मोठी व त्यांचे कोट गगनचुंबी आहेत;


तर आता हे पक्के लक्षात ठेव की, भस्म करणार्‍या अग्नीसारखा तुझ्यापुढे जो पलीकडे जात आहे तो तुझा देव परमेश्वर आहे; तो त्यांचा संहार करील व त्यांना तुझ्यापुढे चीत करील, आणि परमेश्वराने तुला सांगितल्याप्रमाणे तू त्यांना घालवून देऊन त्यांचा त्वरित नाश करशील.


तुझा देव परमेश्वर त्यांना तुझ्यापुढून घालवून देईल, तेव्हा आपल्या मनात म्हणू नकोस की, ‘माझ्या पुण्याईमुळे परमेश्वराने मला हा देश वतन करून घेण्यास येथे आणले आहे’; खरे पाहता ह्या राष्ट्रांच्या दुष्टाईमुळे परमेश्वर त्यांना तुझ्यासमोरून घालवून देत आहे.


आणि पूर्वेकडले व पश्‍चिमेकडले कनानी, तसेच अमोरी, हित्ती, परिज्जी व डोंगरवटीतले यबूसी आणि हर्मोन डोंगराच्या तळाशी मिस्पा प्रांतात राहणारे हिव्वी ह्यांना बोलावणे पाठवले.


तुम्ही यार्देन नदी उतरून यरीहोस आला तेव्हा यरीहोच्या नागरिकांनी आणि अमोरी, परिज्जी, कनानी, हित्ती, गिर्गाशी, हिव्वी व यबूसी ह्यांनी तुमच्याशी लढाई केली आणि मी त्यांना तुमच्या हाती दिले.


यहोशवा म्हणाला, “जिवंत देव तुमच्यामध्ये आहे आणि कनानी, हित्ती, हिव्वी, परिज्जी गिर्गाशी, अमोरी व यबूसी ह्यांना तो तुमच्यासमोरून खात्रीने हाकून देईल हे येणेप्रमाणे तुम्हांला कळून येईल :


Lean sinn:

Sanasan


Sanasan