Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 5:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 त्या अग्नीच्या भीतीने तुम्ही पर्वतावर चढला नाहीत, परमेश्वराचे वचन तुम्हांला प्रकट करावे म्हणून त्या प्रसंगी मी परमेश्वराच्या व तुमच्यामध्ये उभा राहिलो; तेव्हा तो म्हणाला,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 पण त्या अग्नीच्या भीतीने तुम्ही तो पर्वत चढला नाही. तेव्हा त्याचे म्हणणे तुमच्यापर्यंत पोचवायला मी तुम्हा दोघांच्यामध्ये उभा राहिलो. तेव्हा परमेश्वर म्हणाला,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 (त्यावेळी मी तुमच्या आणि याहवेहमध्ये उभा राहिलो आणि तुम्हाला याहवेहच्या वचनाची घोषणा केली, कारण तुम्हाला अग्नीची भीती वाटत असल्यामुळे तुम्ही पर्वतावर चढून त्यांच्यापर्यंत गेला नाही.) आणि ते म्हणाले:

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 5:5
15 Iomraidhean Croise  

तेथून ते पुरुष वळून सदोमाकडे चालते झाले; पण अब्राहाम तसाच परमेश्वरासमोर उभा राहिला.


त्याने उच्च स्थाने काढून टाकली, मूर्तिस्तंभ फोडले, अशेरा मूर्तींचा उच्छेद केला व मोशेने केलेल्या पितळी सर्पाचे चूर्ण केले; कारण, हा काळपावेतो इस्राएल लोक त्यापुढे धूप जाळत असत; त्याला नहुश्तान (पितळेचा तुकडा) हे नाव दिले होते.


तेव्हा तो म्हणाला, ह्यांचा नायनाट केला पाहिजे; पण त्याचा क्रोध शांत करावा, व त्याने त्यांचा नाश करू नये, म्हणून त्याचा निवडलेला मोशे त्याला आडवा आला.


तिसरा दिवस उजाडताच गडगडाट झाला व विजा चमकू लागल्या, पर्वतावर दाट ढग जमले व शिंगांचा फार मोठ्याने नाद होऊ लागला, तेव्हा छावणीतले सर्व लोक थरथरा कापू लागले.


परमेश्वर मोशेला म्हणाला, “खाली जाऊन लोकांना ताकीद दे, नाहीतर ते मर्यादा ओलांडून काय आहे ते पाहायला परमेश्वराकडे येतील आणि त्यांच्यापैकी पुष्कळ मरतील.


मग मोशेने खाली लोकांकडे जाऊन त्यांना हे सांगितले.


त्यांचा पुढारी त्यांच्यातलाच होईल, त्यांचा नियंता त्यांच्यातूनच निघेल; मी त्याला जवळ आणीन म्हणजे तो माझ्यासन्निध येईल, कारण माझ्यासन्निध येण्याचा कोणाच्या मनाला हिय्या झाला आहे, असे परमेश्वर म्हणतो.


मृत आणि जिवंत ह्यांच्यामध्ये तो उभा राहिला तेव्हा ती साथ थांबली.


तर मग नियमशास्त्र कशासाठी? ज्या संतानाला वचन दिले ते येईपर्यंत नियमशास्त्र हे उल्लंघनांमुळे लावून देण्यात आले; ते मध्यस्थाच्या हस्ते देवदूतांच्या द्वारे नेमून देण्यात आले.


म्हणून तू जवळ जा आणि आपला देव परमेश्वर जे काही बोलेल ते ऐकून घे; आणि मग आपला देव परमेश्वर तुला जे काही सांगेल ते आम्हांला सांग म्हणजे आम्ही ते ऐकून त्याप्रमाणे वागू.’


खर्‍या गोष्टींचे प्रतिरूप म्हणजे हातांनी केलेले पवित्रस्थान ह्यात ख्रिस्त गेला नाही, तर आपल्यासाठी देवासमोर उभे राहण्यास प्रत्यक्ष स्वर्गात गेला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan