Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 5:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 मोशेने सर्व इस्राएल लोकांना बोलावून सांगितले : “अहो इस्राएल लोकहो, जे विधी व नियम आज मी तुम्हांला ऐकवत आहे ते ऐका; तुम्ही ते शिका आणि काळजीपूर्वक पाळा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 मोशेने सर्व इस्राएल लोकांस एकत्र बोलवून सांगितले, “इस्राएल लोकहो, आज मी जे विधी आणि नियम सांगतो ते ऐका. तुम्ही ते शिका आणि त्यांचे काटेकोरपणे पालन करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 मोशेने सर्व इस्राएली लोकांना बोलाविले आणि म्हटले: इस्राएली लोकांनो, ज्या विधी व नियमांची आज मी घोषणा करीत आहे व तुम्हाला ऐकवीत आहे, ते शिका आणि निश्चितपणे त्याचे पालन करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 5:1
17 Iomraidhean Croise  

त्यांनी देवावर भाव ठेवावा, देवाची कृत्ये विसरू नयेत, तर त्याच्या आज्ञा पाळाव्यात;


“तू आपला देव परमेश्वर ह्याचे वचन मनापासून ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील, त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील, तर मिसरी लोकांवर जे रोग मी पाठवले त्यांपैकी एकही तुझ्यावर पाठवणार नाही; कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे.


विधी व नियम त्यांना शिकव. आणि त्यांनी कोणत्या मार्गाने चालावे, कोणते काम करावे हे त्यांना दाखवत जा.


म्हणून ते जे काही तुम्हांला सांगतील ते सर्व आचरत व पाळत जा; परंतु त्यांच्या कृतीप्रमाणे आचरण करू नका; कारण ते सांगतात पण तसे आचरण करत नाहीत.


यार्देनेच्या पूर्वेस रानातील अराबात सूफासमोर पारान, तोफेल, लाबान, हसेरोथ व दी-जाहाब ह्यांच्या दरम्यान जी वचने मोशे सर्व इस्राएलांशी बोलला ती ही.


म्हणून तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती करावीस आणि त्याने तुला लावून दिलेली व्यवस्था, त्याचे विधी, त्याचे नियम व त्याच्या आज्ञा नित्य पाळाव्यात.


जो देश तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला वतन म्हणून दिला आहे त्यात तुम्ही ह्या भूलोकी जिवंत राहाल तोपर्यंत हे विधी व हे नियम काळजीपूर्वक पाळावेत.


ती त्याच्याजवळ असावी, आणि त्याने तिचे जन्मभर अध्ययन करावे, म्हणजे त्या नियमशास्त्रातल्या सगळ्या आज्ञा व हे विधी पाळून व त्यांप्रमाणे आचरून तो आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळगायला शिकेल.


उलटपक्षी, तू आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकली नाही आणि त्याच्या ज्या सर्व आज्ञा व विधी पाळायला मी आज तुला सांगत आहे त्या तू काळजीपूर्वक पाळल्या नाहीस, तर पुढील सर्व शाप तुझ्यामागे येऊन तुला गाठतील :


तुम्ही सगळे आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर आज उभे आहात; तुमचे प्रमुख, तुमचे वंश, तुमचे वडील जन आणि तुमचे अंमलदार व सर्व इस्राएल लोक,


मोशेने सर्व इस्राएलाला बोलावून सांगितले : “परमेश्वराने मिसर देशात तुमच्यासमक्ष फारोचे व त्याच्या सर्व सेवकांचे व त्याच्या सर्व देशाचे काय केले ते सर्व तुम्ही पाहिलेच आहे;


आता, अहो इस्राएल लोकहो, जे विधी व नियम मी तुम्हांला शिकवत आहे ते पाळावेत म्हणून तुम्ही ते ऐकून घ्या म्हणजे तुम्ही जिवंत राहाल आणि तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर तुम्हांला जो देश देत आहे त्यात प्रवेश करून तो वतन करून घ्याल.


आणि पिसगाच्या उतरणीखाली अराबाच्या समुद्रा-पर्यंत यार्देनेच्या पूर्वेकडील सर्व अराबा.


पाहा, ज्या देशाचे वतन मिळवायला तुम्ही जात आहात त्यात पाळण्यासाठी आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेप्रमाणे मी तुम्हांला विधी व नियम शिकवले आहेत त्याप्रमाणे तुम्ही चालावे.


आपला देव परमेश्वर ह्याने होरेबात आपल्याबरोबर करार केला.


तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या आज्ञा, निर्बंध व विधी जपून पाळा.


नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे; त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश:प्राप्ती घडेल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan