Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 4:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 मात्र स्वतःविषयी सावधगिरी बाळग आणि स्वत:ला फार जप, नाहीतर तू ज्या गोष्टी डोळ्यांनी पाहिल्या आहेत त्या विसरून जाशील आणि जन्मभर त्या तुझ्या मनातून जातील; तू आपल्या पुत्रपौत्रांना त्यांची माहिती द्यावी;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 पण तुम्ही हे डोळ्यांत तेल घालून जपले पाहिजे. नाहीतर तुम्ही ज्या गोष्टी पाहिल्या आहेत त्या विसरून जाल. आपल्या मुला-नातवंडांना त्याची माहिती द्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 तुम्ही स्वतःबद्दल जागरूक असणे आणि स्वतःची काळजी घेणे खूप आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टी विसरून जाऊ नये आणि आयुष्यभर त्या तुमच्या स्मरणातून निघून जाऊ नये. तुम्ही ते तुमच्या पुत्रांना आणि त्यांच्यानंतर त्यांच्या पुत्रांना शिकवा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 4:9
47 Iomraidhean Croise  

मी त्याची निवड केली आहे ती अशासाठी की त्याने आपल्या लेकरांना व आपल्या पश्‍चात आपल्या घराण्याला आज्ञा द्यावी आणि त्यांनी न्यायनीतीने वागण्यासाठी परमेश्वराचा मार्ग आचरावा आणि हे अशासाठी की परमेश्वर अब्राहामाविषयी जे बोलला ते त्याने त्याला प्राप्त करून द्यावे.”


मी तुझ्याविरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे.


मी भावी पिढीला तुझे बाहुबल विदित करीपर्यंत पुढच्या पिढीतील सर्वांना तुझ्या पराक्रमाचे वर्णन करीपर्यंत, मी वयोवृद्ध होऊन माझे केस पिकले तरी, हे देवा, मला सोडू नकोस.


मी परमेश्वर आहे हे तुम्हांला कळावे म्हणून मी मिसर्‍यांची कशी फजिती केली आणि त्यांच्यामध्ये काय काय चिन्हे प्रकट केली ते तुझ्या पुत्रपौत्रांच्या कानी जाऊ दे.”


मी जे काही तुम्हांला सांगितले आहे त्या सगळ्यांविषयी सावध राहा; इतर देवांचे नावदेखील घेऊ नका, ते तुमच्या मुखातून ऐकू येऊ नये.


माझ्या मुला, आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नकोस;


माझ्या मुला, तू आपले चित्त मला दे, माझे मार्ग तुझ्या दृष्टीला आनंद देवोत.


माझ्या मुला, ती तुझ्या डोळ्यांआड होऊ देऊ नकोस; तू चातुर्य व विवेक ही सांभाळून ठेव.


माझ्या मुला, माझी वचने राखून ठेव, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेव.


जिवंत, जिवंत माणूसच तुझा धन्यवाद करतो तसा मी आज करीत आहे. बाप तुझे सत्य मुलास प्रकट करतो.


तू बहुत पाहिले आहे ते ध्यानात ठेवत नाहीस; त्याचे कान उघडे आहेत पण तो ऐकत नाही.


परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपणांविषयी सावध असा, शब्बाथ दिवशी काही ओझे वाहू नका, यरुशलेमेच्या वेशीतून ते आणू-नेऊ नका.


म्हणून तुम्ही कसे ऐकता ह्याविषयी जपून राहा; ज्याच्याजवळ आहे त्याला दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही त्याचे जे आहे म्हणून त्याला वाटते तेदेखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल.”


बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका; तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा.


तुम्ही तुमच्या मुलाबाळांना ती शिकवा आणि घरी बसलेले असताना, मार्गाने चालत असताना, निजताना, उठताना त्यांविषयी बोलत जा.


जो देश तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला वतन म्हणून दिला आहे त्यात तुम्ही ह्या भूलोकी जिवंत राहाल तोपर्यंत हे विधी व हे नियम काळजीपूर्वक पाळावेत.


त्याच्या मांसाबरोबर खमिराची भाकर खाऊ नये; सात दिवस तू त्याबरोबर बेखमीर भाकर म्हणजे दु:खस्मारकाची भाकर खावी, कारण तू मिसर देशातून धांदलीने बाहेर निघालास; ह्यामुळे मिसर देशातून निघाल्या दिवसाची तुला जन्मभर आठवण राहील.


ती त्याच्याजवळ असावी, आणि त्याने तिचे जन्मभर अध्ययन करावे, म्हणजे त्या नियमशास्त्रातल्या सगळ्या आज्ञा व हे विधी पाळून व त्यांप्रमाणे आचरून तो आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळगायला शिकेल.


गुप्त गोष्टी आपला देव परमेश्वर ह्याच्या स्वाधीन आहेत, पण प्रकट केलेल्या गोष्टी आपल्या व आपल्या वंशजांच्या निरंतरच्या आहेत; ह्याचा हेतू हा की, ह्या नियमशास्त्राची सर्व वचने आपण पाळावीत.


आता तुम्ही हे गीत लिहून घ्या, हे इस्राएल लोकांना शिकवा; त्यांना हे तोडपाठ करायला लावा, म्हणजे ते इस्राएल लोकांविरुद्ध माझ्या वतीने साक्ष देईल;


मग तो त्यांना म्हणाला, “ज्या गोष्टी आज मी तुम्हांला साक्षीदाखल सांगत आहे त्या सर्व लक्षात ठेवा; ह्या नियमशास्त्रातील सर्व गोष्टी काळजीपूर्वक पाळण्याची तुम्ही आपल्या मुलांना आज्ञा करा.


ज्या दिवशी तू होरेबाजवळ आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर उभा राहिलास त्या दिवशी परमेश्वर मला म्हणाला की, ‘ते इहलोकी असेपर्यंत त्यांनी माझे भय बाळगायला शिकावे व आपल्या मुलाबाळांनाही तसे शिकवावे म्हणून ह्या लोकांना माझ्याजवळ जमव म्हणजे मी आपली वचने त्यांना ऐकवीन.’


म्हणून तुम्ही अतिशय सावधगिरी बाळगा, कारण परमेश्वराने तुमच्याशी होरेब पर्वतावर अग्नीतून भाषण केले त्या दिवशी तुम्ही काही आकृती पाहिली नाही,


तुम्ही स्वत:विषयी सावधगिरी बाळगा; नाहीतर तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्याशी केलेला करार विसरून तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला मनाई केलेल्या एखाद्या वस्तूच्या आकाराची कोरीव मूर्ती कराल.


ज्या परमेश्वराने तुला मिसर देशातून, दास्यगृहातून बाहेर काढले त्याचा तुला विसर पडू नये म्हणून जप.


त्याचे जे सर्व विधी व आज्ञा मी तुला सांगत आहे त्या तू व तुझे पुत्रपौत्र ह्यांनी तुझा देव परमेश्वर ह्याचे भय बाळगून पाळाव्यात म्हणजे तू दीर्घायू होशील.


भविष्यकाळी तुझा मुलगा जेव्हा तुला विचारील की, ‘हे जे निर्बंध, विधी व नियम पाळण्याची आपला देव परमेश्वर ह्याने तुम्हांला आज्ञा केली आहे त्याचे प्रयोजन काय?’


आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव; आणि घरी बसलेले असताना, मार्गाने चालत असताना, निजताना, उठताना त्यांविषयी बोलत जा.


सावध राहा, नाहीतर ज्या आज्ञा, नियम व विधी मी आज तुला सांगत आहे ते पाळायचे सोडून तू आपला देव परमेश्वर ह्याला विसरशील.


तेव्हा तुझे मन उन्मत्त होऊ नये आणि तुझा देव परमेश्वर ज्याने तुला मिसर देशातून, दास्यगृहातून काढून आणले त्याला तू विसरू नयेस म्हणून सांभाळ.


ह्या कारणास्तव ऐकलेल्या गोष्टींकडे आपण विशेष लक्ष लावले पाहिजे, नाहीतर आपण त्यांपासून वाहवत जाऊ.


तर आपण एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आपला कसा निभाव लागेल? ते सांगण्याचा आरंभ प्रभूकडून झाला असून, ते ऐकणार्‍यांनी त्याविषयी आपल्याला प्रमाण पटवले;


विश्वास त्याच्या क्रियांसहित कार्य करत होता, आणि क्रियांनी विश्वास पूर्ण झाला, हे तुला दिसते.


तुझ्या आज्ञेविरुद्ध बंड करणार्‍या व तुझी सर्व आज्ञावचने न पाळणार्‍या प्रत्येकाला देहान्त शिक्षा द्यावी. तू मात्र खंबीर हो व हिम्मत धर.”


म्हणून तुमचा देव परमेश्वर ह्याच्यावर प्रेम करण्याची तुम्ही खबरदारी घ्या;


तो इस्राएल लोकांना म्हणाला की, “पुढे जेव्हा तुमची मुलेबाळे आपापल्या वडिलांना विचारतील, ‘ह्या धोंड्यांचे महत्त्व काय?’


म्हणून तू कसे स्वीकारलेस व ऐकलेस ह्याची आठवण कर; ते जतन करून ठेव व पश्‍चात्ताप कर; कारण तू जागृत झाला नाहीस तर मी चोरासारखा येईन; मी कोणत्या घटकेस तुझ्यावर चालून येईन हे तुला मुळीच कळणार नाही.


इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले, आपला देव परमेश्वर ह्याला ते विसरले आणि बआल व अशेरा ह्या मूर्तींची सेवा करू लागले;


इस्राएल लोकांचा देव परमेश्वर ज्याने त्यांना सभोवतालच्या सर्व शत्रूंच्या हातून सोडवले होते त्याची त्यांनी आठवण ठेवली नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan