Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 4:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 कारण आमचा देव परमेश्वर ह्याचा आम्ही धावा करतो तेव्हा तो आमच्याजवळ असतो. ह्याच्यासारखे देव जवळ असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहे?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 आपण आपला देव परमेश्वर ह्याचा धावा करतो तेव्हा तो आपल्या जवळच असतो, असे देव जवळ असणारे महान राष्ट्र दूसरे कोणते आहे?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 याहवेह आपले परमेश्वर जसे आपण त्यांना प्रार्थना करतो तेव्हा ते आपल्या समीप असतात त्याप्रमाणे दुसरे कोणते महान राष्ट्र आहे ज्याचे देव त्यांच्या समीप असतात?

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 4:7
20 Iomraidhean Croise  

तुझ्या इस्राएल प्रजेसमान भूतलावर दुसरे कोणते तरी राष्ट्र आहे काय? आपली प्रजा करून घेण्यासाठी इस्राएलास सोडवण्यास तू गेलास, आपले नाव केलेस, त्यांच्यासाठी महत्कृत्ये केलीस, आपल्या लोकांना मिसर देशातून इतर राष्ट्रांच्या व देवांच्या हातांतून सोडवून घेतले आणि त्यांच्यादेखत आपल्या देशासाठी भयानक कृत्ये केलीस; असे करायला कोणत्या राष्ट्राचा देव गेला होता?


जे कोणी त्याचा धावा करतात, जे खर्‍या भावाने त्याचा धावा करतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे.


कोणत्याही राष्ट्राबरोबर त्याने असे वर्तन केले नाही; त्याचे निर्णय ती जाणत नाहीत. परमेशाचे स्तवन करा!1


आणि त्याने आपल्या लोकांचा पुन्हा उत्कर्ष केला आहे;2 तो आपल्या सर्व भक्तांना, त्याच्याजवळ असलेल्या लोकांना म्हणजे इस्राएलाच्या संततीला स्तुतिपात्र आहे. परमेशाचे स्तवन करा!1


नीतिमान धावा करतात, तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटांतून मुक्त करतो.


परमेश्वर भग्नहृदयी लोकांच्या सन्निध असतो; अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करतो.


देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे; तो संकटसमयी साहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो.


माझ्याविषयी म्हटले तर देवाजवळ जाणे ह्यातच माझे कल्याण आहे; मी प्रभू परमेश्वराला आपले आश्रयस्थान केले आहे, ह्यासाठी की, मी तुझी सर्व कृत्ये जाहीर करावीत.


खरोखर त्याचे भय धरणार्‍यांना त्याने सिद्ध केलेले तारण समीप असते; ह्यासाठी की आमच्या देशात वैभव नांदावे.


तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस; तू मोठ्या योग्यतेचा आहेस व मी तुझ्यावर प्रेम करतो, म्हणून तुझ्याबद्दल माणसे व तुझ्या जिवाबद्दल राष्ट्रे मी देईन.


परमेश्वरप्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा; तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा;


त्याने याकोबात अनीती पाहिली नाही, त्याला इस्राएलात क्लेश दिसले नाहीत; त्याचा देव परमेश्वर त्याच्याबरोबर आहे; राजघोष त्याच्यामध्ये होत आहे.


डोंगरमाथ्यावरून ते माझ्या दृष्टीस पडत आहेत, टेकड्यांवरून मी त्यांना पाहत आहे; पाहा, हे राष्ट्र अलिप्त राहणारे आहे, ते स्वतःला अन्य राष्ट्रांबरोबर गणत नाही.


अशासाठी की, त्यांनी देवाचा शोध करावा, म्हणजे चाचपडत चाचपडत त्याला कसेतरी प्राप्त करून घ्यावे. तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही;


म्हणजे मी निर्माण केलेल्या सर्व राष्ट्रांपेक्षा प्रशंसा, नावलौकिक आणि सन्मान ह्या बाबतीत तुला श्रेष्ठ करीन आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे तू परमेश्वर आपला देव ह्याची पवित्र प्रजा होशील.”


हे इस्राएला, तू धन्य आहेस! परमेश्वराने उद्धरलेल्या राष्ट्रा, तुझ्यासमान कोण आहे? तो तुझ्या साहाय्याची ढाल आहे, तुझ्या प्रतापाची तलवार आहे. ह्यामुळे तुझे शत्रू तुला शरण येतील, तू त्यांची उच्च स्थाने पादाक्रांत करशील.”


देवाने पृथ्वीवर मानवाला निर्माण केले तेव्हापासून तुझ्या जन्मापर्यंत होऊन गेलेल्या काळात अशी मोठी गोष्ट कधी घडली होती किंवा ऐकण्यात आली होती काय, हे आकाशाच्या एका सीमेपासून दुसर्‍या सीमेपर्यंत विचारून पाहा.


अग्नीमधून निघणारी जिवंत देवाची वाणी ऐकून आम्ही जसे जिवंत राहिलो, तसा प्राणिमात्रांपैकी दुसरा कोण जिवंत राहिला आहे?


देवाजवळ या म्हणजे तो तुमच्याजवळ येईल. अहो पापी जनहो, हात निर्मळ करा; अहो द्विबुद्धीच्या लोकांनो, आपली अंतःकरणे शुद्ध करा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan