Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 4:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 जी आज्ञा मी तुम्हांला देत आहे तिच्यात काही अधिकउणे करू नका, अशासाठी की, तुमचा देव परमेश्वर ह्याच्या ज्या ज्या आज्ञा मी तुम्हांला देत आहे त्या तुम्ही पाळाव्यात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 माझ्या आज्ञांमध्ये तुम्ही कमी किंवा अधिक असे काही करु नका. अशासाठी की, तुमचा देव ह्याच्या ज्या आज्ञा मी तुम्हास देत आहे. त्या तुम्ही पाळाव्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञा मी तुम्हाला देत आहे त्यांचे तुम्ही फक्त पालन करा, त्यात काही भर घालू नका आणि काही कमी करू नका.

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 4:2
21 Iomraidhean Croise  

त्यांनी देवावर भाव ठेवावा, देवाची कृत्ये विसरू नयेत, तर त्याच्या आज्ञा पाळाव्यात;


त्याच्या वचनांत तू काही भर घालू नकोस, घालशील तर तो तुझा दोष उघड करील आणि तू लबाड ठरशील.


आता सर्वकाही तुम्ही ऐकले; सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे.


“परमेश्वर म्हणतो : परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात उभा राहा, व यहूदाच्या सर्व नगरांतून जे परमेश्वराच्या मंदिरात भजनपूजन करण्यास येतात त्यांना जे शब्द बोलण्याची मी तुला आज्ञा केली आहे ते सर्व त्यांना सांग, एकही शब्द गाळू नकोस.


कारण मी तुम्हांला खचीत सांगतो, आकाश व पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत सर्वकाही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही.


‘आपल्या शेजार्‍यावर प्रीती कर व आपल्या वैर्‍याचा द्वेष कर,’ असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे.


बंधुजनहो, मी व्यावहारिक दृष्टीने बोलतो; माणसांनी देखील कायम केलेला करार कोणी रद्द करत नाही किंवा त्यात भर घालत नाही.


चाळिसाव्या वर्षाच्या अकराव्या महिन्याच्या प्रतिपदेस जे काही इस्राएल लोकांना सांगावे म्हणून परमेश्वराने मोशेला आज्ञा केली होती, त्याप्रमाणे त्याने हे सर्व त्यांना सांगितले.


मी तुला आज्ञापीत आहे ती प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक पाळ; तिच्यात अधिकउणे काही करू नकोस.


तुमच्यामध्ये एखादा संदेष्टा अथवा स्वप्न पाहणारा प्रकट झाला व त्याने तुम्हांला काही चिन्ह अथवा चमत्कार दाखवला,


मोशेने आम्हांला नियमशास्त्र नेमून दिले, ते याकोबाच्या मंडळीचे वतन होय.


तुम्ही पैलतीरी जाऊन ज्या देशाचे वतन मिळवणार आहात त्यात तुम्ही त्या पाळाव्यात म्हणून परमेश्वराने त्या वेळेस तुम्हांला विधी व नियम शिकवण्याची मला आज्ञा केली.


तुझे व तुझ्यामागून तुझ्या वंशजांचे बरे व्हावे, आणि तुझा देव परमेश्वर जो देश तुला निरंतरचा देत आहे त्यात तू चिरकाळ राहावेस म्हणून आज मी तुला देत असलेले विधी आणि आज्ञा ह्यांचे पालन कर.”


पाहा, ज्या देशाचे वतन मिळवायला तुम्ही जात आहात त्यात पाळण्यासाठी आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेप्रमाणे मी तुम्हांला विधी व नियम शिकवले आहेत त्याप्रमाणे तुम्ही चालावे.


त्यांचे मन नेहमी असेच राहिले म्हणजे त्यांनी माझे भय धरून माझ्या सर्व आज्ञांचे पालन केले तर किती बरे होईल! तशाने त्यांचे व त्यांच्या संततीचे निरंतर कल्याण होईल.


म्हणून तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञा काळजीपूर्वक पाळा; उजवीडावीकडे वळू नका.


मात्र तू खंबीर हो व खूप हिम्मत धर, आणि माझा सेवक मोशे ह्याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ; ते सोडून उजवीडावीकडे वळू नकोस, म्हणजे जाशील तिकडे तू यशस्वी होशील.


इस्राएलाच्या सबंध मंडळीसमोर व त्यांच्या स्त्रिया, मुलेबाळे व त्यांच्यामध्ये राहणारे उपरे ह्यांच्यासमोर मोशेने दिलेल्या सगळ्या आज्ञा यहोशवाने वाचून दाखवल्या; त्यांतला एकही शब्द त्याने गाळला नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan