Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 4:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 तेव्हा परमेश्वराने त्या अग्नीमधून तुमच्याशी भाषण केले; तुम्ही बोलण्याचा आवाज ऐकला पण काही आकृती पाहिली नाही; वाणी मात्र ऐकली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 परमेश्वर त्या अग्नीतून तुमच्याशी बोलला. तुम्हास आवाज ऐकू आला पण तुम्ही कोणती आकृतीही पाहीली नाही, फक्त वाणी ऐकू आली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 मग याहवेह तुमच्याशी अग्नीतून बोलले, तुम्ही त्यांचे शब्द ऐकले, परंतु त्यांची आकृती तुम्हाला दिसली नाही; फक्त वाणी ऐकली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 4:12
24 Iomraidhean Croise  

मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “पाहा, मी दाट ढगातून तुझ्याकडे येतो ते ह्या हेतूने की, मी तुझ्याशी बोलत असताना लोकांनी ऐकावे आणि तुझ्यावरही नेहमी विश्वास ठेवावा.” मोशेने लोकांचे म्हणणे परमेश्वराला सांगितले.


तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू इस्राएल लोकांना असे सांग : मी तुमच्याशी आकाशातून भाषण केले ते तुम्ही प्रत्यक्ष पाहिले आहे.


“हाच मार्ग आहे; ह्याने चला,” अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल; मग तुम्हांला उजवीकडे जायचे असो किंवा डावीकडे जायचे असो.


तुम्ही देवाला कोणती उपमा द्याल? त्याच्याशी कोणती प्रतिमा लावून पाहाल?


घोषणा करणार्‍याची वाणी ऐकू येते की, “अरण्यात परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, आमच्या देवासाठी रानात सरळ राजमार्ग करा.


“घोषणा कर!” अशी वाणी ऐकू आली. तेव्हा कोणीएक म्हणाला, “काय घोषणा करू?” सर्व मानवजाती गवत आहे, तिची सर्व शोभा वनातल्या फुलासारखी आहे.


मी त्याच्याशी स्पष्टपणे तोंडोतोंड बोलत असतो, गूढ अर्थाने बोलत नसतो; परमेश्वराचे स्वरूप तो पाहत असतो; तर माझा सेवक मोशे ह्याच्याविरुद्ध बोलायला तुम्हांला भीती कशी नाही वाटली?”


तो बोलत आहे इतक्यात, पाहा, तेजस्वी मेघाने त्यांच्यावर छाया केली; आणि पाहा, मेघातून अशी वाणी झाली की, “हा माझा ‘पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे;’ ह्याचे तुम्ही ऐका.”


आणि पाहा, आकाशातून अशी वाणी झाली की, “हा माझा ‘पुत्र’, मला ‘परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.”’


त्याच्याचविषयी यशया संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले होते की, “अरण्यात घोषणा करणार्‍याची वाणी झाली की : परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा; त्याच्या वाटा नीट करा.”


मंडळी जमली होती त्या दिवशी जी दहा वचने परमेश्वराने पर्वतावर अग्नीतून तुम्हांला सांगितली होती तीच त्याने पहिल्याप्रमाणे ह्या पाट्यांवर लिहिली आणि त्या माझ्या स्वाधीन केल्या.


त्या दिवशी तुम्ही पुढे येऊन त्या पर्वताच्या पायथ्याशी उभे राहिलात, तेव्हा पर्वत पेटला होता आणि त्याच्या ज्वाला गगनमंडळ भेदून चालल्या होत्या आणि त्याच्यावर काळोख, मेघ व निबिड अंधकार पसरला होता.


त्याने तुम्हांला आपला करार विदित करून तो पाळण्याची आज्ञा केली; हा करार म्हणजे त्या दहा आज्ञा होत; त्या त्याने दोन दगडी पाट्यांवर लिहिल्या.


म्हणून तुम्ही अतिशय सावधगिरी बाळगा, कारण परमेश्वराने तुमच्याशी होरेब पर्वतावर अग्नीतून भाषण केले त्या दिवशी तुम्ही काही आकृती पाहिली नाही,


तुम्ही ऐकले त्याप्रमाणे देवाच्या वाणीचे शब्द ऐकूनही दुसरे कोणी लोक जिवंत राहिले आहेत काय?


तुला शिक्षण द्यावे म्हणून आकाशातून त्याने आपली वाणी तुला ऐकवली आणि पृथ्वीवर त्याने तुला आपला महाअग्नी दाखवला आणि अग्नीमधून निघालेले त्याचे शब्द तू ऐकलेस.


ही वचने परमेश्वराने त्या पर्वतावर अग्नी, मेघ व निबिड अंधकार ह्यांमधून तुमच्या सर्व मंडळीला मोठ्या आवाजात सांगितली; अधिक सांगितली नाहीत. त्याने दोन दगडी पाट्यांवर ती लिहून माझ्या हाती दिली.


परमेश्वराने त्या पर्वतावर अग्नीमधून तुमच्याशी तोंडोतोंड भाषण केले;


आणि देवाच्या बोटाने लिहिलेल्या दोन दगडी पाट्या परमेश्वराने मला दिल्या; आणि मंडळी जमली होती त्या दिवशी जेवढी वचने परमेश्वराने पर्वतावर अग्नीतून तुम्हांला सांगितली तेवढी सर्व त्या पाट्यांवर होती.


तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे; तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे;


कर्ण्याचा नाद व शब्दध्वनी ह्यांच्याजवळ तुम्ही आला नाहीत; तो ध्वनी ऐकणार्‍यांनी विनंती केली की, त्याच्या योगे आमच्याबरोबर अधिक बोलणे होऊ नये.


Lean sinn:

Sanasan


Sanasan