Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 4:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 त्या दिवशी तुम्ही पुढे येऊन त्या पर्वताच्या पायथ्याशी उभे राहिलात, तेव्हा पर्वत पेटला होता आणि त्याच्या ज्वाला गगनमंडळ भेदून चालल्या होत्या आणि त्याच्यावर काळोख, मेघ व निबिड अंधकार पसरला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 मग तुम्ही जवळ आलात व पर्वताच्या पायथ्याशी उभे राहिलात. तेव्हा डोंगर उभा पेटला होता व त्याच्या ज्वाला आकाशाला भिडल्या होत्या. सर्वत्र काळेकुट्ट ढग आणि अंधार पसरला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 मग तुम्ही जवळ येऊन त्या पर्वताच्या पायथ्याशी जाऊन उभे राहिलात आणि पर्वत अग्नीने पेटला होता, त्याची ज्वाला आकाशापर्यंत पोहोचली होती, सर्वत्र अंधार, ढग आणि घनदाट अंधकार पसरला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 4:11
10 Iomraidhean Croise  

तो आकाश लववून खाली उतरला; त्याच्या पायांखाली निबिड अंधकार होता.


भूमिकंपानंतर अग्नी प्रकट झाला; पण त्या अग्नीतही परमेश्वर नव्हता; त्या अग्नीनंतर शांत, मंद वाणी झाली.


त्याने आपणाला काळोखाने आच्छादून घेतले, त्याने आपणाला आकाशातील मेघमय अंधाराचा, दाट ढगांचा मंडप केला.


ढग व अंधार त्याच्याभोवती आहेत; नीती व न्याय त्याच्या राजासनाचा आधार आहेत.


मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “पाहा, मी दाट ढगातून तुझ्याकडे येतो ते ह्या हेतूने की, मी तुझ्याशी बोलत असताना लोकांनी ऐकावे आणि तुझ्यावरही नेहमी विश्वास ठेवावा.” मोशेने लोकांचे म्हणणे परमेश्वराला सांगितले.


तेव्हा परमेश्वराने त्या अग्नीमधून तुमच्याशी भाषण केले; तुम्ही बोलण्याचा आवाज ऐकला पण काही आकृती पाहिली नाही; वाणी मात्र ऐकली.


पर्वत अग्नीने जळत असता काळोखातून निघत असलेला त्याचा शब्द तुम्ही ऐकला तेव्हा तुम्ही म्हणजे तुमच्या वंशांचे सर्व प्रमुख व तुमचे वडील जन माझ्याजवळ आले;


Lean sinn:

Sanasan


Sanasan