Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 4:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 ज्या दिवशी तू होरेबाजवळ आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर उभा राहिलास त्या दिवशी परमेश्वर मला म्हणाला की, ‘ते इहलोकी असेपर्यंत त्यांनी माझे भय बाळगायला शिकावे व आपल्या मुलाबाळांनाही तसे शिकवावे म्हणून ह्या लोकांना माझ्याजवळ जमव म्हणजे मी आपली वचने त्यांना ऐकवीन.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 ज्या दिवशी तुम्ही सर्व होरेब पर्वतापाशी तुमचा देव परमेश्वर याच्यामोर उभे होता, तो दिवस आठवा. परमेश्वर मला म्हणाला होता, मला काही सांगायचे आहे तेव्हा सर्वांना एकत्र बोलाव, म्हणजे आयुष्यभर ते माझ्याबद्दल भय बाळगतील. आपल्या मुलाबाळांनाही तशीच शिकवण देतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 ज्या दिवशी तुम्ही होरेब पर्वताजवळ याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर उभे होता, त्या दिवसाविषयी त्यांना सांगा. त्या दिवशी याहवेहनी मला म्हणाले होते, “माझ्यासमोर सर्व लोकांना माझे शब्द ऐकण्यासाठी एकत्र कर, म्हणजे ते पृथ्वीवर जिवंत असेपर्यंत माझा आदर करतील आणि आपल्या मुलाबाळांना माझे शब्द शिकवतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 4:10
25 Iomraidhean Croise  

मी त्याची निवड केली आहे ती अशासाठी की त्याने आपल्या लेकरांना व आपल्या पश्‍चात आपल्या घराण्याला आज्ञा द्यावी आणि त्यांनी न्यायनीतीने वागण्यासाठी परमेश्वराचा मार्ग आचरावा आणि हे अशासाठी की परमेश्वर अब्राहामाविषयी जे बोलला ते त्याने त्याला प्राप्त करून द्यावे.”


एक पिढी दुसर्‍या पिढीपुढे तुझ्या कृत्यांची प्रशंसा करीत राहील, त्या तुझ्या पराक्रमाचे वर्णन करतील.


इस्राएल लोकांना मिसर देशातून निघून तीन महिने झाले त्याच दिवशी ते सीनायच्या रानात येऊन पोहचले.


तिसरा दिवस येईपर्यंत त्यांनी तयार राहावे, कारण तिसर्‍या दिवशी सर्व लोकांदेखत परमेश्वर सीनाय पर्वतावर उतरेल.


तिसरा दिवस उजाडताच गडगडाट झाला व विजा चमकू लागल्या, पर्वतावर दाट ढग जमले व शिंगांचा फार मोठ्याने नाद होऊ लागला, तेव्हा छावणीतले सर्व लोक थरथरा कापू लागले.


मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “पाहा, मी दाट ढगातून तुझ्याकडे येतो ते ह्या हेतूने की, मी तुझ्याशी बोलत असताना लोकांनी ऐकावे आणि तुझ्यावरही नेहमी विश्वास ठेवावा.” मोशेने लोकांचे म्हणणे परमेश्वराला सांगितले.


मेघगर्जना होत आहे, विजा चमकत आहेत, कर्ण्याचा नाद होत आहे आणि पर्वतातून धूर चढत आहे असे सर्व लोकांच्या दृष्टीस पडले तेव्हा त्यांचा थरकाप झाला व ते दूर उभे राहिले,


तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, “भिऊ नका. कारण तुमची परीक्षा पाहावी आणि त्याचे भय तुमच्या मनात राहून तुम्ही पाप करू नये ह्यासाठी देव आला आहे.


आता सर्वकाही तुम्ही ऐकले; सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे.


जिवंत, जिवंत माणूसच तुझा धन्यवाद करतो तसा मी आज करीत आहे. बाप तुझे सत्य मुलास प्रकट करतो.


आणि जे ‘त्याचे भय धरतात, त्यांच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या आहे.’


तुम्ही तुमच्या मुलाबाळांना ती शिकवा आणि घरी बसलेले असताना, मार्गाने चालत असताना, निजताना, उठताना त्यांविषयी बोलत जा.


जो देश तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला वतन म्हणून दिला आहे त्यात तुम्ही ह्या भूलोकी जिवंत राहाल तोपर्यंत हे विधी व हे नियम काळजीपूर्वक पाळावेत.


जे स्थान तुझा देव परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी निवडील तेथे आपले धान्य, द्राक्षारस व तेल ह्यांचा दशमांश आणि आपली गुरेढोरे व शेरडेमेंढरे ह्यांचे प्रथमवत्स आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर खा; असे केल्याने तू आपला देव परमेश्वर ह्याचे भय निरंतर बाळगण्यास शिकशील;


ती त्याच्याजवळ असावी, आणि त्याने तिचे जन्मभर अध्ययन करावे, म्हणजे त्या नियमशास्त्रातल्या सगळ्या आज्ञा व हे विधी पाळून व त्यांप्रमाणे आचरून तो आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळगायला शिकेल.


मात्र स्वतःविषयी सावधगिरी बाळग आणि स्वत:ला फार जप, नाहीतर तू ज्या गोष्टी डोळ्यांनी पाहिल्या आहेत त्या विसरून जाशील आणि जन्मभर त्या तुझ्या मनातून जातील; तू आपल्या पुत्रपौत्रांना त्यांची माहिती द्यावी;


आपला देव परमेश्वर ह्याने होरेबात आपल्याबरोबर करार केला.


त्यांचे मन नेहमी असेच राहिले म्हणजे त्यांनी माझे भय धरून माझ्या सर्व आज्ञांचे पालन केले तर किती बरे होईल! तशाने त्यांचे व त्यांच्या संततीचे निरंतर कल्याण होईल.


त्याचे जे सर्व विधी व आज्ञा मी तुला सांगत आहे त्या तू व तुझे पुत्रपौत्र ह्यांनी तुझा देव परमेश्वर ह्याचे भय बाळगून पाळाव्यात म्हणजे तू दीर्घायू होशील.


आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव; आणि घरी बसलेले असताना, मार्गाने चालत असताना, निजताना, उठताना त्यांविषयी बोलत जा.


जो बोलत आहे त्याचा अवमान करू नये म्हणून जपा; कारण पृथ्वीवर आज्ञा सांगणार्‍याचा अवमान करणारे जर निभावले नाहीत, तर स्वर्गातून आज्ञा सांगणार्‍यापासून बहकल्यास आपण विशेषेकरून निभावणार नाही.


इतक्यात ‘राजासनापासून’ वाणी झाली; ती म्हणाली, “अहो आमच्या देवाची ‘भीती बाळगणार्‍या सर्व लहानथोर दासांनो, त्याचे स्तवन करा.”’


मात्र तुम्ही परमेश्वराचे भय धरा व सत्याने व जिवेभावे त्याची सेवा करा; त्याने तुमच्यासाठी केवढी महत्कृत्ये केली आहेत ह्याचा विचार करा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan