Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 32:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 मी परमेश्वराच्या नावाची घोषणा करीन; आमच्या देवाची महती वर्णा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 मी परमेश्वराच्या नावाची घोषणा करीन. तुम्हीही परमेश्वराची महती गा!

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 मी याहवेहचे नाव जाहीर करेन. आपल्या परमेश्वराच्या महानतेची स्तुती गा!

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 32:3
23 Iomraidhean Croise  

हे परमेश्वरा, तुझ्या सेवकाप्रीत्यर्थ व तुझ्या मनोदयाप्रमाणे ह्या सगळ्या महान गोष्टी मला कळाव्यात म्हणून हे महत्कार्य तू केले आहेस.


दाविदाने सर्व मंडळीदेखत परमेश्वराचा धन्यवाद केला; तो म्हणाला, “हे परमेश्वरा, आमचा पिता इस्राएल ह्याच्या देवा, तू सदासर्वकाळ धन्य आहेस.


हे परमेश्वरा, महिमा, पराक्रम, शोभा, विजय व वैभव ही तुझीच; आकाशात व पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व तुझेच; हे परमेश्वरा; राज्यही तुझेच; तू सर्वांहून श्रेष्ठ व उन्नत आहेस.


तर आता आमच्या देवा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझ्या प्रतापी नामाची स्तुती करतो.


त्याच्या पराक्रमाच्या कृत्यांबद्दल त्याचे स्तवन करा; त्याच्या थोरवीच्या वैपुल्यानुसार त्याचे स्तवन करा.


माझ्यासाठी एक मातीची वेदी कर आणि तिच्यावर आपली शेरडेमेंढरे व गुरेढोरे ह्यांची होमार्पणे व शांत्यर्पणे कर, जेथे जेथे माझे नामस्मरण व्हावे असे मी करीन, तेथे तेथे मी तुझ्याकडे येऊन तुला आशीर्वाद देईन.


तो म्हणाला, “मी आपले सर्व चांगुलपण तुझ्यापुढे चालवीन; तुझ्यासमोर ‘परमेश्वर’ ह्या नावाची मी घोषणा करीन; ज्याच्यावर कृपा करावी असे वाटेल त्याच्यावर मी कृपा करीन आणि ज्याच्यावर दया करावी असे वाटेल त्याच्यावर दया करीन.


मी अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना सर्वसमर्थ1 देव म्हणून प्रकट झालो तथापि परमेश्वर2 ह्या माझ्या नावाने मी त्यांना ज्ञात नव्हतो.


हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोणीच नाही; तू थोर आहेस, पराक्रमामुळे तुझे नाम मोठे आहे.


त्याच्या दिवसांत यहूदा सुरक्षित होईल, इस्राएल निर्भय वसेल, व जे नाव त्याला देतील ते हे :‘परमेश्वर आमची नीतिमत्ता.’


“पाहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील.” ह्या नावाचा अर्थ, ‘आमच्याबरोबर देव.’


मी तुझे नाव त्यांना कळवले आहे आणि कळवीन; ह्यासाठी की, जी प्रीती तू माझ्यावर केलीस ती त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे.”


जे लोक तू मला जगातून दिलेस त्यांना मी तुझे नाव प्रकट केले; ते तुझे होते आणि तू ते मला दिलेस; आणि त्यांनी तुझे वचन पाळले आहे.


आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणांविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्त्व ते काय हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे.


‘हे प्रभू परमेश्वरा, तू आपल्या दासाला आपला प्रताप व आपला समर्थ हात दाखवू लागला आहेस; तुझ्यासारखी कार्ये करणारा व पराक्रम करणारा देव स्वर्गात किंवा पृथ्वीवर कोण आहे?


तेव्हा तुम्ही म्हणालात, ‘पाहा, आपला देव परमेश्वर ह्याने आम्हांला आपले तेज व महिमा प्रकट केला आहे, आणि अग्नीमधून निघत असलेला त्याचा शब्द आम्ही ऐकला आहे. आज आम्हांला हे दिसले की, देव मानवाशी बोलत असतानाही मानव जिवंत राहतो.


‘ते देवाचा दास मोशे ह्याचे गीत,’ व ‘कोकर्‍याचे गीत’ गाताना म्हणतात, “हे ‘प्रभू’ देवा, हे सर्वसमर्था, ‘तुझी कृत्ये थोर व आश्‍चर्यकारक आहेत;’ ‘हे राष्ट्राधिपते,’ ‘तुझे मार्ग नीतीचे व सत्य आहेत.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan