Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 32:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 पर्जन्याप्रमाणे माझ्या बोधाची वृष्टी होवो, माझे भाषण दहिवराप्रमाणे ठिबको; कोवळ्या गवतावर जशी पावसाची झिमझिम, हिरवळीवर जशा पावसाच्या सरी, तसे ते वर्षो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 पर्जन्याप्रमाणे माझ्या बोधाचा वर्षाव माझे भाषण दहीवराप्रमाणे ठिबको. तो बोध असेल जमिनीवरुन खळखळणाऱ्या पाण्यासारखा. हिरवळीवर रिझमझिमणाऱ्या पावसासारखा. झाडाझुडुपांवर पडणाऱ्या पावसाच्या सरीसारखा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 माझे शिक्षण तुमच्या कानावर पावसाच्या सरीप्रमाणे पडो, माझ्या शब्दांची दवाप्रमाणे पखरण होवो, नव्या गवतावर पडणार्‍या पावसाप्रमाणे, कोवळ्या रोपांवर पावसाच्या सरींप्रमाणे वृष्टी करोत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 32:2
14 Iomraidhean Croise  

सूर्योदयीच्या प्रभातेसारखा तो उदय पावेल, निरभ्र प्रभातेसारखा तो असेल, पर्जन्यवृष्टीनंतर सूर्यप्रकाशाने जमिनीतून हिरवळ उगवते तसा तो उगवेल.


तिच्या तासांना तू भरपूर पाणी देतोस; तिचे उंचवटे सपाट करतोस; तिला पावसाच्या सरींनी मऊ करतोस; तिच्यात उगवलेले अंकुर सफळ करतोस.


कापलेल्या गवतावर पडणार्‍या पर्जन्याप्रमाणे, भूमी सिंचन करणार्‍या सरींप्रमाणे तो उतरो.


कारण मी तुम्हांला उत्तम शिकवण देतो; माझे नीतिशिक्षण सोडू नका.


मी इस्राएलास दहिवरासारखा होईन; तो भूकमलाप्रमाणे फुलेल, लबानोनाप्रमाणे मूळ धरील.


हे एफ्राइमा, मी तुला काय करू? हे यहूदा, मी तुला काय करू? तुमचे चांगुलपण सकाळच्या अभ्राप्रमाणे, लवकर उडून जाणार्‍या दहिवराप्रमाणे आहे.


तर परमेश्वराचे वचन ऐक; तू म्हणतोस ‘इस्राएलाविरुद्ध संदेश सांगू नकोस, इसहाकाच्या घराण्याविरुद्ध शब्द काढू नकोस.”’


ते अश्शूर देश व निम्रोदाच्या भूमीचे प्रवेशमार्ग तलवारीने उद्ध्वस्त करतील; अश्शूर आमच्या देशात येईल, आमच्या सरहद्दीच्या आत चाल करून येईल, तेव्हा तो पुरुष त्याच्यापासून आमची सुटका करील.


जसे परमेश्वरापासून दहिवर येते व जसा गवतावर पाऊस पडतो आणि तो मनुष्यासाठी पडण्याचा थांबत नाही, किंवा मानवजातीसाठी खोळंबून राहत नाही, त्याप्रमाणे याकोबाचे अवशिष्ट लोक बहुत लोकांत पसरतील.


वीज उत्पन्न करणार्‍या परमेश्वराजवळ वळवाच्या पावसाच्या वेळी पाऊस मागा म्हणजे तो त्यांच्यावर वृष्टी करील; तो प्रत्येकाच्या शेतात गवत उपजवील,


कारण जी भूमी आपणावर वारंवार पडलेला पाऊस पिऊन आपली लागवड करणार्‍यांना उपयोगी अशी वनस्पती उपजवते, तिला देवाचा आशीर्वाद मिळतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan