Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 3:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 (हर्मोनाला सीदोनी लोक सिर्योन म्हणतात आणि अमोरी लोक सनीर म्हणतात.)

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 (सीदोनी लोक या हर्मोन पर्वताला सिर्योन म्हणतात. पण अमोरी लोक सनीर म्हणतात.)

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 (सीदोनी लोक हर्मोन पर्वतास सिर्योन असेही म्हणत, पण अमोरी लोक त्याला सनीर म्हणत असत.)

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 3:9
9 Iomraidhean Croise  

मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोकांनी त्या देशात वस्ती केली; बाशानापासून बाल-हर्मोन, सनीर, व हर्मोन पर्वत येथपर्यंत त्यांचा विस्तार झाला.


सीयोन डोंगरावर उतरणार्‍या हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे ते आहे; कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरवले आहे.


तो त्यांना वासराप्रमाणे उसळायला लावतो; लबानोन व शिर्योन ह्यांना रानबैलाच्या वत्साप्रमाणे उसळायला लावतो.


हे माझ्या देवा, माझा जीव आतल्या आत खिन्न झाला आहे, म्हणून यार्देनेच्या व हर्मोनाच्या प्रदेशात व मिस्हाराच्या डोंगराजवळ मी तुझे स्मरण करतो.


उत्तर व दक्षिण ह्या तू उत्पन्न केल्यास; ताबोर व हर्मोन तुझ्या नावाचा जयजयकार करतात.


अगे माझ्या वधू! लबानोनावरून माझ्याबरोबर, लबानोनावरून माझ्याबरोबर ये; अमानाच्या माथ्यावरून, सनीर व हर्मोन ह्यांच्या माथ्यांवरून, सिंहांच्या गुहांतून, चित्त्यांच्या पहाडांवरून तू नजर फेक.


त्यांनी सनीरच्या सरूंनी तुझी तक्तपोशी केली; तुझ्यासाठी डोलकाठी करावी म्हणून त्यांनी लबानोनाचे गंधसरू आणले.


तसेच सेईरच्या वाटेवरील हालाक डोंगरापासून हर्मोन पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या लबानोनाच्या खोर्‍यातील बाल-गाद येथपर्यंतचा सर्व प्रदेश त्याने हस्तगत केला; त्यांच्या सर्व राजांना त्याने धरून ठार मारले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan