Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 3:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 ही सर्व तटबंदी नगरे असून त्यांचे तट उंच होते आणि त्यांना वेशी व अडसर होते; ह्यांशिवाय तट नसलेली खेडीपाडी पुष्कळच होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 या सर्व नगरांना भक्कम तटबंदी होती. त्यांना उंच भिंती, वेशी, मजबूत अडसर होते. याव्यतिरिक्त तट नसलेली खेडी पुष्कळच होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 या सर्व शहरांच्या तटबंदी उंच व दरवाजे लोखंडी गजांचे होते. शिवाय बरीच तटबंदी नसलेली गावेही होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 3:5
8 Iomraidhean Croise  

त्यांनी तटबंदीची नगरे व सुपीक भूमी काबीज केली, आणि उत्तमोत्तम वस्तूंनी भरलेली घरे, खोदलेले हौद, द्राक्षांचे मळे, जैतुनांचे मळे व विपुल फळझाडे ह्यांचा ताबा घेतला; ते खाऊन तृप्त झाले, धष्टपुष्ट झाले आणि तुझ्या अतिशय चांगुलपणामुळे सुख पावले.


ह्याकरता खेडेगावचे यहूदी जे गावकूस नसलेल्या गावांत राहतात ते अदार महिन्याची चतुर्दशी आनंदोत्सवाचा मंगलदिन व एकमेकांना भेटीची ताटे पाठवण्याचा दिवस ठरवून पाळतात.


त्या देशाचे रहिवासी मात्र बलवान आहेत आणि तेथील नगरे तटबंदीची असून फार मोठी आहेत; तेथे अनाकाचे वंशजही आम्ही पाहिले.


आम्ही कोठे निघालो आहोत? तेथील लोक आमच्यापेक्षा धिप्पाड व उंच आहेत; तेथील नगरे मोठी असून त्यांचे तट गगनापर्यंत पोहचले आहेत आणि तेथे अनाकाचे वंशज आम्ही पाहिले, असे आमच्या भाऊबंदांनी आम्हांला सांगितले तेव्हा आमच्या हृदयाचे पाणीपाणी झाले.’


त्या वेळी आम्ही त्याची सर्व नगरे घेतली; आम्ही घेतले नाही असे त्यांचे एकही नगर राहिले नाही, आम्ही साठ नगरे घेतली, म्हणजे अर्गोबाचा सारा प्रदेश घेतला; बाशानातले ओगाचे राज्य ते हेच.


हेशबोनाचा राजा सीहोन ह्याच्या नगरांप्रमाणे त्या नगरांचाही आपण समूळ नाश केला; प्रत्येक नगराचा त्यातील पुरुष, स्त्रिया व मुलेबाळे ह्यांच्यासह समूळ नाश केला;


विश्वासाने यरीहोच्या गावकुसाभोवती सात दिवस फेर्‍या घालण्यात आल्यावर ते पडले.


ज्या मोठ्या धोंडेवर परमेश्वराचा कोश उतरला होता तेथवर पलिष्ट्यांच्या पाच सरदारांची जेवढी तटबंदीची नगरे व खेडीपाडी होती, तेवढ्या नगरांच्या संख्येइतके सोन्याचे उंदीर पाठवले होते; ती धोंड यहोशवा बेथ-शेमेशकर ह्याच्या शेतात आजपर्यंत आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan