अनुवाद 3:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 त्या वेळी आम्ही देश काबीज केला तो येणेप्रमाणे : आर्णोन खोर्याच्या कडेला असलेल्या अरोएर नगरापासून गिलादाच्या डोंगराळ प्रदेशाचा अर्धा भाग व त्यातील नगरे हा प्रदेश मी रऊबेनी व गादी ह्यांना दिला आहे; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 “तेव्हा ती जमीन आम्ही काबीज केली. रऊबेनी आणि गादी यांना त्यातील काही भाग मी दिला. तो असाः आर्णोन खोऱ्यातील अरोएर नगरापासून गिलादाच्या डोंगराळ प्रदेशाचा अर्धा भाग व त्यातील नगरे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 त्यावेळी आपण काबीज केलेला प्रदेश मी रऊबेन व गाद यांच्या वंशास दिला. रऊबेन व गादच्या वंशांना मी आर्णोन नदीवरील अरोएरापासून गिलआद पर्वताचा अर्धा भाग त्यातील शहरांसह दिला. Faic an caibideil |