अनुवाद 27:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आणि तू पलीकडे जाशील तेव्हा त्या धोंड्यांवर ह्या नियमशास्त्राची सर्व वचने लिहून काढ, म्हणजे जो देश तुझ्या पूर्वजांचा देव परमेश्वर आपल्या वचनाप्रमाणे तुला देत आहे व ज्यात दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत त्या देशात तुझा प्रवेश होईल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 त्या धोंडयावर या आज्ञा आणि शिकवणी लिहून काढा. यार्देन नदी उतरुन जाल त्यादिवशी हे करा. नंतरच परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे, तो देणार असलेल्या त्या दुधामधाच्या भूमीत पाऊल टाका. परमेश्वर, तुमच्या पूर्वजांचा देव ह्याने हा प्रदेश तुम्हास देण्यासाठी वचन दिले आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 त्यावर या नियमशास्त्राचे सर्व शब्द लिहून काढावे जेव्हा तुम्ही यार्देन नदी पार करून याहवेह तुमचे परमेश्वर देत असलेल्या वचनदत्त देशात जाल म्हणजे दुधामधाचे प्रवाह वाहणार्या अशा देशात जाल, जसे याहवेह तुमच्या पूर्वजांच्या परमेश्वराने तुम्हाला वचन दिले होते. Faic an caibideil |
कारण इस्राएल लोक रानात चाळीस वर्षे प्रवास करत होते; मिसर देशातून निघालेल्या सर्व राष्ट्राने म्हणजे युद्धास पात्र अशा पुरुषांनी परमेश्वराचे सांगणे न ऐकल्यामुळे, ह्या काळात त्यांचा संहार झाला होता; परमेश्वराने त्यांना शपथेवर सांगितले होते की, जो देश मी तुमच्या पूर्वजांना तुमच्यासाठी शपथेवर देऊ केला आहे आणि ज्यात दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत तो मी तुमच्या दृष्टीस पडू देणार नाही.