Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 26:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 तेव्हा परमेश्वराने पराक्रमी बाहूने व उगारलेल्या हाताने महाभयंकर उत्पात, चिन्हे व चमत्कार ह्यांच्या योगे आम्हांला मिसर देशातून बाहेर आणले;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 मग परमेश्वराने आपल्या प्रचंड सामर्थ्याने आम्हास मिसरमधून बाहेर आणले. तेव्हा त्याने मोठ्या भयानकपणाने चमत्कार व चिन्ह प्रताप दाखवले आणि उत्पात घडवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 मग याहवेहने महान चमत्कारांनी, सामर्थ्यशाली बाहुबलाने व पसरलेल्या हातांनी आणि भयावह चिन्ह व चमत्कार करून आम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 26:8
15 Iomraidhean Croise  

मग इस्राएल लोक रामसेस येथून कूच करून सुक्कोथ येथे गेले; जे पुरुष पायी गेले ते मुलाबाळांशिवाय सुमारे सहा लाख होते.


चारशे तीस वर्षे संपली त्याच दिवशी परमेश्वराच्या सर्व सेना मिसर देशातून निघाल्या.


त्याच दिवशी परमेश्वराने इस्राएल लोकांना टोळीटोळीने मिसर देशातून बाहेर आणले.


मोशे लोकांना म्हणाला, “ह्या दिवसाची आठवण ठेवा; ह्याच दिवशी तुम्ही मिसरातून, दास्यगृहातून बाहेर निघालात; परमेश्वराने आपल्या बलवान हाताने तुम्हांला ह्या ठिकाणातून बाहेर आणले म्हणून ह्या दिवशी खमिराची भाकर खायची नाही.


म्हणून इस्राएल लोकांना सांग, ‘मी परमेश्वर आहे; मी तुम्हांला मिसरी लोकांच्या बिगारीच्या ओझ्याखालून काढीन, त्यांच्या दास्यातून तुम्हांला मुक्त करीन आणि हात पुढे केलेल्या बाहूने व मोठ्या शिक्षा करून तुमचा उद्धार करीन;


ज्याने आपला प्रतापी भुज मोशेच्या उजव्या बाजूने चालवला, आपले नाम सर्वकाळ राहावे म्हणून ज्याने त्यांच्यापुढे समुद्र दुभागला,


तू चिन्हे व अद्भुत कृत्ये दाखवून समर्थ हाताने व बाहू उभारून मोठी दहशत घालून आपले लोक इस्राएल ह्यांना मिसर देशातून बाहेर आणलेस;


मिसर देशात फारो व त्याचे सर्व सेवक ह्यांच्यापुढे आणि सबंध देशभर जी सर्व चिन्हे व चमत्कार करायला परमेश्वराने त्याला पाठवले त्या बाबतीत,


आणि त्याने सर्व इस्राएलासमक्ष आपल्या हाताचा जो पराक्रम व जो भयंकर दरारा प्रकट केला त्या बाबतीत त्याच्यासमान कोणी झाला नाही.


त्याप्रमाणेच तुमचा देव परमेश्वर ह्याने मिसर देशातून तुमच्यासाठी तुमच्यादेखत संकटे, चिन्हे, चमत्कार, युद्धे, पराक्रमी बाहू आणि उगारलेला हात ह्यांच्या योगे भयप्रद कृत्ये केली तशी कृत्ये करून देवाने आपल्यासाठी एखादे राष्ट्र इतर राष्ट्रांमधून काढून घेण्याचा कधी प्रयत्न केला काय?


तू मिसर देशात दास होतास आणि तेथून तुझा देव परमेश्वर ह्याने तुला पराक्रमी बाहूंनी व उगारलेल्या हाताने बाहेर आणले ह्याची आठवण ठेव; म्हणूनच तुझा देव परमेश्वर ह्याने तुला शब्बाथ दिवस पाळण्याची आज्ञा केली आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan