Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 26:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तेव्हा तू आपला देव परमेश्वर ह्याच्यासमक्ष असे म्हण : ‘माझा मूळ पुरुष मरता मरता वाचलेला1 एक अरामी होता; तो मिसर देशात गेला व तेथे आपल्या लहानशा परिवारासह उपरा म्हणून राहिला; त्याच्यापासून तेथे एक महान, पराक्रमी व दाट वस्तीचे राष्ट्र उत्पन्न झाले;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 तेव्हा तुम्ही तुमचा देव परमेश्वर ह्यासमोर असे म्हणावे, “आमचा पूर्वज हा भटकणारा अरामी होता, तो खाली मिसरमध्ये जाऊन राहिला. तिथे पोहोंचला तेव्हा त्याचा परिवार लहान होता. पण मिसरमध्ये त्याचे महान व सामर्थ्यशाली राष्ट्र बनले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 नंतर तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर म्हणावेः “आमचे पूर्वज अरामी, हे निर्वासित होऊन आश्रयासाठी इजिप्त देशास गेले. ते संख्येने अगदी थोडे होते, पण इजिप्त देशात ते एक विशाल, बलाढ्य आणि थोर राष्ट्र बनले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 26:5
28 Iomraidhean Croise  

मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन; मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन; तू आशीर्वादित होशील;


तर माझ्या देशाला माझ्या आप्तांकडे जाऊन तेथून माझा मुलगा इसहाक ह्याच्यासाठी नवरी पाहून आणशील.”


इसहाक चाळीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने अरामी लाबान ह्याची बहीण पदन-अरामातील अरामी बथुवेल ह्याची कन्या रिबका ही बायको केली.


याकोबाला आपल्या बापाने आशीर्वाद दिला त्यामुळे एसावाने त्याच्याशी वैर धरले; एसावाने आपल्या मनात म्हटले, “माझ्या बापाचे सुतक धरण्याचे दिवस जवळ आले आहेत; त्यानंतर मी आपला भाऊ याकोब ह्याला जिवे मारीन.


अशा प्रकारे इसहाकाने याकोबाची रवानगी केली, आणि याकोब पदन-अराम येथे याकोब व एसाव ह्यांची आई रिबका हिचा भाऊ लाबान, जो अरामी बथुवेलाचा मुलगा, त्याच्याकडे गेला. एसाव दुसरी पत्नी करतो


ह्याप्रमाणे याकोबाने अरामी लाबानास फसवले; कारण आपण पळून जात आहोत हे त्याने त्याला कळू दिले नाही.


देवाने अरामी लाबानाला रात्री स्वप्नात येऊन सांगितले की, “सांभाळ, याकोबाला बरेवाईट काही बोलू नकोस.”


दिवसा उन्हाचा ताप व रात्री गारठा ह्यांनी मी जर्जर होई; माझ्या डोळ्यांची झोप उडे, अशी माझी दशा होती.


दुप्पट पैसा बरोबर न्या; तुमच्या गोण्यांच्या तोंडी जो पैसा परत आला तोही परत घेऊन जा, कदाचित काही चूक झाली असेल.


कारण पाच वर्षे दुष्काळ पडायचा आहे, तर येथे मी तुमचे संगोपन करीन; अशाने तुम्ही, तुमच्या घरचे लोक व तुमचा सर्व परिवार दरिद्री होणार नाही.


देवाने मला तुमच्यापुढे ह्यासाठी पाठवले की तुमचा पृथ्वीवर अवशेष ठेवावा; महान सुटकेद्वारे तुम्हांला वाचवावे आणि तुमची वंशवृद्धी होऊ द्यावी.


योसेफाला मिसर देशात झालेले दोन मुलगे हे मिळून याकोबाच्या घराण्यातले मिसर देशात आले ते एकंदर सत्तर जण होते.


इस्राएल लोक मिसर देशातल्या गोशेन प्रांतात वस्ती करून राहिले; तेथे त्यांनी वतने केली; ते फलद्रूप होऊन बहुगुणित झाले.


ते फारोला आणखी म्हणाले, “आम्ही ह्या देशात काही दिवस राहायला आलो आहोत. कनान देशात भारी दुष्काळ पडल्यामुळे आपल्या दासांच्या शेरडामेंढरांना चारा नाही, तर कृपा करून आपल्या दासांना गोशेन प्रांतात राहू द्यावे.”


पण जितके अधिक त्यांनी त्यांना जाचले, तितके अधिक ते वाढून बहुगुणित झाले व त्यांचा चोहोकडे विस्तार झाला. त्यांना इस्राएलवंशजांचा तिटकारा वाटू लागला;


याकोबापासून झालेले एकंदर सत्तर जण होते; योसेफ हा मिसरात होताच.


इस्राएलवंशज फलद्रूप झाले व अतिशय वृद्धी पावून बहुगुणित झाले; ते महाप्रबळ होऊन त्यांनी देश भरून गेला.


याकोब अरामाच्या रानात पळून गेला; इस्राएलाने बायकोसाठी चाकरी केली, बायकोसाठी मेंढरे राखली.


एका संदेष्ट्याच्या हस्ते परमेश्वराने इस्राएलास मिसर देशातून बाहेर आणले, दुसर्‍या संदेष्ट्याच्या हस्ते त्याचे रक्षण करवले.


ह्याप्रमाणे ‘याकोब मिसर देशात गेला’ आणि तेथे तो व आपले पूर्वजही ‘मरण पावले;


तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला बहुगुणित केले असून आज तुमची संख्या आकाशातील तार्‍यांइतकी आहे.


तुझे पूर्वज मिसर देशात गेले तेव्हा ते सत्तर जण होते; पण आता तुझा देव परमेश्वर ह्याने तुझी संख्या आकाशातील तार्‍यांप्रमाणे बहुगुणित केली आहे.


मग याजकाने तुझ्या हातून ती पाटी घेऊन तुझा देव परमेश्वर ह्याच्या वेदीसमोर खाली ठेवावी.


परमेश्वराने तुमच्यावर प्रेम करून तुम्हांला निवडले ह्याचे कारण तुम्ही संख्येने इतर राष्ट्रांपेक्षा पुष्कळ होता म्हणून नव्हे; उलट तुम्ही सर्व राष्ट्रांमध्ये संख्येने कमी होता;


Lean sinn:

Sanasan


Sanasan