Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 26:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 आणि तुझा देव परमेश्वर तुला जो देश देत आहे त्यातील जमिनीचे सर्व प्रकारचे प्रथमउत्पन्न तू घरी आणशील, तेव्हा त्यातले काही पाटीत घालून तुझा देव परमेश्वर ह्याने आपल्या नावाच्या निवासासाठी निवडलेल्या स्थानाकडे घेऊन जा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तेथील परमेश्वराने दिलेल्या शेतजमिनीचे सर्व प्रथम उत्पन्न गोळा करून घरी आणाल. तेव्हा पहिले पीक टोपल्यात भरुन त्या घेऊन तुमचा देव परमेश्वर ह्याने निवडलेल्या त्याच्या पवित्र निवासस्थानी जा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 तेव्हा याहवेह तुमच्या परमेश्वराने दिलेल्या भूमीतील प्रत्येक पिकाचे प्रथम उत्पन्न एका टोपलीत आणावे. नंतर याहवेह तुमचे परमेश्वर आपल्या नावासाठी जे वसतिस्थान निवडून देतील त्या ठिकाणी तुम्ही जावे

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 26:2
33 Iomraidhean Croise  

बआल-शालीशा येथील कोणी मनुष्य आपल्या प्रथमउपजातील जवाच्या वीस भाकरी आणि धान्याची हिरवी कणसे पोत्यात घालून देवाच्या माणसाकडे घेऊन आला. अलीशा त्याला म्हणाला, “ह्या माणसांना हे वाटून दे, त्यांना हे खाऊ दे.”


ही आज्ञा कानी पडताच इस्राएल लोक धान्य, द्राक्षारस, तेल, मध आदिकरून भूमीचा प्रथमउपज आणि सगळ्या उत्पन्नाचा दशमांश सढळ हाताने देऊ लागले.


परंतु यरुशलेम येथे माझे नाव असावे म्हणून मी ते निवडले आहे. माझे लोक इस्राएल ह्यांच्यावर मी दाविदाला निवडून नेमले आहे.’


याजक व लेवी ह्यांचे ठरलेले वाटे नगरोनगरीच्या शेतांप्रमाणे गोळा करावेत म्हणून त्या दिवशी भांडारे, परमेश्वराप्रीत्यर्थ समर्पित अंश, प्रथमफळे व दशमांश ह्यांच्या कोठड्यांवर लोक नेमण्यात आले; कारण याजक व लेवी हे हजर राहिल्याकारणाने यहूदास आनंद झाला होता.


मग लाकडाचे अर्पण व प्रथमउपज आणण्याची वेळ मी ठरवून दिली. हे माझ्या देवा, माझ्या हितार्थ माझे स्मरण ठेव.


माझ्यासाठी एक मातीची वेदी कर आणि तिच्यावर आपली शेरडेमेंढरे व गुरेढोरे ह्यांची होमार्पणे व शांत्यर्पणे कर, जेथे जेथे माझे नामस्मरण व्हावे असे मी करीन, तेथे तेथे मी तुझ्याकडे येऊन तुला आशीर्वाद देईन.


आपल्या शेताचा उपज व आपल्या फळांचे रस मला अर्पण करण्याची हयगय करू नकोस. तुझ्या मुलांपैकी प्रथमजन्मलेला मला द्यावा.


शेतात पेरलेल्या धान्याचे पहिले पीक तयार होईल तेव्हा तू कापणीचा सण पाळ, आणि वर्षअखेर तू आपल्या शेतातील श्रमाच्या फळांचा संग्रह करशील तेव्हा संग्रहाचा सण पाळ.


आपल्या जमिनीच्या प्रथमउत्पन्नातील सर्वोत्तम भाग आपला देव परमेश्वर ह्याच्या मंदिरात आणावा. करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये.


आपल्या जमिनीच्या प्रथमउत्पन्नातील सर्वोत्तम भाग आपला देव परमेश्वर ह्याच्या मंदिरात आणावा. करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये.”


इस्राएल परमेश्वराला पवित्र, त्याच्या उपजाचे प्रथमफळ असा होता; त्याला गिळून टाकणारे सर्व दोषी ठरले. त्यांच्यावर अरिष्ट आले, असे परमेश्वर म्हणतो.”


तर माझ्या पवित्र पर्वतावर, इस्राएलाच्या उंच पर्वतावर, इस्राएलाचे सर्व घराणे, त्यातले सगळे जण आपल्या देशात माझी सेवा करतील, असे प्रभू परमेश्वर म्हणतो; तेथे मी त्यांचा अंगीकार करीन; तेथे तुमच्याजवळ अर्पणे, तुमची श्रेष्ठ अर्पणे, समर्पित केलेल्या सर्व वस्तू मी मागेन.


सर्व प्रथमफळांचा प्रथमभाग, समर्पित अंश म्हणून अर्पण करायची प्रत्येक वस्तू याजकांची व्हावी; तुम्ही तिंबलेल्या कणकेचा पहिला गोळा याजकांना द्यावा म्हणजे तुमच्या घराला बरकत येईल.


त्यांनी त्यातला काही विकू नये व त्याची अदलाबदल करू नये; तसेच देशातील प्रथमफळे इतरांकडे जाऊ देऊ नयेत; कारण तो भाग परमेश्वराला पवित्र आहे.


प्रथमउत्पन्न म्हणून त्यांचे अर्पण परमेश्वराला करावे; पण ते सुवासिक हव्य म्हणून वेदीवर ठेवू नये.


परमेश्वराप्रीत्यर्थ तुला अन्नार्पण म्हणून प्रथमउपज अर्पायचा असेल तर विस्तवावर भाजलेल्या हिरव्या कणसांतले दाणे, म्हणजे हिरव्या कणसांचे चोळून काढलेले दाणे प्रथमउपजाचे अन्नार्पण म्हणून आण.


कणकेची पहिली मूठ पवित्र ठरल्यास गोळाही तसाच ठरेल, आणि मूळ जर पवित्र तर फांद्याही पवित्र ठरतील.


जी मंडळी त्यांच्या घरी जमत असते तिलाही सलाम सांगा; माझा प्रिय अपैनत ह्याला सलाम सांगा; तो ख्रिस्तासाठी आशिया देशाचे प्रथमफळ आहे.


इतकेच केवळ नव्हे, तर ज्या आपल्याला आत्मा हे प्रथमफळ मिळाले आहे ते आपणही स्वतः दत्तकपणाची म्हणजे आपल्या शरीराच्या मुक्तीची वाट पाहत असता आपल्या ठायी कण्हत आहोत.


तरीपण ख्रिस्त मेलेल्यांतून उठवला गेला आहेच; तो महानिद्रा घेणार्‍यांतले प्रथमफळ असा आहे.


पण प्रत्येक आपापल्या क्रमाप्रमाणे, प्रथमफळ ख्रिस्त; मग जे ख्रिस्ताचे ते त्याच्या आगमनकाळी.


आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही प्रत्येकाने जसे आपणाला यश मिळाले असेल3 त्या मानाने आपणाजवळ द्रव्य जमा करून ठेवावे; अशा हेतूने की, मी येईन तेव्हा वर्गण्या होऊ नयेत.


मग तुझा देव परमेश्वर ह्याने तुला समृद्ध केले असेल त्या मानाने त्याला तुझ्या हातचा स्वसंतोषाचा बली अर्पून तुझा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ सप्ताहांचा सण पाळ.


तुझे धान्य, नवा द्राक्षारस व तेल ह्यांचे प्रथमउत्पन्न आणि मेंढराची प्रथम कातरलेली लोकर तू त्याला द्यावी,


तुझा देव परमेश्वर जो देश तुला वतन म्हणून देत आहे त्यात पोहचल्यावर तू त्याचा ताबा घेऊन त्यात वस्ती करशील,


आणि त्या वेळी जो याजक असेल त्याच्याकडे जाऊन त्याला असे म्हण : ‘तुझा देव परमेश्वर ह्याच्यापुढे मी जाहीर करतो की, परमेश्वराने आम्हांला जो देश देण्याविषयी आमच्या पूर्वजांशी शपथ वाहिली होती त्यात मी आलो आहे.’


आपण त्याच्या सृष्ट वस्तूंतील जसे काय प्रथमफळ व्हावे, म्हणून त्याने स्वतःच्या इच्छेने आपल्याला सत्यवचनाने1 जन्म दिला.


मग इस्राएल लोकांची सर्व मंडळी शिलो येथे एकत्र झाली व तेथे त्यांनी दर्शनमंडप उभा केला; देश त्यांच्या हाती आला होता.


स्त्रीसंगाने मलिन न झालेले ते हेच आहेत, ते शुद्ध आहेत. जेथे कोठे कोकरा जातो तेथे त्याच्यामागे जाणारे ते हे आहेत. ते देवासाठी व कोकर्‍यासाठी प्रथमफळ असे माणसांतून विकत घेतलेले आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan