Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 26:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 आणि तुझा देव परमेश्वर ह्याने तुला व तुझ्या घराण्याला जे जे चांगले दिले आहे त्या सर्वांबद्दल आनंद कर; तुझ्याबरोबरचा लेवी व तुझ्याबरोबरचा उपरा ह्यांनीही त्यांचा आनंदाने उपभोग घ्यावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 त्यानंतर सर्वजण एकत्र भोजन करा. तुम्हास व तुमच्या कुटुंबियांना तुमचा देव परमेश्वर ह्याच्या कृपेने जे जे चांगले मिळाले त्याबद्दल आनंद व्यक्त करा. यामध्ये लेवी आणि गावातील परकीय यांनाही सामील करून घ्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 त्यानंतर याहवेह तुमच्या परमेश्वराने ज्या सर्व चांगल्या गोष्टी तुम्हाला दिल्या, त्याबद्दल तुम्ही, लेवी व परदेशी लोक या सर्वांनी मिळून आनंदोत्सव साजरा करावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 26:11
19 Iomraidhean Croise  

तेव्हा त्याने त्यांना सांगितले, “जा, मिष्टान्नाचे सेवन करा; गोडगोड पेये प्या व ज्यांच्या घरी काही तयार नसेल त्यांना वाढून पाठवा; कारण आजचा दिवस परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र आहे; तुम्ही उदास राहू नका; कारण परमेश्वराविषयीचा जो आनंद तोच तुमचा आश्रयदुर्ग होय.”


मनुष्याने आमरण सुखाने राहावे व हित साधावे यापरते इष्ट त्याला काही नाही हे मला कळून आले आहे.


तरी प्रत्येक मनुष्याने खावे, प्यावे व आपला सर्व उद्योग करून सुख मिळवावे हीही देवाची देणगी आहे.


मला जे बरे व मनोरम दिसून आले ते हे : मनुष्याने खावे, प्यावे व ह्या भूतलावर जे श्रम तो करतो त्या सर्वांत देवाने त्याला दिलेल्या आयुष्यभर सुख भोगावे; कारण एवढेच त्याच्या वाट्यास आहे.


संपत्काली आनंद कर; विपत्काली विवेकाने वाग; कारण मनुष्याच्या मागे काय होईल हे त्याला कळू नये म्हणून देवाने सुखदुःखे शेजारी-शेजारी ठेवली आहेत.


पाहा, माझे सेवक हर्षित चित्ताने जयजयकार करतील, पण तुम्ही खिन्न चित्ताने ओरडाल, भग्नहृदयी होऊन आकांत कराल.


त्यांची आबादानी केवढी! त्यांचे सौंदर्य केवढे! धान्य तरुणांना आणि नवा द्राक्षारस तरुणींना धष्टपुष्ट करील.


आम्ही तुमच्यासाठी आध्यात्मिक वस्तूंची पेरणी केल्यावर जर तुमच्या ऐहिक वस्तूंची कापणी केली तर त्यात काही मोठी गोष्ट आहे काय?


तेथे तुम्ही आपले मुलगे व मुली, दास व दासी ह्यांच्याबरोबर आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर आनंद करावा; तुमच्या वेशींच्या आत राहणार्‍या लेव्यासहित आनंद करावा, कारण तुमच्याबरोबर त्याला काही वाटा किंवा वतन नाही.


पण तुझा देव परमेश्वर जे स्थान निवडील तेथे तुझा देव परमेश्वर ह्याच्यासमोर खा; तू आपला मुलगा व मुलगी, आपले दास व दासी व आपल्या वेशीच्या आत असलेला लेवी ह्यांच्याबरोबर ती खा; आणि जे जे काम तू हाती घेशील त्या सर्वांबद्दल तुझा देव परमेश्वर ह्याच्यासमोर आनंद कर.


तेथे तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर भोजन करावे आणि ज्या ज्या कामात तुम्ही हात घातला व ज्यात तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला यश दिले त्या सर्वांबद्दल तुम्ही व तुमच्या घरच्या माणसांनी आनंद करावा.


तुझा देव परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी जे स्थान निवडील तेथे आपला मुलगा व मुलगी, दास व दासी, आणि तुझ्या गावातला लेवी, आणि तुमच्यामध्ये असलेला उपरा, अनाथ व विधवा ह्यांच्याबरोबर आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर आनंद कर.


तेथे शांत्यर्पणांचे यज्ञ करून भोजन कर आणि आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर आनंद कर.


कारण सर्व गोष्टींची समृद्धी असताना तू आनंदाने व उल्हासित मनाने आपला देव परमेश्वर ह्याची सेवा केली नाही,


प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा; पुन्हा म्हणेन, आनंद करा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan