Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 26:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 आता, हे परमेश्वरा, जमिनीचे प्रथमउत्पन्न, तू मला दिले आहेस त्यातले काही मी तुला आणले आहे.’ मग तू आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर ती पाटी खाली ठेवून त्याला दंडवत घाल;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 आता हे परमेश्वरा, त्या भूमीतील पहिले उत्पन्न आम्ही आणले आहे.” मग तो उत्पन्नाचा वाटा परमेश्वरासमोर ठेवून परमेश्वरास वंदन करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 आता, हे याहवेह परमेश्वरा, तुम्ही जी भूमी आम्हाला दिली आहे, त्यात उगविलेल्या धान्याचे प्रथम उत्पन्न आम्ही आणले आहे.” नंतर ते अर्पण तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरापुढे ठेवावे व त्यांची उपासना करावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 26:10
21 Iomraidhean Croise  

आम्हांला ह्या प्रकारे स्वेच्छेने अर्पणे करता यावीत असा मी कोण? व माझे लोक तरी कोण? सर्वकाही तुझ्यापासूनच प्राप्त होते; तुझ्याच हातून प्राप्त झालेले आम्ही तुला देत आहोत.


दिगंतरीचे सर्व जन परमेश्वराला स्मरून त्याच्याकडे वळतील; सगळी राष्ट्रकुले तुला दंडवत घालतील.


पृथ्वीवरील सर्व थोर लोक भोजन करतील व त्याला भजतील; धुळीस मिळणारे सर्व त्याला नमन करतील, ज्याला आपला जीव वाचवता येत नाही तोही नमेल.


हे प्रभू, तू उत्पन्न केलेली सर्व राष्ट्रे येऊन तुझ्या पाया पडतील, तुझ्या नावाचा महिमा गातील.


याहो या, परमेश्वर जो आपला उत्पन्नकर्ता त्याच्यापुढे आपण गुडघे टेकू; त्याची उपासना करू, त्याला नमन करू.


आपल्या शेताचा उपज व आपल्या फळांचे रस मला अर्पण करण्याची हयगय करू नकोस. तुझ्या मुलांपैकी प्रथमजन्मलेला मला द्यावा.


आपल्या जमिनीच्या प्रथमउत्पन्नातील सर्वोत्तम भाग आपला देव परमेश्वर ह्याच्या मंदिरात आणावा. करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये.


परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही.


तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथमफळाने परमेश्वराचा सन्मान कर;


असे होईल की, एका चंद्रदर्शनापासून दुसर्‍या चंद्रदर्शनापर्यंत, एका शब्बाथापासून दुसर्‍या शब्बाथापर्यंत सर्व मनुष्यजाती माझ्यापुढे भजनपूजन करण्यास येईल, असे परमेश्वर म्हणतो.


तेव्हा हे मानवा, दोष लावणारा तू कोणीही असलास तरी स्वतः तुला सबब नाही; कारण ज्यात तू दुसर्‍याला दोष लावतोस त्यात तू स्वतःला दोषी ठरवतोस; कारण दोषी ठरवणारा तूही त्याच गोष्टी करतोस.


म्हणून तुम्ही खाता, पिता किंवा जे काही करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा.


तुझे धान्य, नवा द्राक्षारस व तेल ह्यांचे प्रथमउत्पन्न आणि मेंढराची प्रथम कातरलेली लोकर तू त्याला द्यावी,


परमेश्वर हा आपला देव आहे असे मान्य करून तू आज वचन दिले आहेस की, मी तुझ्या मार्गांनी चालेन, तुझे विधी, आज्ञा व नियम पाळीन आणि तुझा शब्द मानीन.


आणि तुझा देव परमेश्वर तुला जो देश देत आहे त्यातील जमिनीचे सर्व प्रकारचे प्रथमउत्पन्न तू घरी आणशील, तेव्हा त्यातले काही पाटीत घालून तुझा देव परमेश्वर ह्याने आपल्या नावाच्या निवासासाठी निवडलेल्या स्थानाकडे घेऊन जा.


मग याजकाने तुझ्या हातून ती पाटी घेऊन तुझा देव परमेश्वर ह्याच्या वेदीसमोर खाली ठेवावी.


पण तू आपला देव परमेश्वर ह्याचे स्मरण ठेव, कारण त्याने तुझ्या पूर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार कायम राखण्यासाठी तोच तुला आजच्याप्रमाणे धनप्राप्ती करून घेण्याचे सामर्थ्य देत आहे.


परंतु तो मला म्हणाला, “असे करू नकोस; मी तुझ्या सोबतीचा, तुझे बंधू संदेष्टे व ह्या पुस्तकातील वचने पाळणारे लोक ह्यांच्या सोबतीचा दास आहे; नमन देवाला कर.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan