Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 21:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 मग जो गाव त्या प्रेताच्या सर्वांत जवळचा असेल त्यातल्या वडीलवर्गाने कामास कधी न लावलेली अथवा कधी न जुंपलेली अशी एक कालवड घ्यावी;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 मग जो गाव प्रेताच्या सर्वात जवळचा असेल तेथील वडिलधाऱ्यांनी आपल्या कळपातील एक कालवड निवडावी. कधीही कामाला न जुंपलेली व अजून न व्यायलेली अशी ती गाय असावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 नंतर मृतदेहाच्या सर्वात जवळ असलेल्या नगरातील वडीलजनांनी, कधीही कामास न लावलेली आणि पूर्वी कधीही जू न ठेवलेली अशी एक कालवड घ्यावी

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 21:3
8 Iomraidhean Croise  

मी एफ्राइमास खरोखर असा विलाप करताना ऐकले आहे की, ‘बेबंद वासरासारखा जो मी, त्या मला तू शिक्षा केलीस आणि मला शिक्षा झाली; तू मला वळव म्हणजे मी वळेन; कारण हे परमेश्वरा, तू माझा देव आहेस.


“परमेश्वराने दिलेल्या नियमशास्त्राचा विधी हा : इस्राएल लोकांना सांग की, निर्दोष व अव्यंग आणि जिच्यावर अद्याप जू ठेवले नाही अशी एक तांबड्या रंगाची कालवड माझ्याकडे घेऊन या;


परमेश्वराच्या कराराचा कोश वाहण्यासाठी परमेश्वरासमोर उभे राहून त्याची सेवा करायला व त्याच्या नावाने आशीर्वाद द्यायला त्या वेळेस परमेश्वराने लेवी वंशाला वेगळे केले; ते आजवर चालू आहे.


तर तुझ्यातील वडीलवर्ग व न्यायाधीश ह्यांनी तेथे जाऊन त्या प्रेताच्या सभोवार असलेल्या प्रत्येक गावाचे अंतर मोजावे;


आणि ज्यात नांगरणी पेरणी होत नसते व ज्यात पाणी सतत वाहत असते अशा खोर्‍यात तिची मान मोडावी;


आणि मनुष्यप्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले.


तर आता तुम्ही एक नवी गाडी तयार करा; आणि ज्यांच्यावर अद्यापि जू ठेवले नाही अशा दोन दुभत्या गाई घेऊन गाडीस जुंपा आणि त्यांची वासरे त्यांच्यापासून घरी घेऊन जा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan