Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 21:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 तुझा देव परमेश्वर जो देश तुला वतन करून घ्यायला देत आहे तेथे उघड्यावर कोणी मनुष्य मारून टाकलेला आढळला आणि त्याला कोणी मारले हे कळले नाही,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या प्रदेशात एखाद्याचा उघड्यावर खून झालेला आढळला आणि त्यास कोणी मारले हे कळाले नाही

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 याहवेह तुमच्या परमेश्वराने वतन म्हणून दिलेल्या देशात तुम्ही आल्यावर एखाद्या शेतामध्ये वध झालेला मनुष्यदेह तुम्हाला आढळला व त्याला कोणी मारले हे समजले नाही,

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 21:1
10 Iomraidhean Croise  

तो म्हणाला, “तू हे काय केलेस? ऐक! तुझ्या भावाचे रक्त भूमीतून माझ्याकडे ओरड करत आहे.


असत्य भाषण करणार्‍याचा तू नाश करतोस; खुनी व कपटी मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो.


कारण रक्तपाताचा सूड उगवणार्‍यास त्यांची आठवण आहे; तो दीनांचा आक्रोश विसरला नाही.


रक्तपाताच्या दोषाचा ज्याला भार झाला आहे. तो शवगर्तेकडे धावतो; त्याला धरू नकोस.


कारण पाहा, परमेश्वर पृथ्वीवरील रहिवाशांना त्यांच्या पापास्तव शासन करण्यास आपल्या स्थानाहून निघाला आहे. शोषलेले रक्त पृथ्वी प्रकट करील, वधलेल्यांना ती ह्यापुढे झाकून ठेवणार नाही.


ते जिवाणू त्याच्या हाताला लटकलेले पाहून बर्बर1 लोक एकमेकांना म्हणू लागले, “खरेच, हा माणूस घातकी आहे; हा समुद्रातून वाचला तरी न्यायदेवता त्याला जगू देत नाही.”


म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला वतन म्हणून देत आहे त्यात निर्दोष मनुष्याचा रक्तपात होणार नाही आणि त्याच्या हत्येचा दोष तुला लागणार नाही.


जी झाडे खाद्य म्हणून उपयोगाची नाहीत तीच तोडून त्यांचा नाश करावा. जे नगर तुझ्याशी युद्ध करीत असेल ते पडेपर्यंत त्या झाडांचे मोर्चे बनवून त्यावर लावावे.


तर तुझ्यातील वडीलवर्ग व न्यायाधीश ह्यांनी तेथे जाऊन त्या प्रेताच्या सभोवार असलेल्या प्रत्येक गावाचे अंतर मोजावे;


त्या वेळी मी तुम्हांला आज्ञा केली की, ‘तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला हा देश वतन म्हणून दिला आहे, तेव्हा तुम्ही सर्व योद्धे सशस्त्र होऊन आपल्या इस्राएल भाऊबंदांच्या आघाडीस पैलतीरी जा;


Lean sinn:

Sanasan


Sanasan