Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 20:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तुम्ही रणांगणावर जाल तेव्हा याजकाने लोकांकडे येऊन त्यांच्याशी बोलावे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तुम्ही युद्धावर जाल तेव्हा तुमच्या याजकाने आपल्या सैन्याकडे येऊन त्यांच्याशी बोलणे करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 तुम्ही युद्धाला सुरुवात करण्यापूर्वी, याजकाने पुढे यावे आणि सैन्याला सांगावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 20:2
9 Iomraidhean Croise  

पाहा, आमच्याबरोबर, आमच्यापुढे देव आहे; तुमच्याविरुद्ध लोकांना इशारा देण्यासाठी त्याचे याजक कर्णे हाती घेऊन असतात. इस्राएल लोकहो, तुम्ही आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याच्याशी लढू नका; तुम्हांला यश यायचे नाही.”


मोशेने प्रत्येक वंशातले एक हजार पुरुष घेऊन त्यांना आणि एलाजार याजकाचा मुलगा फीनहास ह्याला लढाईला पाठवले; आणि पवित्रस्थानातली पात्रे आणि इशारा देण्यासाठी रणशिंगे त्याच्या हवाली केली.


तू आपल्या शत्रूंशी युद्ध करायला जाशील तेव्हा घोडे, रथ व तुझ्यापेक्षा मोठे सैन्य तुझ्या दृष्टीस पडल्यास त्यांना भिऊ नकोस, कारण तुझा देव परमेश्वर ज्याने तुला मिसर देशातून आणले तो तुझ्याबरोबर आहे.


त्याने त्यांना म्हणावे, ‘इस्राएल लोकहो, ऐका; युद्ध करण्यास आज तुम्ही आपल्या शत्रूंच्या जवळ आला आहात; तुमचे मन कचरू देऊ नका, भिऊ नका, थरथर कापू नका, आणि त्यांना पाहून घाबरू नका;


मग शौल अहीयाला म्हणाला, “देवाचा कोश इकडे आण.” देवाचा कोश त्या समयी इस्राएल लोकांबरोबरच होता.


मग दावीद शौलाला म्हणाला, “त्या पलिष्ट्यामुळे कोणाही माणसाचे मन कचरू नये; आपला दास जाऊन त्याच्याशी लढेल.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan