Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 2:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 म्हणून सेईरचे रहिवासी आपले भाऊबंद जे एसावाचे वंशज ह्यांना चुकवून आपण अराबाच्या मार्गाने एलाथ व एसयोन-गेबर ही मागे टाकून पुढे गेलो. मग आपण वळून मवाबातील रानाकडल्या मार्गाने गेलो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 तेव्हा एसावचे वंशज राहत असलेल्या सेईर वरुन आपण गेलो. एलाथ आणि एसयोन-गेबेर वरून येणारा अराबाचा मार्ग आपण सोडला आणि मवाबाच्या रानातल्या रस्त्याला आपण वळालो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 म्हणून आम्ही सेईर येथे राहणाऱ्या एसावाच्या वंशातील भाऊबंदांच्या देशाला वळसा घालून दक्षिणेकडे एलाथ व एजिओन-गेबेरकडे जाणारा अराबाचा रस्ता पार करून उत्तरेकडे प्रवास करीत मोआब वाळवंटाकडे निघालो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 2:8
9 Iomraidhean Croise  

परमेश्वर तिला म्हणाला, “तुझ्या गर्भाशयात दोन राष्ट्रे आहेत; तुझ्या उदरातून दोन वंश निघतील; एक वंश दुसर्‍या वंशाहून प्रबळ होईल; आणि वडील धाकट्याची सेवा करील.”


मग शलमोन राजाने अदोम देशांत तांबड्या समुद्राच्या तीरी एलोथाजवळील एसयोन-गेबेर येथे गलबतांचा तांडा केला.


अमस्या राजा आपल्या पितरांजवळ जाऊन निजल्यावर अजर्‍याने एलाथाची मजबुती करून पुन्हा ते यहूदाच्या सत्तेत आणले.


त्या वेळी अरामाचा राजा रसीन ह्याने एलाथ नावाचे नगर सर करून पुन्हा अरामात सामील केले व तेथल्या यहूदी लोकांना हाकून दिले; अरामी लोक तेथे जाऊन राहिले, ते आजपर्यंत तेथेच राहत आहेत.


मग होर डोंगरापासून कूच करून अदोम देशाला वळसा घालून जाण्यासाठी त्यांनी तांबड्या समुद्राकडचा मार्ग धरला; त्या वाटेत लोकांचे मन अधीर झाले.


अब्रोना येथून कूच करून त्यांनी एसयोन-गेबेर येथे तळ दिला.


यार्देनेच्या पूर्वेस रानातील अराबात सूफासमोर पारान, तोफेल, लाबान, हसेरोथ व दी-जाहाब ह्यांच्या दरम्यान जी वचने मोशे सर्व इस्राएलांशी बोलला ती ही.


त्यानंतर त्यांनी रानातून फिरत फिरत अदोम व मवाब ह्या देशांना वळसा घालून मवाबाच्या पूर्वेकडून येऊन आर्णोन नदीपलीकडे तळ दिला. पण ते मवाबाच्या हद्दीत शिरले नाहीत; कारण आर्णोन नदी ही मवाबांची सरहद्द होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan