Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 2:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 कारण तुझा देव परमेश्वर ह्याने तुझ्या हातच्या सगळ्या कामाला यश दिले आहे; ह्या मोठ्या रानातली तुझी हालचाल त्याला ठाऊक आहे; आज ही चाळीस वर्षे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर आहे; तुला कशाचीही वाण पडली नाही.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 तुमच्या हातच्या सर्व कार्यात तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास आशीर्वादीत केले आहे. तुमच्या या रानातील वाटचालीकडे त्याचे लक्ष आहे. गेली चाळीस वर्षे तुमचा देव परमेश्वर तुमच्या सोबत राहीला आहे. तुम्हास कशाचीही वाण पडली नाही.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 याहवेह तुमच्या परमेश्वराने तुमच्या हाताच्या प्रत्येक कार्याला आशीर्वादित केले आहे. या विशाल अरण्यात तुमचे भटकणे त्यांनी पाहिले आहे, चाळीस वर्षे याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्याबरोबर आहेत व तुम्हाला कशाचेही उणे पडले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 2:7
31 Iomraidhean Croise  

मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन; मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन; तू आशीर्वादित होशील;


परमेश्वराने माझ्या धन्याचे फार कल्याण केले आहे; तो थोर झाला आहे; त्याने त्याला गुरे, मेंढरे, सोने, रुपे, दासदासी, उंट व गाढवे दिली आहेत.


इसहाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली आणि त्याला त्याच वर्षी शंभरपट पीक मिळाले, आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले;


तेव्हा लाबान त्याला म्हणाला, “तुझी माझ्यावर कृपादृष्टी असल्यास राहायचे कर; तुझ्यामुळे परमेश्वराने माझे अभीष्ट केले आहे हे मला शकुन पाहून कळले आहे.”


परमेश्वर त्याच्याबरोबर असल्याकारणाने जे काही तो हाती घेतो त्याला परमेश्वर यश देतो असे त्याच्या धन्याला दिसून आले.


आणि त्याने त्याच्या स्वाधीन आपले घरदार व सर्वकाही केले; तेव्हापासून योसेफासाठी परमेश्वराने त्या मिसर्‍याच्या घरादाराचे कल्याण केले; त्याचे घरदार व शेतीवाडी ह्या सर्वांस परमेश्वराने आशीर्वाद दिला.


चाळीस वर्षे जंगलात तू त्यांचे असे पालनपोषण केलेस की त्यांना कशाचीही वाण पडली नाही; त्यांची वस्त्रे जीर्ण झाली नाहीत; त्यांच्या पायांना सूज आली नाही.


परंतु माझा मार्ग त्याला कळला आहे; त्याने मला पारखून पाहिले म्हणजे मी सोन्यासारखा निघेन.


कारण नीतिमानांचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो.


काही जण अरण्यात वैराण प्रदेशातील वाटेने भटकले; त्यांना वस्तीचे नगर आढळले नाही.


मी तुझ्या वात्सल्यामुळे उल्लास व हर्ष पावेन; कारण तू माझी दैन्यावस्था पाहिली आहेस; माझ्या जिवावरील संकटे तुला अवगत आहेत.


परमेश्वर जो आमचा देव त्याचा प्रसाद आमच्यावर होवो; आमच्या हातचे काम आमच्यासाठी सिद्धीस ने, आमच्या हातचे काम सिद्धीस ने.


इस्राएल लोक वस्ती असलेल्या देशात जाऊन पोहचेपर्यंत चाळीस वर्षे मान्ना खात होते. कनान देशाच्या सरहद्दीपर्यंत जाऊन पोहचेपर्यंत ते मान्ना खात होते.


“जा, हे पुकारून यरुशलेमेच्या कानी पाड : परमेश्वर असे म्हणतो की, तुझे तारुण्यातले प्रेम, वाङ्निश्‍चयाच्या वेळचा तुझा अनुराग व रानात पडीत स्थळी तुझे माझ्यामागून येणे ह्यांचे मला स्मरण आहे.


मी रानात, रखरखीत प्रदेशात तुला खाऊ घातले.


मी तुम्हांला अमोरी लोकांच्या देशाचे वतन देण्यास मिसर देशातून आणले व चाळीस वर्षे रानातून फिरवले.


इस्राएल लोक मिसर देशातून निघाल्यावर दुसर्‍या वर्षाच्या दुसर्‍या महिन्याच्या प्रतिपदेस परमेश्वर सीनाय रानातील दर्शनमंडपात मोशेशी बोलला. तो म्हणाला,


तुमची प्रेते ह्या रानात नष्ट होईपर्यंत चाळीस वर्षे तुमची मुलेबाळे तुम्ही केलेल्या विश्वासघाताची शिक्षा भोगत रानात भटकणार्‍या मेंढपाळासारखी होतील.


देश हेरायला जे चाळीस दिवस लागले त्यांतील प्रत्येक दिवसामागे एक वर्ष ह्या हिशेबाने चाळीस वर्षे तुम्ही आपल्या दुष्कर्माचा भार वाहाल, आणि माझा विरोध तुम्हांला भोवेल.’


देव बलामास म्हणाला, “तू त्यांच्याबरोबर जाऊ नकोस व त्या लोकांना शाप देऊ नकोस, कारण ते आशीर्वादित लोक आहेत.”


परमेश्वराचा क्रोध इस्राएलावर भडकला आणि ज्यांनी परमेश्वराच्या दृष्टीने दुष्कर्म केले होते त्यांची सर्व पिढी नष्ट होईपर्यंत त्याने त्यांना रानात चाळीस वर्षे भटकायला लावले.


आणखी त्याने त्यांना म्हटले, “मी तुम्हांला पिशवी, झोळी व पायतणे घेतल्याशिवाय पाठवले तेव्हा तुम्हांला काही उणे पडले का?” ते म्हणाले, “नाही.”


माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात; मी त्यांना ओळखतो व ती माझ्यामागे येतात;


मग आपण होरेबाहून कूच करून आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेनुसार जे मोठे व भयानक रान अमोर्‍यांच्या पहाडी प्रदेशाकडे जाताना तुम्हांला लागले, ते सर्व ओलांडून कादेश-बर्ण्यापर्यंत पोहचलो.


तेव्हा तुम्ही कादेशात बरेच दिवस वस्तीस राहिलात, ते तुम्हांला ठाऊकच आहे.


आपण कादेश-बर्ण्या सोडून जेरेद नाल्यापलीकडे गेलो, त्याला अडतीस वर्षे लागली; ह्या अवधीत परमेश्वराने शपथ वाहिल्याप्रमाणे त्या सबंध पिढीतल्या योद्ध्यांचा छावणीत नाश झाला.


पैसे देऊन त्यांच्याकडून अन्न विकत घेऊन खा आणि पैसे देऊन त्यांच्याकडून पाणीही विकत घेऊन प्या.


पण आजपर्यंत परमेश्वराने तुम्हांला समजायला मन, पाहायला डोळे व ऐकायला कान दिले नाहीत.


मी तुम्हांला चाळीस वर्षे रानातून चालवले, पण तुमच्या अंगावरचे कपडे विरले नाहीत किंवा तुमच्या पायांतील पायतणे झिजली नाहीत.


कारण इस्राएल लोक रानात चाळीस वर्षे प्रवास करत होते; मिसर देशातून निघालेल्या सर्व राष्ट्राने म्हणजे युद्धास पात्र अशा पुरुषांनी परमेश्वराचे सांगणे न ऐकल्यामुळे, ह्या काळात त्यांचा संहार झाला होता; परमेश्वराने त्यांना शपथेवर सांगितले होते की, जो देश मी तुमच्या पूर्वजांना तुमच्यासाठी शपथेवर देऊ केला आहे आणि ज्यात दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत तो मी तुमच्या दृष्टीस पडू देणार नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan