Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 2:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 त्यांच्याशी झगडू नका, कारण त्यांच्या देशातली तसूभरही जमीन मी तुम्हांला देणार नाही; कारण सेईर डोंगर एसावाला वतन म्हणून मी दिला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 त्यांच्याशी भांडू नका. त्यांच्यातली तसूभरही जमीन मी तुम्हास देणार नाही. कारण सेईर डोंगर मी एसावाला वतन म्हणून दिला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 त्यांना लढाईला प्रवृत्त करू नका, कारण त्यांची भूमी मी तुम्हाला देणार नाही, मी तुम्हाला तिथे पाऊल ठेवण्यासही जागा देणार नाही. मी सेईर पर्वताचा मुलूख एसावाला दिला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 2:5
13 Iomraidhean Croise  

म्हणून एसाव सेईरच्या डोंगराळ प्रदेशात वस्ती करून राहिला. एसाव हाच अदोम.


सेईरच्या डोंगराळ प्रदेशात राहणार्‍या अदोमी लोकांचा मूळ पुरुष एसाव ह्याची वंशावळ :


मी आपल्या महाशक्तीने, आपले बाहू उभारून पृथ्वी आणि पृथ्वीच्या पाठीवर असलेली माणसे व पशू ह्यांना निर्माण केले आहे, व मला योग्य वाटेल त्यांना ती मी देतो.


“मानवपुत्रा, सेईर डोंगराकडे आपले तोंड कर व त्याच्याविरुद्ध संदेश दे;


आपणाला मनुष्यांतून घालवून देतील; आपली वस्ती वनपशूंत होईल; आपणाला बैलाप्रमाणे गवत खावे लागेल; आपण आकाशातील दहिवराने भिजाल; मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्याला देतो हे ज्ञान आपणाला होईपर्यंत आपणावरून सात काळ जातील.


तुला मनुष्यांतून घालवून देतील; तुझी वस्ती वनपशूंत होईल; तुला बैलाप्रमाणे गवत खावे लागेल; आणि मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्याला देतो हे ज्ञान तुला होईपर्यंत तुझ्यावरून सात काळ जातील.”


आणि त्याने एकापासून माणसांची सर्व राष्ट्रे निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या संबंध पाठीवर राहावे असे केले आहे; आणि त्यांचे नेमलेले समय व त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरवल्या आहेत;


पण त्यात त्याला वतन ‘दिले नाही, पाऊलभरदेखील जमीन दिली नाही;’ त्याला मूलबाळ नव्हते तरी हा देश ‘त्याचा व त्याच्यामागे त्याच्या संततीच्या स्वाधीन कायमचा करण्याचे’ अभिवचन देवाने त्याला दिले.


सेईर येथील एसावाच्या वंशजांकडून परमेश्वराने होरी लोकांचा संहार केला, तसाच त्याने ह्यांचाही केला; त्यांनी त्यांना हुसकावून लावून त्यांच्या जागी वस्ती केली, आणि आजपर्यंत ते तेथे वस्ती करून आहेत.


पैसे देऊन त्यांच्याकडून अन्न विकत घेऊन खा आणि पैसे देऊन त्यांच्याकडून पाणीही विकत घेऊन प्या.


जेव्हा परात्पराने राष्ट्रांना त्यांची वतने दिली, जेव्हा त्याने मानवांस निरनिराळे वसवले, तेव्हा त्याने इस्राएल लोकांच्या संख्येप्रमाणे राष्ट्रांच्या सीमा आखून दिल्या;


मग मी इसहाकाला याकोब व एसाव दिले, आणि एसावाला सेईर डोंगर वतन करून दिला; याकोब आपल्या मुलाबाळांसह मिसर देशास गेला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan