Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 2:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 अनाकी लोकांप्रमाणे त्यांनाही रेफाई म्हणतात, पण मवाबी लोक त्यांना एमी म्हणतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 या एमींना लोक अनाकी यांच्याप्रमाणेच रेफाई समजत असत. पण मवाबी लोक त्यांना एमी म्हणतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 एमी व अनाकी या दोन्हीही जमातीस पुष्कळदा रेफाईम असेही म्हणत, पण मोआबी मात्र त्यांना एमीच म्हणत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 2:11
10 Iomraidhean Croise  

चौदाव्या वर्षी कदार्लागोमर व त्याच्या पक्षाचे राजे ह्यांनी येऊन अष्टरोथ-कर्णईम येथे रेफाई लोकांना, हाम येथे जूजी लोकांना, किर्याथाईमच्या मैदानात एमी लोकांना


त्या काळी भूतलावर महाकाय1 होते; पुढे देवपुत्र मानवकन्यांपाशी गेले तेव्हा त्यांना पुत्र झाले. ते प्राचीन काळचे महावीर असून नामांकित पुरुष होऊन गेले.


तेव्हा रेफाई वंशातला इशबी-बनोब म्हणून एक इसम होता, त्याच्या भाल्याचे वजन तीनशे शेकेल पितळ भरले; त्याने नवी तलवार कंबरेला बांधली होती; त्याने दाविदाला मारायचा बेत केला;


ते नेगेब प्रांतातून हेब्रोनास गेले; तेथे अहीमान, शेशय आणि तलमय हे अनाकाचे वंशज राहत होते; हे हेब्रोन मिसरातील सोअनापूर्वी सात वर्षे आधी बांधले होते.


त्या देशाचे रहिवासी मात्र बलवान आहेत आणि तेथील नगरे तटबंदीची असून फार मोठी आहेत; तेथे अनाकाचे वंशजही आम्ही पाहिले.


तेथे नेफिलीम म्हणजे नेफिली घराण्यातील अनाकाचे वंशज आम्ही पाहिले; त्यांच्यापुढे आम्ही स्वतःच्या दृष्टीने टोळांसारखे दिसलो आणि त्यांनाही तसेच भासलो.”


आम्ही कोठे निघालो आहोत? तेथील लोक आमच्यापेक्षा धिप्पाड व उंच आहेत; तेथील नगरे मोठी असून त्यांचे तट गगनापर्यंत पोहचले आहेत आणि तेथे अनाकाचे वंशज आम्ही पाहिले, असे आमच्या भाऊबंदांनी आम्हांला सांगितले तेव्हा आमच्या हृदयाचे पाणीपाणी झाले.’


(त्यालासुद्धा ‘रेफाईचा देश’ म्हणतात; पूर्वी तेथे रेफाई राहत असत; अम्मोनी लोक त्यांना ‘जमजुम्मी’ म्हणतात;


(रेफाई लोकांपैकी शेष राहिला तो फक्‍त बाशानाचा राजा ओग. त्याचा पलंग लोखंडाचा होता; पाहा, तो अम्मोन्यांच्या राब्बा नगरात आहे ना? पुरुषाच्या हाताने त्याची लांबी नऊ हात व रुंदी चार हात आहे.)


तेथील लोक धिप्पाड व उंच असून अनाकी वंशातले आहेत हे तुला माहीतच आहे; ‘अनाकांच्या वंशजांशी कोण सामना करील’ असे म्हणतात हे तू ऐकलेच आहेस.


Lean sinn:

Sanasan


Sanasan