Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 18:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 त्यांच्या भाऊबंदांबरोबर त्यांना काही वतन मिळायचे नाही, पण परमेश्वराने त्यांना सांगितल्याप्रमाणे तो स्वत:च त्यांचे वतन आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 त्यांच्या इतर भाऊबंदाप्रमाणे लेवींना जमिनीत वतन नाही. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे खुद्द परमेश्वरच त्यांचे वतन होय.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 त्यांच्या इस्राएली भाऊबंदांप्रमाणे त्यांना वतन नसेल; कारण याहवेहच त्यांचे वतन आहेत, जसे त्यांनी त्यांना अभिवचन दिले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 18:2
15 Iomraidhean Croise  

ह्या गोष्टी घडल्यावर अब्रामाला दृष्टान्तात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे : “अब्रामा, भिऊ नको. मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल.”


परमेश्वर माझा वाटा आहे. तुझी वचने पाळण्याचा मी निश्‍चय केला आहे.


परमेश्वर माझ्या वतनाचा व प्याल्याचा वाटा आहे; माझा वाटा सांभाळणारा तूच आहेस.


कारण परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे, परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो; जे सात्त्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्यावाचून तो राहणार नाही.


तुम्हांला तर परमेश्वराचे याजक असे नाव पडेल, लोक तुम्हांला आमच्या देवाचे सेवक म्हणतील; राष्ट्रांची संपत्ती तुम्ही भोगाल, त्यांचे वैभव तुम्हांला प्राप्त झाल्याचा अभिमान वाहाल.


“परमेश्वर माझा वतनभाग आहे”, असे माझा जीव म्हणतो; म्हणून त्याच्या ठायी मी आशा ठेवीन.


त्यांना वतन काय म्हणाल तर मी त्यांचे वतन आहे; त्यांना इस्राएलात वाटा देऊ नये; त्यांचा वाटा मी आहे.


परमेश्वर अहरोनाला म्हणाला, “त्यांच्या जमिनीपैकी तुला काहीही वतन मिळणार नाही आणि त्यांच्यामध्ये तुला काही वाटाही मिळायचा नाही; इस्राएल लोकांमध्ये मीच तुझा वाटा व वतन आहे.


पण वेदीच्या संबंधात किंवा अंतरपटाच्या आतील सेवेच्या बाबतीत तू व तुझे मुलगे ह्यांनी आपले याजकपण सांभाळावे; तुम्ही सेवा करावी, कारण मी तुम्हांला दान म्हणून याजकपणाची ही सेवा दिली आहे; कोणी परका जवळ आला तर त्याला जिवे मारावे.”


ह्यामुळेच लेवीला त्याच्या भाऊबंदांबरोबर काही वाटा किंवा वतन मिळायचे नाही; तुझा देव परमेश्वर ह्याने त्याला सांगितल्याप्रमाणे परमेश्वरच त्याचे वतन आहे.


लेवी वंशाला मात्र मोशेने कोणतेही वतन दिले नाही; इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने सांगितल्याप्रमाणे त्याला वाहिलेली हव्ये ही त्यांचा वतनभाग होत.


तुम्हीही स्वतः जिवंत धोंड्यासारखे आध्यात्मिक मंदिर असे रचले जात आहात; ह्यासाठी की, येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पण करण्यासाठी तुम्ही पवित्र याजकगण व्हावे.


पण तुम्ही तर ‘निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र,’ देवाचे ‘स्वत:चे लोक’ असे आहात; ह्यासाठी की, ज्याने तुम्हांला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले ‘त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan