Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 17:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 म्हणजे माझ्या आज्ञांचे उल्लंघन करून अन्य देवांची अथवा सूर्य, चंद्र किंवा आकाशातील तारांगण ह्यांची सेवा व पूजा करू लागले,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 म्हणजे आज्ञांचे उल्लघंन करून ते सूर्य, चंद्र, किंवा आकाशातील तांरागण इतर दैवतांची पूजा करू लागले,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 आणि त्यांनी माझ्या आज्ञेच्या विरुद्ध अन्य दैवतांची उपासना केली, त्यांना किंवा सूर्य किंवा चंद्र किंवा आकाशातील तारे यांना नमन केले,

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 17:3
14 Iomraidhean Croise  

ह्याप्रमाणे आकाश व पृथ्वी आणि तेथील सर्वकाही सिद्ध झाले.


त्याचा बाप हिज्कीया ह्याने उच्च स्थाने उद्ध्वस्त केली होती ती त्याने पुन्हा बांधली; इस्राएलाचा राजा आहाब ह्याच्याप्रमाणे बआलमूर्तीसाठी वेदी बांधून त्याने एक अशेरामूर्ती केली; त्याप्रमाणेच तो नक्षत्रगणांची पूजा करत असे.


परमेश्वराशिवाय दुसर्‍या दैवतांना बली अर्पण करणार्‍याचा अगदी संहार करावा.


आणि बआलदैवताप्रीत्यर्थ आपले पुत्र होमार्पण म्हणून अग्नीत होम करण्यासाठी त्यांनी उच्च स्थाने बांधली; अशी आज्ञा मी केली नव्हती, हे मी सांगितले नव्हते, हे माझ्या मनातही आले नव्हते.


यहूदाला पापास प्रवृत्त करण्यासाठी मोलखाच्या मूर्तीला आपले पुत्र व कन्या होम करून अर्पाव्यात म्हणून बेन-हिन्नोमाच्या खोर्‍यात त्यांनी बालमूर्तीची उच्च स्थाने बांधली; हे मी त्यांना आज्ञापिले नव्हते; ते असले घोर कृत्य करतील हे माझ्या ध्यानीमनीही नव्हते.


आपल्या पुत्रांचा व आपल्या कन्यांचा अग्नीत होम करण्यासाठी बेन-हिन्नोमाच्या खोर्‍यातील तोफेतात त्यांनी उच्च स्थाने बांधली आहेत; मी त्यांना अशी आज्ञा केली नव्हती; ती माझ्या मनातही आली नव्हती.


त्या ते सूर्य, चंद्र व आकाशातील सर्व नक्षत्रगण ह्यांपुढे पसरतील; त्यांची तर त्यांनी आवड धरली, त्यांची सेवा केली, त्यांच्यामागे ते चालले, त्यांचा त्यांनी धावा केला व त्यांचे भजनपूजन केले; त्या अस्थी गोळा करून पुरणार नाहीत, तर त्या भूतलावर खत होतील.


तेव्हा त्याने मला परमेश्वराच्या मंदिराच्या आतल्या अंगणात नेले, तो पाहा, परमेश्वराच्या मंदिराच्या द्वारी देवडीच्या व वेदीच्या दरम्यान सुमारे पंचवीस इसम परमेश्वराच्या मंदिराकडे पाठ करून व पूर्वेकडे तोंड करून उभे होते; ते पूर्व दिशेस सूर्याची उपासना करीत होते.


तुम्ही सावध राहा, नाहीतर मनाला भुरळ पडून तुम्ही बहकून जाल, अन्य देवांची सेवा करू लागाल आणि त्यांना नमन कराल.


आणि हे तुला कोणी सांगितल्यावरून तुझ्या कानावर आले तर त्याची कसून चौकशी कर; आणि ते खरे ठरून इस्राएल लोकांत असले अमंगळ कृत्य घडल्याची तुझी खात्री झाली,


अथवा आकाशाकडे नजर लावून सूर्य, चंद्र, तारे अर्थात आकाशातील तारांगण पाहून बहकून जाऊन त्यांना दंडवत घालू नये व त्यांची पूजा करू नये; हे तुमचा देव परमेश्वर ह्याने आकाशाखालील सर्व लोकांना देऊन ठेवले आहेत.


तुमचा देव परमेश्वर ह्याने जो करार पाळण्याची तुम्हांला आज्ञा दिली आहे त्याचे उल्लंघन करून अन्य देवांची सेवा कराल व त्यांना दंडवत घालाल तर परमेश्वराचा कोप तुमच्यावर भडकेल आणि जो उत्तम देश त्याने तुम्हांला दिला आहे त्यातून तुमचा नायनाट त्वरित होईल.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan