Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 17:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तुझा देव परमेश्वर ह्याने तुला दिलेल्या नगरात कोणी पुरुष अथवा स्त्री तुझा देव परमेश्वर ह्याचा करार मोडून त्याच्या दृष्टीने काही दुष्कृत्य करताना आढळून आले,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या नगरात राहायला लागल्यावर एखादे दृष्कृत्ये घडल्याचे तुमच्या कानावर आले. परमेश्वराच्या कराराचा भंग केल्याचे पाप एखाद्या स्त्रीच्या किंवा पुरुषाच्या हातून झाल्याचे कळले. परमेश्वराच्या आज्ञेविरूद्ध,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 समजा याहवेहने तुम्हाला दिलेल्या देशातील एखाद्या नगरात तुमच्यातील कोणी पुरुष अथवा स्त्री याहवेह तुमच्या परमेश्वराच्या कराराविरुद्ध त्यांच्या दृष्टीने पातक करेल,

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 17:2
26 Iomraidhean Croise  

ह्याचे कारण हेच की त्यांनी आपला देव परमेश्वर ह्याची वाणी मानली नाही व त्याचा करार मोडला; परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने विहित केलेले सर्वकाही त्यांनी जुमानले नाही; ते, ते ऐकेनात व त्याप्रमाणे वागेनात.


त्याचा बाप हिज्कीया ह्याने उच्च स्थाने उद्ध्वस्त केली होती ती त्याने पुन्हा बांधली; इस्राएलाचा राजा आहाब ह्याच्याप्रमाणे बआलमूर्तीसाठी वेदी बांधून त्याने एक अशेरामूर्ती केली; त्याप्रमाणेच तो नक्षत्रगणांची पूजा करत असे.


तर हाही न्यायाधीशांपुढे नेण्याजोगा गुन्हा झाला असता; अशाने ऊर्ध्वलोकाच्या देवाशी मी दगा केला असे झाले असते.


पशुगमन करणार्‍याला अवश्य जिवे मारावे.


परमेश्वराशिवाय दुसर्‍या दैवतांना बली अर्पण करणार्‍याचा अगदी संहार करावा.


परमेश्वर म्हणतो मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यांना मिसर देशातून बाहेर आणले, तेव्हाच्या कराराप्रमाणे हा करार होणार नाही; मी त्याच्याबरोबर विवाह केला तरी तो माझा करार त्यांनी मोडला.


आणि ज्या मनुष्यांनी माझा करार उल्लंघला व माझ्यासमोर केलेल्या कराराच्या शर्ती पाळल्या नाहीत त्यांचे, जे वासरू त्यांनी कापून दुभागले व त्याच्या दोहो भागांमधून ते चालून गेले, त्या वासराप्रमाणे करीन.


जारिणी व रक्तपाती स्त्रिया ह्यांचा न्याय करावा तसा मी तुझा न्याय करीन आणि क्रोधाने व ईर्ष्येने मी तुझा रक्तपात करीन.


त्यांनी मनुष्याप्रमाणे1 करार मोडला आहे; तेथे ते माझ्याबरोबर बेइमानपणे वागले आहेत.


मुखाला कर्णा लाव. गरुडासारखा तो परमेश्वराच्या मंदिरावर उतरेल, कारण त्यांनी माझा करार मोडला आहे, माझ्या नियमशास्त्राचे त्यांनी अतिक्रमण केले आहे.


“इस्राएल लोकांना आणखी असे सांग की, इस्राएल लोकांपैकी अथवा इस्राएल लोकांमध्ये राहणार्‍या परदेशीयांपैकी कोणी आपले अपत्य मोलखास अर्पण केले तर त्याला अवश्य जिवे मारावे; आपल्या देशाच्या लोकांनी त्याला दगडमार करावा.


माझ्या विधींचा अव्हेर केला, तुमच्या जिवाने माझे निर्बंध तुच्छ मानले, आणि माझ्या सर्व आज्ञा अमान्य करून माझा करार मोडला,


मी तुमच्यावर तलवार आणीन, ती करार मोडल्याचा बदला घेईल; तुम्ही आपापल्या नगरात जमा व्हाल, तेव्हा मी तुमच्यावर मरी पाठवीन; मी तुम्हांला तुमच्या शत्रूच्या स्वाधीन करीन.


तर ज्या पुरुषाने अथवा ज्या स्त्रीने हे दुष्कृत्य केले असेल, त्या पुरुषाला अथवा त्या स्त्रीला वेशीत आण आणि त्या व्यक्तीला मरेपर्यंत दगडमार कर.


आज आपला देव परमेश्वर ह्याच्यापासून परावृत्त होऊन त्या राष्ट्रांच्या देवांची सेवा करायला आपले मन प्रवृत्त करील असा एखादा पुरुष, स्त्री, कूळ किंवा वंश तुमच्या लोकांत कदाचित असायचा! कोण जाणे! विष व कडूदवणा येणारे मूळ तुमच्यामध्ये असेल!


तेव्हा लोक म्हणतील की, ‘ह्यांच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याने मिसर देशातून ह्यांना काढून आणतेवेळी ह्यांच्याशी जो करार केला होता तो ह्यांनी मोडला,


कारण ज्या देशात दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत असा देश देण्याची शपथ मी त्यांच्या पूर्वजांशी वाहिली होती, त्यात मी त्यांना नेऊन पोहचवल्यावर ते पोटभर खाऊन माजतील, आणि मग अन्य देवांकडे वळून त्यांची सेवा करतील आणि मला तुच्छ लेखून माझा करार मोडतील.


तुम्ही स्वत:विषयी सावधगिरी बाळगा; नाहीतर तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्याशी केलेला करार विसरून तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला मनाई केलेल्या एखाद्या वस्तूच्या आकाराची कोरीव मूर्ती कराल.


मोशेच्या नियमशास्त्राचा कोणी भंग केला तर त्याच्यावर दया न होता ‘त्याला दोघांच्या किंवा तिघांच्या साक्षीवरून मरणदंड होतो.’


तुमचा देव परमेश्वर ह्याने जो करार पाळण्याची तुम्हांला आज्ञा दिली आहे त्याचे उल्लंघन करून अन्य देवांची सेवा कराल व त्यांना दंडवत घालाल तर परमेश्वराचा कोप तुमच्यावर भडकेल आणि जो उत्तम देश त्याने तुम्हांला दिला आहे त्यातून तुमचा नायनाट त्वरित होईल.”


इस्राएलाने पाप केले आहे; मी त्यांच्याशी केलेला करार त्यांनी मोडला आहे; समर्पित वस्तूंपैकी काही त्यांनी घेतल्या आहेत; एवढेच नव्हे तर त्यांनी चोरी व लबाडीही केली आहे, आणि त्या वस्तू आपल्या सामानामध्ये ठेवल्या आहेत.


ज्याच्याजवळ समर्पित वस्तू सापडतील त्याला त्याच्या सर्वस्वासह अग्नीने जाळून टाकावे, कारण त्याने परमेश्वराचा करार मोडला आहे, आणि इस्राएलमध्ये मूर्खपणा केला आहे.”


तेव्हा इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकून तो म्हणाला, “मी ह्या राष्ट्राच्या पूर्वजांशी केलेला करार ह्याने मोडला आहे आणि माझी वाणी ऐकली नाही.


तेव्हा योवाश आपल्यावर उठलेल्या सर्वांना म्हणाला, “तुम्ही बआलाची बाजू घेता काय? तुम्ही त्याचा बचाव करू पाहता काय? जो त्याची बाजू घेईल त्याला पहाटेपर्यंत ठार करण्यात येईल; तो जर देव असला तर त्याची वेदी पाडून टाकणार्‍याविरुद्ध त्याने स्वतःची बाजू लढवावी.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan