Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 17:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 दोष अथवा व्यंग असलेला गोर्‍हा किंवा मेंढरू तुझा देव परमेश्वर ह्याला अर्पू नकोस, कारण तुझा देव परमेश्वर ह्याला त्याचा वीट आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 परमेश्वरास यज्ञात अर्पण करायचा गोऱ्हा किंवा मेंढरू यांच्यात कोणतेही व्यंग असता कामा नये. कारण तुमचा देव परमेश्वर ह्याला त्याचा वीट आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराला दोष अथवा व्यंग असलेला बैल किंवा मेंढरू यांचे अर्पण कदापि करू नये; कारण त्याचा त्यांना वीट आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 17:1
19 Iomraidhean Croise  

पण त्यांतील एखाद्यात काही दोष असला, म्हणजे तो लंगडा किंवा आंधळा असला किंवा त्याच्यात दुसरे कोणतेही व्यंग असले तर त्याचे अर्पण तुझा देव परमेश्वर ह्याला करू नकोस.


तुम्ही आंधळा पशू अर्पण करता, हा अधर्म नव्हे काय? लंगडा किंवा रोगी असा बली देता, हा अधर्म नव्हे काय? असले अर्पण आपल्या प्रांताधिकार्‍यास देऊन तर पाहा; तो तुझ्यावर प्रसन्न होईल काय? अथवा तुझ्यावर त्याची मर्जी बसेल काय? असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


वेश्येच्या कमाईचा किंवा कुत्र्याच्या3 प्राप्तीचा पैसा कोणताही नवस फेडण्यासाठी तू आपला देव परमेश्वर ह्याच्या घरात आणू नकोस, कारण ह्या दोन्हींचाही तुझा देव परमेश्वर ह्याला वीट आहे.


तर तिला घालवून देणार्‍या पहिल्या नवर्‍याने ती भ्रष्ट झाल्यामुळे तिला पुन्हा बायको करून घेऊ नये, कारण परमेश्वराला ह्या गोष्टीचा वीट आहे. तुझा देव परमेश्वर जो देश तुला वतन म्हणून देत आहे त्या देशाला पापदोष लागण्यास कारण होऊ नकोस.


तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त, त्याच्या मूल्यवान रक्ताने ‘तुम्ही मुक्त झाला आहात.’


तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःस देवाला अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सदसद्विवेकबुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यांपासून किती विशेषेकरून शुद्ध करील?


दुर्जनाचा यज्ञ परमेश्वराला वीट आणतो, परंतु सरळाची प्रार्थना त्याला आनंद देते.


खोट्या तागडीचा परमेश्वराला वीट आहे, पण खरे वजन त्याला प्रिय आहे.


परमेश्वर ज्यांचा द्वेष करतो अशा सहा गोष्टी आहेत; नव्हे, त्याला अशा सात गोष्टींचा वीट आहे :


जे खोटी कामे करून अनीतीने वागतात त्या सर्वांचा तुझा देव परमेश्वर ह्याला वीट आहे.


कोकरू घ्यायचे ते निर्दोष असावे. तो एक वर्षाचा नर असावा; हा नर मेंढरांतला किंवा शेरडांतला, तुम्हांला वाटेल तो घ्यावा;


आणि त्यांच्यामागून दुबळ्या, अति कुरूप व रोड अशा दुसर्‍या सात गाई निघाल्या; त्यांच्यासारख्या बेढब गाई सार्‍या मिसर देशात मी कधी पाहिल्या नाहीत.


वजनावजनांत व मापामापांत फरक असणे ह्या दोहोंचा परमेश्वराला वीट आहे.


गुराढोरांतले होमार्पण अर्पायचे असल्यास त्याने दोषहीन नर अर्पावा; तो त्याने दर्शनमंडपाच्या दारापुढे अर्पावा, म्हणजे परमेश्वरासमोर तो मनुष्य मान्य होईल.


परमेश्वराला सुवासिक हव्य म्हणून होमार्पण करावे ते हे : एक गोर्‍हा, एक मेंढा आणि एकेक वर्षाची नरजातीची सात कोकरे अर्पावीत; ही दोषहीन असावीत;


त्यांच्या देवांच्या कोरीव मूर्ती तुम्ही अग्नीत जाळून टाका; त्यांच्यावरील सोन्यारुप्याचा लोभ धरू नकोस व ते स्वतःकरता ठेवून घेऊ नकोस, घेशील तर त्यामुळे पाशात पडशील; कारण तुझा देव परमेश्वर ह्याला त्याचा वीट आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan