अनुवाद 16:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्याच्या मांसाबरोबर खमिराची भाकर खाऊ नये; सात दिवस तू त्याबरोबर बेखमीर भाकर म्हणजे दु:खस्मारकाची भाकर खावी, कारण तू मिसर देशातून धांदलीने बाहेर निघालास; ह्यामुळे मिसर देशातून निघाल्या दिवसाची तुला जन्मभर आठवण राहील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 त्यावेळी खमीर घातलेली भाकर खाऊ नका. बेखमीर भाकरी तुम्ही सात दिवस खावी. ही भाकरी म्हणजे दु:ख स्मरणाची भाकर होय. त्याने तुम्हास मिसरमधील कष्टांची जन्मभर आठवण राहील. किती गडबडीने तुम्हास तो देश सोडावा लागला होता! त्याचा तुम्ही आमरण विसर पडू देऊ नका. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 ते खमीर असलेल्या भाकरीबरोबर खाऊ नये, परंतु सात दिवस तुम्ही बेखमीर भाकर खावी, ही तुमच्या क्लेशाची भाकर होय, कारण इजिप्त देश घाईघाईने सोडताना तुम्हाला खावी लागली होती—इजिप्तमधून तुमची सुटका झाली त्या वेळेची आठवण तुम्हाला आयुष्यभर राहील. Faic an caibideil |