Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 13:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 तर तू त्याच्या म्हणण्यास होकार देऊ नयेस आणि त्याचे ऐकू नयेस; त्याच्यावर दयादृष्टी करू नयेस, त्याची गय करू नयेस अथवा त्याला लपवून ठेवू नयेस;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 त्या व्यक्तीच्या म्हणण्याला मान्यता देऊ नका. त्याचे ऐकू नका. त्याची गय येऊ देऊ नका. त्यास मोकळा सोडू नका. तसेच त्यास लपवू नका.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 तर त्यांना संमती देऊ नका किंवा त्यांचे ऐकू नका. त्यांची गयही करू नका. त्यांना वाचवू नका किंवा संरक्षण देऊ नका.

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 13:8
13 Iomraidhean Croise  

माझ्याशिवाय तुला वेगळे देव नसावेत.


माझ्या मुला, पापी जन तुला भुलथाप देतील तर तिला वश होऊ नकोस.


प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, तू माझे पवित्रस्थान आपल्या सर्व तिरस्करणीय वस्तूंनी व अमंगळ कर्मांनी भ्रष्ट केले, म्हणून खातरीने मी तुझ्यावरची कृपादृष्टी काढून घेईन; गय करणार नाही, दया करणार नाही.


मग ते देव पृथ्वीच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत पसरलेल्या, आसपासच्या किंवा दूरदूरच्या राष्ट्रांचे असोत म


त्याच्यावर दयादृष्टी करू नकोस, पण निरपराध माणसाच्या हत्येचा दोष इस्राएलातून काढून टाक, म्हणजे तुझे कल्याण होईल.


पृथ्वीच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत, सर्व राष्ट्रांमध्ये परमेश्वर तुमची पांगापांग करील, आणि तेथे तुम्हांला व तुमच्या पूर्वजांना अपरिचित अशा काष्ठपाषाणमय म्हणजे अन्य देवांची सेवा तुम्ही कराल.


देव नाहीत अशा भुतांना, जे अलीकडेच नवीन निघाले आहेत, ज्यांना तुमचे पूर्वज भीत नव्हते, अशा अपरिचित देवांना त्यांनी बली अर्पण केले.


जी राष्ट्रे तुझा देव परमेश्वर तुझ्या हाती देईल त्या सर्वांचा संहार कर; त्यांची कीव करू नकोस; त्यांच्या देवांची सेवा करू नकोस, तसे करणे तुला पाशवत होईल.


आणि तुझा देव परमेश्वर त्यांना तुझ्या हवाली करील व तू त्यांचा पराभव करशील, तेव्हा त्यांचा समूळ नाश कर; त्यांच्याशी करारमदार करू नकोस व त्यांच्यावर दया करू नकोस.


मुलांनो, तुम्ही स्वतःस मूर्तींपासून दूर राखा.


मग इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते पुन्हा केले; बआलीम व अष्टारोथ ह्या दैवतांची आणि अराम, सीदोन, मवाब, अम्मोनी व पलिष्टी ह्या सर्वांच्या दैवतांची ते सेवा करू लागले; त्यांनी परमेश्वराचा त्याग केला; त्याची सेवा ते करीनात,


Lean sinn:

Sanasan


Sanasan