Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 13:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 त्या संदेष्ट्याला किंवा स्वप्न पाहणार्‍याला जिवे मारावे; कारण तुमचा देव परमेश्वर ज्याने तुम्हांला मिसर देशातून बाहेर आणले व दास्यगृहातून सोडवले, त्या तुमच्या परमेश्वर देवाने नेमून दिलेला मार्ग तुम्ही सोडावा म्हणून तो तुम्हांला फितवतो. अशा प्रकारे तुम्ही आपल्यामधून ह्या दुष्टाईचे निर्मूलन करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 तसेच त्या संदेष्ट्याला किंवा स्वप्न सांगणाऱ्याला ठार मारा. कारण तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास मिसर देशात तुम्ही गुलाम होता तेव्हा तेथून सोडवले आहे. परमेश्वर देवाने आज्ञा देऊन नेमून दिलेल्या जीवनमार्गापासून हा मनुष्य तुम्हास दूर नेतो म्हणून आपल्यामधून तुम्ही या दुष्टाईचे निर्मूलन करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 जो संदेष्टा किंवा स्वप्नदर्शी तुम्हाला बहकवील त्याला अवश्य जिवे मारावे, कारण ज्या याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला इजिप्त देशातील गुलामगिरीतून बाहेर काढले, त्यांच्याविरुद्ध बंड करण्यास त्याने तुम्हाला प्रवृत्त केले. तुम्ही स्वतःला या दुष्टाईपासून मुक्त केले पाहिजे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 13:5
34 Iomraidhean Croise  

त्याने त्याच्याबरोबर परत जाऊन त्याच्या घरी अन्नपाणी सेवन केले.


एलीया त्यांना म्हणाला, “बआलाच्या संदेष्ट्यांना पकडा; त्यांच्यातल्या एकालाही निसटून जाऊ देऊ नका.” तेव्हा त्यांनी त्यांना पकडले; एलीयाने त्यांना खाली किशोन ओहळानजीक आणून वधले.


मग राजाने आपल्या स्थानी उभे राहून परमेश्वरासमोर असा करार केला की, ‘मी परमेश्वराचे अनुसरण करीन, त्याच्या आज्ञा, निर्बंध व नियम जिवेभावे पाळीन व त्या ग्रंथातील कराराच्या वचनांप्रमाणे वर्तेन.’


ह्यास्तव ज्या संदेष्ट्यांना मी पाठवले नाही व जे माझ्या नामाने संदेश देतात व म्हणतात, ह्या देशावर तलवार व दुष्काळ येणार नाही, त्यांच्यासंबंधाने परमेश्वर म्हणतो, हे संदेष्टे तलवारीने व दुष्काळाने नष्ट होतील;


म्हणून परमेश्वर म्हणतो, पाहा, मी नेहेलमी शमाया व त्याचे वंशज ह्यांना शिक्षा करीन; ह्या लोकांत राहून त्याचे नाव घ्यायला त्याचे कोणी उरणार नाही; मी आपल्या लोकांचे अनिष्ट करणार ते तो पाहणार नाही. कारण तो परमेश्वराविरुद्ध फितुरीचे शब्द बोलला आहे, असे परमेश्वर म्हणतो.”’


माझे लोक चुकार मेंढरांच्या कळपासारखे झाले आहेत; त्यांच्या मेंढपाळांनी त्यांना भ्रांत केले आहे, डोंगरांवर त्यांना बहकवले आहे; ते पहाडापहाडांतून भटकले आहेत; ते आपले विश्रांतिस्थान विसरले आहेत.


तर मी त्यांना एवढीच आज्ञा केली की, ‘माझे वचन ऐका, म्हणजे मी तुमचा देव होईन व तुम्ही माझे लोक व्हाल; तुमचे बरे व्हावे म्हणून जो सरळ मार्ग मी तुम्हांला सांगतो त्याने चाला.’


आणि असे होईल की कोणी संदेश वदू लागल्यास त्याचे जन्मदाते आईबाप त्याला म्हणतील, तू जिवंत राहायचा नाहीस, कारण तू परमेश्वराच्या नामाने लबाड्या सांगितल्या आहेत. तो संदेश वदू लागला तर त्याचे जन्मदाते आईबाप त्याला भोसकून मारतील.


परंतु अलीम जादूगार (त्याच्या नावाचा अर्थ हाच आहे) ह्याने त्यांना अडवून सुभेदाराला विश्वासापासून फितवण्याचा प्रयत्न केला.


जे बाहेर आहेत त्यांचा न्याय देव करीत नाही काय? “त्या दुष्टाला आपल्यामधून घालवून द्या.”


मरेपर्यंत त्याला दगडमार करावा; कारण तुझा देव परमेश्वर ह्याने तुला मिसर देशातून म्हणजे दास्यगृहातून काढून आणले त्याच्यापासून तुला बहकवण्याचा त्याने प्रयत्न केला आहे.


तर तू त्या नगराच्या रहिवाशांना तलवारीने अवश्य मारून टाकावेस, आणि त्या नगराचा व त्यातील सर्व वस्तूंचा समूळ नाश करावास आणि सर्व प्राणिमात्राचा तलवारीने संहार करावास.


त्याला अवश्य ठार मारावेस; त्याला जिवे मारण्यासाठी त्याच्यावर तुझा हात प्रथम पडावा आणि मग इतर सर्व लोकांचे हात पडावेत.


तर ज्या पुरुषाने अथवा ज्या स्त्रीने हे दुष्कृत्य केले असेल, त्या पुरुषाला अथवा त्या स्त्रीला वेशीत आण आणि त्या व्यक्तीला मरेपर्यंत दगडमार कर.


ज्याला जिवे मारायचे त्याच्यावर प्रथम साक्षीदाराचे हात पडावेत आणि मग इतर लोकांचे हात पडावेत. अशा प्रकारे तू आपल्यामधून ह्या दुष्टाईचे निर्मूलन करावेस.


पण जो संदेष्टा उन्मत्त होऊन जे बोलायची आज्ञा मी त्याला दिली नाही ते वचन माझ्या नावाने बोलेल अथवा जो अन्य देवांच्या नावाने बोलेल तो संदेष्टा प्राणास मुकेल.’


तर आपल्या बांधवाचे जे करण्याचे त्याने योजले असेल तेच तुम्ही त्याचे करावे; अशा रीतीने तू आपल्यामधून ह्या दुष्टाईचे निर्मूलन करावेस.


वडीलवर्गाने त्या मुलीला तिच्या बापाच्या घराबाहेर काढावे आणि गावच्या पुरुषांनी तिला मरेपर्यंत दगडमार करावा; कारण तिने आपल्या बापाच्या घरी वेश्याकर्म करून इस्राएलात भ्रष्टाचार केला आहे; ह्याप्रमाणे तू आपल्यामधून ह्या दुष्टाईचे निर्मूलन करावे.


तर त्या दोघांनाही त्या गावाच्या वेशीकडे आणून मरेपर्यंत दगडमार करावा म तिने गावात असून आरडाओरड केली नाही म्हणून तिला आणि त्याने आपल्या शेजार्‍याची स्त्री भ्रष्ट केली म्हणून त्याला; ह्या प्रकारे तू आपल्यामधून ह्या दुष्टाईचे निर्मूलन करावे.


आपल्या एखाद्या इस्राएल बांधवाला कोणी चोरले आणि तो त्याला दासाप्रमाणे वागवताना किंवा विकताना आढळला, तर त्या चोराला जिवे मारावे; अशा प्रकारे तू आपल्यामधून असल्या दुष्टाईचे निर्मूलन करावे.


मी सुतकी असताना ह्यांतले काही खाल्ले नाही, अथवा अशुद्ध असताना ह्यांतले काही काढून टाकले नाही, अथवा मृतांसाठी त्यांतले काही दिले नाही. मी आपला देव परमेश्वर ह्याचा शब्द मानला आहे; मी तुझ्या सर्व आज्ञांप्रमाणे केले आहे.


अथवा आकाशाकडे नजर लावून सूर्य, चंद्र, तारे अर्थात आकाशातील तारांगण पाहून बहकून जाऊन त्यांना दंडवत घालू नये व त्यांची पूजा करू नये; हे तुमचा देव परमेश्वर ह्याने आकाशाखालील सर्व लोकांना देऊन ठेवले आहेत.


तू आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळग, त्याची सेवा कर आणि त्याच्याच नावाने शपथ वाहा.


कारण ते लोक तुझ्या मुलाला माझ्यापासून बहकवतील; आणि अन्य देवांची सेवा करायला लावतील. त्यामुळे तुमच्यावर परमेश्वराचा कोप भडकेल व तो तात्काळ तुमचा नाश करील.


तर तुम्ही आजवर आपला देव परमेश्वर ह्याला धरून राहिला आहात तसेच राहा.


मग श्वापद धरले गेले आणि त्याच्याबरोबर खोटा संदेष्टाही धरला गेला; त्याने श्वापदाची खूण धारण केलेल्या व त्याच्या मूर्तीला नमन करणार्‍या लोकांना त्याच्यासमोर चिन्हे करून ठकवले होते. ह्या दोघांना ‘जळत्या गंधकाच्या’ अग्निसरोवरात जिवंत टाकण्यात आले;


गिब्यातील त्या बदमाशांना आमच्या हवाली करा म्हणजे आम्ही त्यांना ठार मारून इस्राएलातून ही दुष्टाई काढून टाकू.” पण बन्यामिनी लोक आपले भाऊबंद इस्राएल लोक ह्यांचे म्हणणे ऐकायला तयार होईनात.


तुम्ही परमेश्वराचे भय धरून त्याची भक्ती करीत राहाल, त्याची वाणी ऐकत राहाल, त्याच्या आज्ञेविरुद्ध बंड करणार नाही आणि तुमच्यावर राज्य करणारा हा राजा व तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याचे अनुसरण कराल तर बरे;


Lean sinn:

Sanasan


Sanasan