Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 13:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तरी त्या संदेष्ट्याचे किंवा त्या स्वप्न पाहणार्‍याचे तुम्ही ऐकू नका; कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने व संपूर्ण जिवाने प्रीती करता की नाही हे पाहण्यासाठी तुमचा देव परमेश्वर तुमची ही अशी परीक्षा पाहत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तरी त्या संदेष्टयाचे किंवा स्वप्न पाहणाऱ्याचे ऐकू नका. कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्यांच्यावर संपूर्ण मनाने व संपूर्ण जिवाने प्रीती करता कि नाही हे पाहण्यासाठी तुमचा देव परमेश्वर तुमची परीक्षा पाहत असेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तर तुम्ही त्या ज्योतिष्याचे किंवा स्वप्नदर्शीचे शब्द ऐकू नका. कारण तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरावर मनापासून प्रीती करता की नाही, हे पाहण्यासाठी परमेश्वर तुमची परीक्षा घेत आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 13:3
21 Iomraidhean Croise  

त्याने त्याच्याबरोबर परत जाऊन त्याच्या घरी अन्नपाणी सेवन केले.


जे त्याचे निर्बंध पाळून अगदी मनापासून त्याचा शोध करतात ते धन्य!


कारण हे देवा, तू आम्हांला पारखले आहेस; रुपे गाळतात तसे तू आम्हांला गाळून पाहिले आहेस.


तू संकटात असता आरोळी केली तेव्हा मी तुला सोडवले; मी तुला मेघगर्जनेच्या गुप्त स्थलातून उत्तर दिले; मरीबाच्या जलांजवळ मी तुला पारखले. (सेला)


तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, “भिऊ नका. कारण तुमची परीक्षा पाहावी आणि त्याचे भय तुमच्या मनात राहून तुम्ही पाप करू नये ह्यासाठी देव आला आहे.


नियमशास्त्र व साक्ष ह्यांकडे पाहा! ह्याप्रमाणे ते न बोलल्यास त्यांच्यासाठी निश्‍चये प्रभातसमय नाही.


कारण खोटे ख्रिस्त व ‘खोटे संदेष्टे’ उठतील व साधेल तर निवडलेल्यांनादेखील फसवावे म्हणून मोठी ‘चिन्हे व अद्भुते दाखवतील.’


तेथील लोक थेस्सलनीकातल्या लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते; त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला, आणि ह्या गोष्टी अशाच आहेत की काय ह्याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करत गेले.


कारण तुमच्यामध्ये जे पसंतीस1 उतरलेले आहेत ते प्रकट व्हावेत म्हणून तुमच्यामध्ये पक्षभेद असलेच पाहिजेत.


हे मी आज्ञा म्हणून सांगत नाही, तर दुसर्‍यांच्या आस्थेवरून तुमच्याही प्रीतीचा खरेपणा पडताळून पाहतो.


ह्यासाठी की, आपण ह्यापुढे बाळांसारखे असू नये, म्हणजे माणसांच्या धूर्तपणाने, भ्रांतीच्या मार्गास नेणार्‍या युक्तीने, प्रत्येक शिकवणरूपी वार्‍याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये.


तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर.


तुला लीन करावे व कसोटीस लावून शेवटी तुझे कल्याण करावे म्हणून तुझ्या पूर्वजांना माहीत नसलेला मान्ना खाऊ घालून त्याने तुझे पोषण केले.


तुला लीन करावे आणि तुझ्या मनात काय आहे म्हणजे तू त्याच्या आज्ञा पाळशील की नाही ह्याची कसोटी पाहावी म्हणून तुझा देव परमेश्वर ह्याने गेली चाळीस वर्षे तुला रानातून कोणत्या रीतीने चालवले ह्याचे स्मरण कर.


त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा म्हणून देव त्यांच्या ठायी भ्रांतीचे कार्य चालेल असे करतो;


आपल्यातूनच ते निघाले तरी ते आपले नव्हते; ते आपले असते तर आपल्याबरोबर राहिले असते; त्यांच्यातील कोणीही आपला नाही हे प्रकट व्हावे म्हणून ते निघाले.


प्रियजनहो, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत ह्याविषयी त्यांची परीक्षा करा; कारण पुष्कळ खोटे संदेष्टे जगात उठले आहेत.


मुलांनो, तुम्ही देवाचे आहात आणि त्यांच्यावर तुम्ही जय मिळवला आहे; कारण जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुमच्यात जो आहे तो मोठा आहे.


जी चिन्हे त्या श्वापदासमक्ष करण्याचे त्याच्याकडे सोपवले होते, त्यावरून ते पृथ्वीवर राहणार्‍यांना ठकवते; म्हणजे तलवारीचा घाव लागला असताही, जिवंत राहिलेल्या श्वापदासाठी मूर्ती करण्यास पृथ्वीवर राहणार्‍यांना ते सांगते.


पण त्यांच्याकरवी मी इस्राएलाची परीक्षा करीन आणि त्यांचे पूर्वज माझ्या मार्गाने चालत होते त्याप्रमाणेच ते चालतात की नाही हे पाहीन.”


आता माझे स्वामीराज ह्यांनी आपल्या दासाची विनंती ऐकावी; परमेश्वराने जर आपणाला माझ्याविरुद्ध चेतवले असेल तर तो हे माझे अर्पण मान्य करो; पण कोणी मानवांनी आपणाला चेतवले असेल तर परमेश्वराच्या दृष्टीने ते शापित होवोत, कारण मी परमेश्वराच्या वतनाचा वाटेकरी होऊ नये म्हणून त्यांनी मला बाहेर हाकून दिले आहे; ते म्हणतात, जा, अन्य देवतांची उपासना कर.


Lean sinn:

Sanasan


Sanasan