Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 13:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 आणि त्या चिन्हाचा किंवा त्या चमत्काराचा तुम्हांला प्रत्यय आला, आणि तुम्हांला अपरिचित अशा अन्य देवांना अनुसरून त्यांची सेवा करण्याचे त्याने तुम्हांला सुचवले,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 कदाचित् त्या चिन्हाचा तुम्हास पडताळा येईल किंवा चमत्कार खराही ठरेल. मग तो, तुम्हास अपरिचित अशा इतर दैवतांची सेवा करायला सुचवेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 आणि जर त्याची चिन्हे आणि भविष्ये खरी ठरली आणि तो ज्योतिषी म्हणेल, “चला, आपण इतर दैवतांचे अनुसरण करू आणि त्यांची उपासना करू.” (अशी दैवते ज्यांची तुम्हाला ओळख नसेल)

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 13:2
16 Iomraidhean Croise  

त्याच दिवशी त्याने खूण दिली; तो म्हणाला, “परमेश्वराने सांगितलेली खूण हीच; पाहा, ही वेदी भंग पावेल आणि तिच्यावरील राख उधळली जाईल.”


पशुगमन करणार्‍याला अवश्य जिवे मारावे.


तेव्हा मिसराच्या जादुगारांनी आपल्या मंत्रतंत्रांच्या योगे तसाच प्रकार केला. तरी फारोचे मन कठीण राहिले आणि परमेश्वराने म्हटले होते त्याप्रमाणे तो मोशे व अहरोन ह्यांचे म्हणणे ऐकेना.


परमेश्वर म्हणतो, पाहा, जे संदेष्टे खोटी स्वप्ने संदेश म्हणून सांगतात त्यांच्याविरुद्ध मी आहे; ते माझ्या लोकांना आपल्या लबाडीने व आपल्या अमर्याद भाषणाने बहकवतात; मी तर त्यांना पाठवले नाही व आज्ञापिलेही नाही; ते ह्या लोकांचे बिलकूल हित करीत नाहीत, असे परमेश्वर म्हणतो.


तुमचे संदेष्टे, तुमचे दैवज्ञ, तुमचे स्वप्नद्रष्टे, तुमचे मांत्रिक व तुमचे जादूटोणा करणारे तुम्हांला म्हणतात की, ‘बाबेलच्या राजाची सेवा करू नका.’ त्यांचे तुम्ही ऐकू नका;


कोणी संदेष्टा शांतीचा संदेश देतो तेव्हा त्या संदेष्ट्याचे वचन प्रत्ययास आले म्हणजे समजावे की खरोखर परमेश्वराने त्याला पाठवले आहे.”


कारण तेराफीम3 व्यर्थ गोष्टी बोलल्या आहेत, दैवज्ञांनी खोटे दृष्टान्त पाहिले आहेत व फसवणारी स्वप्ने सांगितली आहेत; ते कोरडा धीर देतात; ह्यामुळे ते मेंढरांप्रमाणे भटकले आहेत. त्यांना कोणी मेंढपाळ नसल्यामुळे त्यांच्यावर जुलूम होत आहे.


कारण खोटे ख्रिस्त व ‘खोटे संदेष्टे’ उठतील व साधेल तर निवडलेल्यांनादेखील फसवावे म्हणून मोठी ‘चिन्हे व अद्भुते दाखवतील.’


तुमच्यातून काही अधम पुरुष निघाले आणि त्यांनी तुम्हांला अपरिचित अशा ‘अन्य देवांची सेवा करायला या’ असे म्हणून आपल्या नगरातील लोकांना बहकवले,


तुझा भाऊ म्हणजे तुझा सहोदर, तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझी प्राणप्रिय स्त्री, तुझा जिवलग मित्र ह्यांच्यापैकी कोणी तुला व तुझ्या पूर्वजांना अपरिचित अशा अन्य देवांना अनुसरून त्यांची सेवा करण्याची गुप्तपणे फूस लावू लागला म


पण जो संदेष्टा उन्मत्त होऊन जे बोलायची आज्ञा मी त्याला दिली नाही ते वचन माझ्या नावाने बोलेल अथवा जो अन्य देवांच्या नावाने बोलेल तो संदेष्टा प्राणास मुकेल.’


तर कोणी संदेष्टा परमेश्वराच्या नावाने काही बोलला आणि त्याप्रमाणे घडले नाही किंवा प्रत्ययास आले नाही तर परमेश्वराचे ते बोलणे नव्हते असे समजावे; तो संदेष्टा उन्मत्त होऊन बोलला आहे; तू त्याची भीती बाळगू नकोस.


Lean sinn:

Sanasan


Sanasan