Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 13:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 मरेपर्यंत त्याला दगडमार करावा; कारण तुझा देव परमेश्वर ह्याने तुला मिसर देशातून म्हणजे दास्यगृहातून काढून आणले त्याच्यापासून तुला बहकवण्याचा त्याने प्रयत्न केला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 मरेपर्यंत त्यास दगडमार करावी; कारण मिसरमधून ज्याने तुम्हास दास्यातून सोडवले त्या परमेश्वर देवापासूनच हा तुम्हास बहकवायचा प्रयत्न करत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 त्यांना मरेपर्यंत धोंडमार करावी, कारण ज्यांनी तुम्हाला इजिप्त देशाच्या गुलामगिरीतून बाहेर काढले, त्या याहवेह तुमच्या परमेश्वरापासून तुम्हाला फूस लावून दूर नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 13:10
15 Iomraidhean Croise  

यहोशवा म्हणाला, “तू आम्हांला का त्रास दिलास? परमेश्वर तुला आज त्रास देईल.” मग सर्व इस्राएलांनी त्याला दगडमार केला व ती सर्व अग्नीने जाळून वर दगड टाकले.


मग त्यांनी त्याच्याविरुद्ध कट करून राजाज्ञेने परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात त्याला दगडमार केला.


मग त्याच्या गावच्या सर्व पुरुषांनी त्याला दगडमार करून ठार मारावे; अशा प्रकारे तू आपल्यामधून ह्या दुष्टाईचे निर्मूलन करावे, म्हणजे सर्व इस्राएल लोक हे ऐकून भितील.


मोशेने इस्राएल लोकांना हे सांगितले तेव्हा त्यांनी त्या शिव्याशाप देणार्‍याला छावणीबाहेर नेऊन दगडमार केला. अशा प्रकारे परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी केले.


कोणी पंचाक्षरी अथवा चेटूक करणारा असला, मग तो पुरुष असो किंवा स्त्री असो, त्यांना अवश्य जिवे मारावे, त्यांना दगडमार करावा; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.


“इस्राएल लोकांना आणखी असे सांग की, इस्राएल लोकांपैकी अथवा इस्राएल लोकांमध्ये राहणार्‍या परदेशीयांपैकी कोणी आपले अपत्य मोलखास अर्पण केले तर त्याला अवश्य जिवे मारावे; आपल्या देशाच्या लोकांनी त्याला दगडमार करावा.


ज्याने तुला मिसर देशातून, दास्यगृहातून आणले तो मी परमेश्वर तुझा देव आहे.


अथवा आकाशाकडे नजर लावून सूर्य, चंद्र, तारे अर्थात आकाशातील तारांगण पाहून बहकून जाऊन त्यांना दंडवत घालू नये व त्यांची पूजा करू नये; हे तुमचा देव परमेश्वर ह्याने आकाशाखालील सर्व लोकांना देऊन ठेवले आहेत.


त्या संदेष्ट्याला किंवा स्वप्न पाहणार्‍याला जिवे मारावे; कारण तुमचा देव परमेश्वर ज्याने तुम्हांला मिसर देशातून बाहेर आणले व दास्यगृहातून सोडवले, त्या तुमच्या परमेश्वर देवाने नेमून दिलेला मार्ग तुम्ही सोडावा म्हणून तो तुम्हांला फितवतो. अशा प्रकारे तुम्ही आपल्यामधून ह्या दुष्टाईचे निर्मूलन करावे.


तो त्यांना म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो की, ‘तुम्ही प्रत्येकाने आपल्या कंबरेस तलवार लटकवावी आणि छावणीच्या ह्या प्रवेशद्वारापासून त्या प्रवेशद्वारापर्यंत चहूकडे फिरून आपले बंधू, सोबती व शेजारी ह्यांचा वध करावा.”’


तर ज्या पुरुषाने अथवा ज्या स्त्रीने हे दुष्कृत्य केले असेल, त्या पुरुषाला अथवा त्या स्त्रीला वेशीत आण आणि त्या व्यक्तीला मरेपर्यंत दगडमार कर.


ज्याला जिवे मारायचे त्याच्यावर प्रथम साक्षीदाराचे हात पडावेत आणि मग इतर लोकांचे हात पडावेत. अशा प्रकारे तू आपल्यामधून ह्या दुष्टाईचे निर्मूलन करावेस.


तेव्हा देशातील सर्व लोकांनी बआलदैवताच्या देवळात जाऊन ते मोडून टाकले व त्याच्या वेद्या व मूर्ती ह्यांचा भुगाभुगा केला आणि बआलाचा याजक मत्तान ह्याचा वेद्यांसमोर वध केला. मग याजकाने परमेश्वराच्या मंदिराचे कामदार नेमले,


Lean sinn:

Sanasan


Sanasan