Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 12:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 त्यांच्या सर्व वेद्या पाडून टाका, त्यांचे स्तंभ फोडून टाका, त्यांच्या अशेरा मूर्ती अग्नीत जाळून टाका; त्यांच्या देवांच्या कोरीव मूर्ती फोडून तोडून टाका, त्या ठिकाणातून त्यांची नावनिशाणी नाहीशी करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तुम्ही तेथील वेद्या मोडून टाका, दगडी स्मारकस्तंभांचा विध्वंस करा. अशेरा मूर्ती जाळा, त्यांच्या दैवतांच्या कोरीव मूर्तीची मोडतोड करा. म्हणजे त्याठिकाणी त्यांची नावनिशाणीही उरणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तुम्ही त्यांच्या वेद्या पाडून टाकाव्या, त्यांचे पवित्र दगड फोडून टाकावे, त्यांचे अशेरास्तंभ अग्नीत जाळून टाकावे, त्यांच्या दैवतांच्या कोरीव मूर्ती फोडून टाकाव्या आणि त्या ठिकाणातून त्यांची नावे पुसून टाकावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 12:3
25 Iomraidhean Croise  

बोरू पाण्यात कापतो त्याप्रमाणे परमेश्वर इस्राएलास हाणून कापवील व जी उत्तम भूमी त्याने त्यांच्या पूर्वजांना दिली होती तिच्यातून त्यांना उपटून काढून नदीपलीकडे त्यांची पांगापांग करील, कारण त्यांनी अशेरा मूर्ती बनवून परमेश्वराला संतप्त केले.


त्याने आपली आई माका हिला राजमातेच्या पदावरून दूर केले, कारण तिने अशेराप्रीत्यर्थ एक अमंगळ मूर्ती केली होती. तिने केलेली ती मूर्ती आसाने फोडूनतोडून किद्रोन ओहळाजवळ जाळून टाकली.


तेव्हा देशातील सर्व लोकांनी बआलदैवताच्या देवळात जाऊन ते मोडून टाकले व त्याच्या वेद्या व मूर्ती ह्यांचा भुगाभुगा केला आणि बआलाचा याजक मत्तान ह्याचा वेद्यांसमोर वध केला. मग याजकाने परमेश्वराच्या मंदिराचे कामदार नेमले,


त्याने उच्च स्थाने काढून टाकली, मूर्तिस्तंभ फोडले, अशेरा मूर्तींचा उच्छेद केला व मोशेने केलेल्या पितळी सर्पाचे चूर्ण केले; कारण, हा काळपावेतो इस्राएल लोक त्यापुढे धूप जाळत असत; त्याला नहुश्तान (पितळेचा तुकडा) हे नाव दिले होते.


त्याने तेथील मूर्तिस्तंभ मोडून त्यांचे तुकडे केले, तेथील अशेरामूर्ती फोडून टाकल्या व त्यांच्या ठिकाणी माणसांची हाडे भरून ठेवली.


आसाने आपला देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने जे चांगले व नीट ते केले;


त्याने अन्य देवांच्या वेद्या व उच्च स्थाने काढून टाकली, मूर्तिस्तंभ फोडले व अशेरा मूर्ती भंग केल्या;


तथापि तुझ्या ठायी काही चांगल्या गोष्टी दिसून आल्या आहेत; तू देशातून अशेरा मूर्तींचा नाश केला आहेस व आपले मन देवाच्या भजनी लावले आहेस.” यहोशाफाट न्यायाधीशांची नेमणूक करतो


हे सर्व आटोपल्यावर तेथे हजर असलेल्या सर्व इस्राएलांनी यहूदाच्या नगरानगरांतून जाऊन यहूदा, बन्यामीन, एफ्राईम व मनश्शे ह्या प्रांतात असलेले मूर्तिस्तंभ मोडून टाकले, अशेरा मूर्ती फोडून टाकल्या आणि उच्च स्थाने व वेद्या मोडून फोडून टाकल्या; त्यांचा सर्वस्वी विध्वंस केला. मग सर्व इस्राएल लोक आपापल्या गावी आपापल्या वतनात गेले. याजक आणि लेवी ह्यांच्यासाठी हिज्कीया तरतूद करतो


आपल्या कारकिर्दीच्या आठव्या वर्षी तो अल्पवयी असतानाच आपला पूर्वज दावीद ह्याच्या देवाच्या भजनी लागला; बाराव्या वर्षी तो उच्च स्थाने, अशेरा मूर्ती आणि कोरीव व ओतीव मूर्ती यहूदा व यरुशलेम ह्यांतून काढून टाकू लागला.


जे परमेश्वराला सोडून अन्य दैवताच्या भजनी लागतात त्यांना पुष्कळ दु:खे होतील; ते रक्तमय पेयार्पणे अर्पण करतात तशी मी अर्पण करणार नाही. मी त्यांच्या दैवतांची नांवे उच्चारणारही नाही.


मी जे काही तुम्हांला सांगितले आहे त्या सगळ्यांविषयी सावध राहा; इतर देवांचे नावदेखील घेऊ नका, ते तुमच्या मुखातून ऐकू येऊ नये.


तेव्हा त्यांच्या देवांना तू नमन करू नयेस, त्यांची सेवा करू नयेस, आणि त्यांच्यासारखी कर्मे करू नयेस, तर त्यांना अगदी जमीनदोस्त करावेस आणि त्यांच्या स्तंभांचे तुकडेतुकडे करावेस.


त्यांच्या वेद्या पाडून टाका; त्यांचे स्तंभ फोडून टाका, आणि त्यांच्या अशेरा मूर्तींचा2 भंग करा;


अशा रीतीने याकोबाच्या दोषांचे क्षालन होईल; त्याचे पाप दूर केल्याचे फळ हेच आहे; तो वेद्यांचे सर्व चिरे फुटलेल्या चुनखड्यासारखे करील तेव्हा अशेरामूर्ती व सूर्यमूर्ती पुन्हा उभारणार नाहीत.


कारण त्याची संतती उंच टेकड्यांवरील हिरव्या झाडांच्या वेद्या व अशेरामूर्ती ह्यांचे स्मरण ठेवते.


कारण मी तिच्या मुखातून बआलमूर्तींची नावे काढून टाकीन; ह्यापुढे तिला त्यांच्या नावांची आठवण उरणार नाही.


तुझ्यामधल्या अशेरामूर्ती मी उपटून टाकीन; मी तुझ्या शहरांचा नाश करीन.


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, पाहा, त्या दिवशी असे होईल की, मी देशातून मूर्तींच्या नावांचा उच्छेद करीन, त्यांची ह्यापुढे आठवण होणार नाही आणि संदेष्टे व अशुद्ध आत्मा ह्यांना मी देशातून घालवून देईन.


तेव्हा त्या देशातील सर्व रहिवाशांना तुमच्यासमोरून घालवून द्या; आकृती कोरलेल्या त्यांच्या दगडांचा नाश करा आणि त्यांची उच्च स्थाने पाडून टाका;


तुमचा देव परमेश्वर ह्याच्या बाबतीत तसे करू नका.


त्यांच्या देवांच्या कोरीव मूर्ती तुम्ही अग्नीत जाळून टाका; त्यांच्यावरील सोन्यारुप्याचा लोभ धरू नकोस व ते स्वतःकरता ठेवून घेऊ नकोस, घेशील तर त्यामुळे पाशात पडशील; कारण तुझा देव परमेश्वर ह्याला त्याचा वीट आहे.


त्या लोकांशी तुम्ही अशा प्रकारे वागावे : त्यांच्या वेद्या पाडून टाका, त्यांचे स्तंभ फोडून टाका, त्यांच्या अशेरा मूर्ती तोडून टाका आणि त्यांच्या कोरीव मूर्ती अग्नीत जाळून टाका.


नंतर मी एक ‘श्वापद समुद्रातून वर येताना’ पाहिले; त्याला ‘दहा शिंगे’ व सात डोकी असून त्याच्या शिंगांवर दहा मुकुट आणि त्याच्या डोक्यांवर देवनिंदात्मक नावे होती.


तुम्ही ह्या देशाच्या रहिवाशांशी काही करारमदार करू नका; तुम्ही त्यांच्या वेद्या मोडून टाका, असे मी तुम्हांला म्हणालो होतो; पण तुम्ही माझी वाणी ऐकली नाही. तुम्ही हे काय केले?


Lean sinn:

Sanasan


Sanasan