Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 11:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 म्हणून जी आज्ञा मी आज तुम्हांला सांगत आहे ती तुम्ही संपूर्ण पाळावी, म्हणजे तुम्ही समर्थ होऊन जो देश वतन करून घेण्यासाठी पैलतीरी जात आहात त्यात प्रवेश करून तो आपल्या ताब्यात घ्याल;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 तेव्हा आज मी देतो ती प्रत्येक आज्ञा कटाक्षाने पाळा त्यामुळे तुम्ही बलशाली व्हाल, यार्देन ओलांडून जो देश ताब्यात घ्यायला तुम्ही सिद्ध झाला आहात तो हस्तगत कराल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 म्हणून मी तुम्हाला आज देत असलेल्या सर्व आज्ञा पाळाव्या, म्हणजे यार्देन ओलांडून ज्या देशात तुम्ही प्रवेश करणार आहात, तो हस्तगत करण्यास तुम्हाला सामर्थ्य मिळेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 11:8
19 Iomraidhean Croise  

मी धावा केला तो तू त्याच दिवशी ऐकलास; तू मला हिम्मत दिलीस तेव्हा माझ्या जिवाला सामर्थ्य प्राप्त झाले.


आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील.


तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील; ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील; ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत.


तो म्हणाला, “परमप्रिय मानवा, भिऊ नकोस; तुला शांती असो, हिंमत धर, नेट धर.” तो माझ्याबरोबर बोलला तेव्हा मला शक्ती आली व मी म्हणालो, “माझ्या स्वामी, तू आता बोलावे, कारण तू माझ्यात हिंमत आणली आहेस.”


त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीप्रमाणे तुम्हांला असे दान द्यावे की, तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे;


शेवटी, माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्यात बलवान होत जा.


पण तुम्ही परमेश्वराने केलेली ही सारी महत्कृत्ये डोळ्यांनी पाहिली आहेत.


कारण सर्व गोष्टींची समृद्धी असताना तू आनंदाने व उल्हासित मनाने आपला देव परमेश्वर ह्याची सेवा केली नाही,


मग परमेश्वराने नूनाचा मुलगा यहोशवा ह्याला अधिकारसूत्रे देऊन म्हटले, “खंबीर हो, हिंमत धर, कारण जो देश मी इस्राएल लोकांना शपथपूर्वक देऊ केला आहे त्यात तुला त्यांना घेऊन जायचे आहे; मी तुझ्याबरोबर असेन.”


तुम्ही पैलतीरी जाऊन ज्या देशाचे वतन मिळवणार आहात त्यात तुम्ही त्या पाळाव्यात म्हणून परमेश्वराने त्या वेळेस तुम्हांला विधी व नियम शिकवण्याची मला आज्ञा केली.


मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्वकाही करण्यास शक्तिमान आहे.


सर्व प्रकारचा धीर व सहनशक्ती ही तुम्हांला आनंदासह प्राप्त व्हावी म्हणून त्याच्या गौरवाच्या पराक्रमानुसार तुम्ही सर्व प्रकारच्या सामर्थ्याने समर्थ व्हावे;


Lean sinn:

Sanasan


Sanasan