Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 11:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 आज तुम्ही हे लक्षात आणा; तुमच्या मुलाबाळांना मी हे सांगत नाही; त्यांनी तर हे काही अनुभवले नाही; म्हणजे तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेली शिक्षा, त्याचा महिमा, पराक्रमी बाहू व उगारलेला हात ह्यांच्या द्वारे

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 परमेश्वराने तुमच्यासाठी केलेले सर्व प्रताप आज आठवा. हे मी तुम्हासच सांगत आहे. तुमच्या मुलाबाळांना नव्हे. कारण त्यांनी या शिस्तींपैकी काहीच पाहिले किंव्हा अनुभवले नाही. तुमचा देव परमेश्वर त्याची थोरवी, त्याचे सामर्थ्य व पराक्रमी हात व ऊगारलेला बाहू ह्याच्याद्ववारे,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 तुम्ही आज हे स्मरणात ठेवा, तुमच्या मुलांनी याहवेह तुमच्या परमेश्वराचे अनुशासन पाहिले नाही आणि त्याचा अनुभव केला नाही—त्यांचे गौरव, सामर्थ्यशाली हात व पसरलेल्या भुजांचा;

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 11:2
14 Iomraidhean Croise  

ज्याने प्रतापी हाताने व पुढे केलेल्या बाहूने त्यांना बाहेर आणले त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे.


म्हणून इस्राएल लोकांना सांग, ‘मी परमेश्वर आहे; मी तुम्हांला मिसरी लोकांच्या बिगारीच्या ओझ्याखालून काढीन, त्यांच्या दास्यातून तुम्हांला मुक्त करीन आणि हात पुढे केलेल्या बाहूने व मोठ्या शिक्षा करून तुमचा उद्धार करीन;


परमेश्वरावर तुझा भाव असावा, म्हणून मी तुला ती वचने आज कळवली आहेत.


खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला; आम्हांला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली; त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हांला आरोग्य प्राप्त झाले.


तथापि देवापासून साहाय्य प्राप्त झाल्यामुळे मी आजपर्यंत लहानमोठ्यांस साक्ष देत राहिलो आहे; आणि ज्या गोष्टी होणार आहेत म्हणून संदेष्ट्यांनी व मोशेने सांगितले, त्यांखेरीज मी दुसरे काही सांगत नाही.


तुम्ही सगळे आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर आज उभे आहात; तुमचे प्रमुख, तुमचे वंश, तुमचे वडील जन आणि तुमचे अंमलदार व सर्व इस्राएल लोक,


‘हे प्रभू परमेश्वरा, तू आपल्या दासाला आपला प्रताप व आपला समर्थ हात दाखवू लागला आहेस; तुझ्यासारखी कार्ये करणारा व पराक्रम करणारा देव स्वर्गात किंवा पृथ्वीवर कोण आहे?


त्याप्रमाणेच तुमचा देव परमेश्वर ह्याने मिसर देशातून तुमच्यासाठी तुमच्यादेखत संकटे, चिन्हे, चमत्कार, युद्धे, पराक्रमी बाहू आणि उगारलेला हात ह्यांच्या योगे भयप्रद कृत्ये केली तशी कृत्ये करून देवाने आपल्यासाठी एखादे राष्ट्र इतर राष्ट्रांमधून काढून घेण्याचा कधी प्रयत्न केला काय?


तेव्हा तुम्ही म्हणालात, ‘पाहा, आपला देव परमेश्वर ह्याने आम्हांला आपले तेज व महिमा प्रकट केला आहे, आणि अग्नीमधून निघत असलेला त्याचा शब्द आम्ही ऐकला आहे. आज आम्हांला हे दिसले की, देव मानवाशी बोलत असतानाही मानव जिवंत राहतो.


तू प्रत्यक्ष पाहिलेली संकटे, चिन्हे व चमत्कार, तसेच पराक्रमी बाहू व उगारलेला हात ह्यांच्या योगे तुझा देव परमेश्वर ह्याने तुला काढून आणले हेही चांगले आठव. ज्या राष्ट्रांची तुला भीती वाटत आहे त्या सर्वांचे तुझा देव परमेश्वर तसेच करील.


तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याला विसरून अन्य देवांच्या मागे लागाल, त्यांची सेवा कराल व त्यांना दंडवत घालाल तर खात्रीने तुमचा नाश होईल हे मी तुम्हांला प्रतिज्ञापूर्वक सांगतो.


मी परमेश्वराची अशी प्रार्थना केली की, ‘हे प्रभू परमेश्वरा, ही तुझी प्रजा, हे तुझे वतन तू आपल्या प्रतापाने सोडवलेस आणि पराक्रमी हाताने मिसर देशातून काढून आणलेस त्याचा नाश करू नकोस.


यहोशवाच्या हयातीत आणि त्याच्या मरणानंतर जिवंत राहिलेल्या ज्या वडील लोकांना परमेश्वराने इस्राएलासाठी काय कार्ये केली हे माहीत होते त्यांच्या हयातीत इस्राएल लोकांनी परमेश्वराची सेवा केली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan