Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 1:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 पाहा, हा देश मी तुमच्यापुढे ठेवला आहे, म्हणून परमेश्वराने तुमचे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना व त्यांच्यामागून त्यांच्या वंशजांना जो देश शपथपूर्वक देऊ केला आहे, त्यात जाऊन तो वतन करून घ्या.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 पाहा हा प्रदेश मी तुम्हास देऊ करत आहे जा आणि त्यावर ताबा मिळवा अब्राहाम, इसहाक आणि याकोब या तुमच्या पूर्वजांना व त्यांच्यानंतर त्यांच्या वंशजांना हा प्रदेश देण्याचे परमेश्वराने वचन दिले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 पाहा, मी हा सर्व प्रदेश तुम्हाला देत आहे. तुम्ही जा व तो प्रदेश हस्तगत करा. कारण याहवेहने तो प्रदेश अब्राहाम, इसहाक व याकोब या तुमच्या पूर्वजास व त्यांच्या वंशजास दिलेला वचनदत्त देश आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 1:8
39 Iomraidhean Croise  

परमेश्वर अब्रामाला दर्शन देऊन म्हणाला, “हा देश मी तुझ्या संतानाला देणार.” परमेश्वराने त्याला दर्शन दिले म्हणून त्याने तेथे परमेश्वराची एक वेदी बांधली.


तुझ्या चौथ्या पिढीचे लोक इकडे माघारी येतील, कारण अमोरी लोकांच्या पापाचा घडा अद्यापि भरला नाही.


त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाशी करार करून सांगितले, “मिसराच्या1 नदीपासून ते महानदी फरात येथ-पर्यंतचा प्रदेश मी तुझ्या संतानास देतो.


आणि त्यांची क्षुधा भागवण्यासाठी तू आकाशातून त्यांना अन्न दिले, त्यांची तृषा शमवण्यासाठी खडकातून पाणी काढले आणि त्यांना अशी आज्ञा केली की जो देश तुम्हांला देण्यासाठी मी बाहू उभारून आणभाक केली आहे त्याचा ताबा घेण्यासाठी तुम्ही त्यात जा.


तांबड्या समुद्रापासून ते पलिष्ट्यांच्या समुद्रापर्यंत आणि रानापासून ते फरात नदापर्यंत मी तुझ्या देशाची सरहद्द करीन; मी त्या देशातील रहिवाशांना तुझ्या काबूत आणीन व तू त्यांना आपल्यापुढून हाकून देशील.


मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “तू व जे लोक तू मिसर देशातून आणले आहेत असे तुम्ही येथून निघून मार्गस्थ व्हा; व जो देश तुझ्या संततीला देईन असे अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना मी शपथपूर्वक सांगितले होते, त्या देशाकडे जा.


आणि तू त्यांच्या पूर्वजांना प्रतिज्ञापूर्वक देऊ केलेला हा देश, ज्यातून दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत असा हा देश त्यांना दिला;


ह्या देशाचे तुम्हांला सारखे वाटे मिळून तुम्ही येथील वतन पावाल कारण हा देश तुमच्या वडिलांना देईन अशी मी हात वर करून शपथ घेतली आहे; ह्या प्रकारे हा देश तुमचे वतन होईल.


म्हणून जो देश मी त्यांच्या पूर्वजांना शपथपूर्वक देऊ केला आहे तो खरोखर त्यांच्या दृष्टीस पडायचा नाही; ज्यांनी मला तुच्छ लेखले त्यांतले कोणीही तो देश पाहणार नाहीत.


‘मिसर देशातून निघालेल्या लोकांपैकी वीस वर्षांचे व त्यांहून अधिक वयाचे जे आहेत त्यांतील कोणीही अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना जो देश देण्याची मी शपथ वाहिली होती तो देश पाहणार नाहीत, कारण ते मला पूर्णपणे अनुसरले नाहीत;


तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर, तुम्ही आता आहात त्यापेक्षा सहस्रपट तुम्हांला वाढवो, आणि आपल्या वचनाप्रमाणे तो तुम्हांला आशीर्वाद देवो.


‘जो उत्तम देश तुमच्या पूर्वजांना देण्याचे मी शपथपूर्वक वचन दिले होते, तो देश ह्या दुष्ट पिढीतील माणसांपैकी एकाच्याही दृष्टीस पडणार नाही;


तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, ‘ऊठ, तू ह्या लोकांच्या पुढे होऊन प्रवासाला नीघ, म्हणजे जो देश त्यांना देण्याची त्यांच्या पूर्वजांशी मी शपथ वाहिली तेथे जाऊन ते तो वतन करून घेतील.’


जेथे तुमचे पाऊल पडेल ते प्रत्येक स्थळ तुमचे होईल. रानापासून लबानोनापर्यंत आणि नदीपासून म्हणजे फरात नदीपासून पश्‍चिम समुद्रापर्यंत तुमच्या देशाचा विस्तार होईल.


आणि जो देश परमेश्वराने शपथपूर्वक वचनाद्वारे तुमच्या पूर्वजांना व त्यांच्या संतानाला देऊ केला होता व ज्यात दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत त्यात तुम्ही चिरकाळ राहाल.


सेईर येथे राहणारे एसावाचे वंशज आणि आर येथे राहणारे मवाबी हे जसे माझ्याशी वागले तसाच तूही मी यार्देनेपलीकडे जाऊन आमचा देव परमेश्वर ह्याने आम्हांला दिलेल्या देशात पोहचेपर्यंत माझ्याशी वाग.’


तू आपल्या पवित्र निवासातून, स्वर्गातून अवलोकन कर, आपल्या इस्राएल प्रजेला आशीर्वाद दे आणि तू आमच्या पूर्वजांशी शपथ वाहिल्याप्रमाणे जो देश तू आम्हांला दिला आहे त्या ह्या दुधामधाचे प्रवाह वाहणार्‍या देशाला बरकत दे.’


आणि त्या वेळी जो याजक असेल त्याच्याकडे जाऊन त्याला असे म्हण : ‘तुझा देव परमेश्वर ह्याच्यापुढे मी जाहीर करतो की, परमेश्वराने आम्हांला जो देश देण्याविषयी आमच्या पूर्वजांशी शपथ वाहिली होती त्यात मी आलो आहे.’


आणि जी भूमी तुला देण्याची परमेश्वराने तुझ्या पूर्वजांशी शपथ वाहिली होती तिच्यात तुझ्या पोटचे फळ, तुझ्या गुराढोरांचे वत्स व तुझ्या भूमीचा उपज ह्यांची तुझ्या कल्याणासाठी तो अभिवृद्धी करील.


जो करार तुमचा देव परमेश्वर आज तुमच्याशी करीत आहे व जे वचन शपथपूर्वक तुम्हांला देत आहे त्यात तुम्ही सामील व्हावे;


आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती कर, त्याची वाणी ऐक व त्याला धरून राहा, कारण त्यातच तुझे जीवन आहे व त्यामुळेच तू दीर्घायू होशील; तसे केलेस तर तुझे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना जो देश देण्याची परमेश्वराने त्यांच्याशी शपथ वाहिली होती त्यात तुझी वस्ती होईल.”


मग मोशेने यहोशवाला बोलावून सर्व इस्राएलांदेखत त्याला सांगितले : “खंबीर हो, हिंमत धर, कारण जो देश ह्यांना देण्याची शपथ परमेश्वराने ह्यांच्या पूर्वजांशी केली होती त्यात तुला ह्या लोकांबरोबर जायचे आहे आणि तो त्यांना वतन म्हणून मिळवून द्यायचा आहे.


परमेश्वर त्याला म्हणाला, “ज्या देशाविषयी मी अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांच्याशी शपथ वाहिली होती की, तो मी तुझ्या संतानांना देईन, तो देश हाच; तो मी तुला प्रत्यक्ष दाखवला आहे, पण नदी ओलांडून तिकडे तुला जायचे नाही.”


आता, अहो इस्राएल लोकहो, जे विधी व नियम मी तुम्हांला शिकवत आहे ते पाळावेत म्हणून तुम्ही ते ऐकून घ्या म्हणजे तुम्ही जिवंत राहाल आणि तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर तुम्हांला जो देश देत आहे त्यात प्रवेश करून तो वतन करून घ्याल.


तुझा देव परमेश्वर ह्याने तुझ्या पूर्वजांना म्हणजे अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना जो देश तुला देण्याचे वचन दिले आहे त्यात तो तुला घेऊन जाईल; जी मोठी व सुंदर नगरे तू स्वतः वसवलेली नाहीत,


तुम्ही हे नियम ऐकून मान्य केले व त्याप्रमाणे चाललात तर तुमचा देव परमेश्वर तुमच्या पूर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार पाळून तुमच्यावर दया करील.


तो तुझ्यावर प्रेम करील, तुला आशीर्वाद देईल, तुला बहुगुणित करील; जो देश तुला देण्याविषयी तुझ्या पूर्वजांशी त्याने शपथ वाहिली होती त्या देशात तुझ्या पोटचे फळ आणि तुझ्या भूमीचा उपज म्हणजे धान्य, द्राक्षारस व तेल ह्या बाबतीत आणि तुझ्या गुराढोरांची व शेरडामेंढरांची वाढ ह्या बाबतीत तुला बरकत देईल.


पण परमेश्वराने तुम्हांला पराक्रमी हाताने दास्यगृहातून मिसर देशाचा राजा फारो ह्याच्या हातातून सोडवून बाहेर आणले, ह्याचे कारण हेच की, तुमच्यावर त्याचे प्रेम आहे, आणि तुमच्या पूर्वजांना त्याने जे शपथपूर्वक वचन दिले होते ते पूर्ण करण्याची त्याची इच्छा आहे.


जी आज्ञा मी आज तुम्हांला देत आहे ती सर्व काळजीपूर्वक पाळा, म्हणजे तुम्ही जगाल, बहुगुणित व्हाल आणि तुमच्या पूर्वजांना परमेश्वराने शपथ पूर्वक देऊ केलेल्या देशात प्रवेश करून तो वतन करून घ्याल.


तू त्यांचा देश वतन करून घ्यायला जात आहेस हे तुझ्या पुण्याईमुळे नव्हे अथवा तुझ्या मनाच्या सात्त्विकतेमुळे नव्हे, तर त्या राष्ट्रांच्या दुष्टाईमुळे; तसेच तुझे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना परमेश्वराने दिलेले वचन खरे करावे म्हणून तुझा देव परमेश्वर त्या राष्ट्रांना तुझ्यापुढून घालवून देत आहे.


देवाने अब्राहामाला वचन दिले तेव्हा त्याला शपथ वाहण्यास स्वतःपेक्षा कोणी मोठा नसल्यामुळे त्याने ‘आपलीच शपथ वाहून’ म्हटले की,


“मी तुला आशीर्वाद देईनच देईन व तुला बहुगुणित करीनच करीन.”


खंबीर हो, हिम्मत धर; कारण जो देश ह्या लोकांच्या पूर्वजांना देण्याची शपथ मी त्यांच्याजवळ वाहिली आहे तो तू ह्यांना वतन म्हणून मिळवून देशील.


परमेश्वराचा दूत गिलगालाहून बोखीम येथे येऊन लोकांना म्हणाला, “मी तुम्हांला मिसर देशातून काढून तुमच्या पूर्वजांना शपथेवर देऊ केलेल्या देशात आणले; तुमच्याशी केलेला माझा करार मी कधी मोडणार नाही;


Lean sinn:

Sanasan


Sanasan