Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 1:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 तर आता येथून कूच करा, आणि अमोर्‍यांच्या पहाडी प्रदेशात आणि त्यांच्या आसपासच्या सर्व प्रदेशात चला, म्हणजे अराबात, डोंगरवटीत, तळवटीत, नेगेबात व समुद्रतीरी असलेल्या कनान्यांच्या देशात व लबानोनापर्यंत आणि फरात महानदीपर्यंत जा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 आता तुम्ही येथून अमोऱ्यांच्या डोंगराळ प्रदेशात जा आसपासच्या सर्व प्रदेशात प्रवास करा यार्देनेच्या खोऱ्यात, अराबाच्या पहाडी प्रदेशात, पश्चिमेकडील उतारावर, नेगेबमध्ये समुद्रकिनारी कनान आणि लबानोन मार्गे फरात या महानदीपर्यंत जा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 आता तुम्ही येथून जा व अमोर्‍यांचा डोंगराळ प्रदेश, अराबाची दरी, नेगेव, कनान व लबानोन आणि भूमध्य समुद्रकिनार्‍यापासून ते फरात नदीच्या काठापर्यंत पसरलेल्या संपूर्ण प्रदेशात जाऊन वस्ती करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 1:7
19 Iomraidhean Croise  

तेथून निघून अब्राम प्रवास करत नेगेबकडे गेला.


सोबाचा राजा रहोबपुत्र हददेजर हा महानदाजवळ आपली सत्ता पुन्हा स्थापित करू पाहत होता त्याचा दाविदाने मोड केला.


सोबाचा राजा हदरेजर महानद फराताजवळील आपली सत्ता स्थापित करण्यासाठी जात असता दाविदाने त्याचा मोड केला.


जी गुरे शारोनात चरत असत त्यांवर शित्रय शारोनी हा होता; खोर्‍यातल्या गुरांवर अदलय ह्याचा पुत्र शाफाट हा होता;


पूर्वेकडील महानद फराताजवळील रानाच्या सीमेपर्यंत त्याने वस्ती केली; कारण गिलाद देशात त्यांची गुरेढोरे फार वाढली होती.


तांबड्या समुद्रापासून ते पलिष्ट्यांच्या समुद्रापर्यंत आणि रानापासून ते फरात नदापर्यंत मी तुझ्या देशाची सरहद्द करीन; मी त्या देशातील रहिवाशांना तुझ्या काबूत आणीन व तू त्यांना आपल्यापुढून हाकून देशील.


मी तर त्यांच्यापुढून अमोरी लोकांचा संहार केला; त्यांची उंची गंधसरूच्या उंचीसारखी होती. ते अल्लोन झाडांसारखे मजबूत होते; मी वरून त्यांचे फळ व खालून त्यांचे मूळ नासवले.


तेव्हा इस्राएल लोकांनी सीनाय रानातून आपापल्या टप्प्याप्रमाणे कूच केले; नंतर मेघ पारानाच्या रानात स्थिर झाला.


मग आपण होरेबाहून कूच करून आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेनुसार जे मोठे व भयानक रान अमोर्‍यांच्या पहाडी प्रदेशाकडे जाताना तुम्हांला लागले, ते सर्व ओलांडून कादेश-बर्ण्यापर्यंत पोहचलो.


पण जो देश ताब्यात घेण्यासाठी तुम्ही पैलतीरी जात आहात तो डोंगरखोर्‍यांचा देश असून आकाशातील पाऊस शोषून घेतो;


जेथे तुमचे पाऊल पडेल ते प्रत्येक स्थळ तुमचे होईल. रानापासून लबानोनापर्यंत आणि नदीपासून म्हणजे फरात नदीपासून पश्‍चिम समुद्रापर्यंत तुमच्या देशाचा विस्तार होईल.


रान व हा लबानोन ह्यांपासून महानद फरातपर्यंतचा हित्ती ह्यांचा सर्व देश व मावळतीकडे महासमुद्रापर्यंतचा प्रदेश तुमचा होईल.


ह्या प्रकारे यहोशवाने त्या सर्व देशाचा म्हणजे डोंगराळ प्रदेश, नेगेब, तळवट व उतरण ह्यांतील सर्व प्रांत आणि त्यांचे राजे ह्यांचा धुव्वा उडवला; कोणालाही जिवंत राहू दिले नाही; इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने आज्ञा केल्याप्रमाणे सर्व प्राण्यांचा त्याने समूळ नाश केला.


परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हांला गैर दिसत असले तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा; महानदीपलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवांची सेवा केली त्यांची, किंवा तुम्ही राहत आहात त्या देशातल्या अमोर्‍यांच्या देवांची? मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार.”


हे ऐकून यार्देनेच्या पश्‍चिमेकडे डोंगरवटीत, तळवटीत आणि लबानोनासमोरील महासमुद्राच्या सबंध किनार्‍यावरील हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी ह्यांचे सर्व राजे


कर्णा असलेल्या सहाव्या देवदूताला ती म्हणाली, “‘फरात महानदीवर’ बांधून ठेवलेले चार देवदूत मोकळे कर.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan