Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 1:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 होरेबापासून सेईर डोंगराच्या मार्गे कादेश-बर्ण्या अकरा दिवसांच्या वाटेवर आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 होरेबपासून कादेश-बर्ण्यापर्यंतचा प्रवास सेईर डोंगरामार्गे अकरा दिवसाचा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 (सेईर डोंगरमार्गे होरेब ते कादेश-बरनेआपर्यंतचा प्रवास अकरा दिवसाचा होता.)

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 1:2
15 Iomraidhean Croise  

मग याकोबाने सेईर देशात म्हणजे अदोम प्रांतात आपला भाऊ एसाव ह्याच्याकडे जासूद आगाऊ पाठवले.


पाहा, होरेब डोंगरावरील एका खडकावर मी तुझ्यापुढे उभा राहीन; आणि तू त्या खडकावर काठी आपट म्हणजे त्यातून पाणी निघेल आणि लोक ते पितील.” इस्राएलाच्या वडिलांच्या देखत मोशेने तसे केले.


मोशे आपला सासरा मिद्यानी याजक इथ्रो ह्याची शेरडेमेंढरे चारत होता आणि तो आपला कळप रानाच्या पिछाडीस देवाचा डोंगर होरेब येथवर घेऊन गेला.


परमेश्वराप्रीत्यर्थ तुला अन्नार्पण म्हणून प्रथमउपज अर्पायचा असेल तर विस्तवावर भाजलेल्या हिरव्या कणसांतले दाणे, म्हणजे हिरव्या कणसांचे चोळून काढलेले दाणे प्रथमउपजाचे अन्नार्पण म्हणून आण.


नंतर मोशे व अहरोन दर्शनमंडपात गेले व बाहेर आल्यावर त्यांनी लोकांना आशीर्वाद दिला, तेव्हा परमेश्वराचे तेज सर्व लोकांच्या दृष्टीस पडले.


ते हेर पारान रानातील कादेश येथे मोशे, अहरोन व इस्राएलाची सर्व मंडळी ह्यांच्याकडे आले आणि त्यांनी त्यांना व सर्व मंडळीला सर्व हकिकत सांगितली आणि त्या देशाची फळे दाखवली.


तो देश पाहायला कादेश-बर्ण्याहून तुमच्या वडिलांना मी पाठवले होते तेव्हा त्यांनीही तसेच केले.


मग आपण होरेबाहून कूच करून आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेनुसार जे मोठे व भयानक रान अमोर्‍यांच्या पहाडी प्रदेशाकडे जाताना तुम्हांला लागले, ते सर्व ओलांडून कादेश-बर्ण्यापर्यंत पोहचलो.


तेव्हा त्या डोंगराळ प्रदेशात राहणार्‍या अमोर्‍यांनी बाहेर पडून तुमच्याशी सामना करून मधमाश्यांप्रमाणे तुमचा पाठलाग केला, आणि सेईर देशातील हर्मापर्यंत तुम्हांला पिटाळून लावले.


मग परमेश्वराने मला सांगितल्याप्रमाणे आपण मागे फिरून तांबड्या समुद्राच्या वाटेने रानातून कूच केले आणि पुष्कळ दिवस सेईर डोंगराभोवती फिरत राहिलो.


आणि लोकांना आज्ञा कर की, सेईरचे रहिवासी तुमचे भाऊबंद जे एसावाचे वंशज त्यांच्या हद्दीतून तुम्हांला जायचे आहे; त्यांना तुमची भीती वाटेल म्हणून फार सांभाळा.


म्हणून सेईरचे रहिवासी आपले भाऊबंद जे एसावाचे वंशज ह्यांना चुकवून आपण अराबाच्या मार्गाने एलाथ व एसयोन-गेबर ही मागे टाकून पुढे गेलो. मग आपण वळून मवाबातील रानाकडल्या मार्गाने गेलो.


जेव्हा परमेश्वराने कादेश-बर्ण्याहून तुम्हांला रवाना करून सांगितले की, ‘जा, व जो देश मी तुम्हांला दिला आहे तो ताब्यात घ्या,’ तेव्हाही तुम्ही तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेविरुद्ध बंड केले; तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही व त्याचे सांगणे ऐकले नाही.


मग यहूदा वंशाचे लोक गिलगालात यहोशवाकडे आले आणि कनिज्जी यफुन्नेचा मुलगा कालेब त्याला म्हणाला, “परमेश्वराने देवभक्त मोशे ह्याला तुझ्याविषयी व माझ्याविषयी कादेश-बर्ण्यात काय सांगितले होते ते तुला माहीत आहेच.


Lean sinn:

Sanasan


Sanasan